PM Krishi Sinchayee Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी शेती हा फक्त एक व्यवसायाच नाही तर ती आता आपली ओळख बनली आहे आपल्या परिवाराच्या आर्थिक गरजा आपण शेतीच्या आधारे पूर्ण करत असतो शेतीतून मिळणाऱ्या चांगल्या पिकामुळे आपण आपल्या परिवाराची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकतो पण हेच जीवनदायी शेती करताना आपल्यासमोर सर्वात मोठी अडचण उभी राहते ते म्हणजे पाणी कारण कोरडवाहू शेतीमुळे शेतकऱ्याला निसर्गाच्या भरवशावर राहावे लागते कारण कधी अपुरा पाऊस तर कधी वेळेवर वीज नसल्यामुळे शेतकरी त्याच्या शेतातील पिकाला पाणी देऊ शकत नाही म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाणी आहे तरच शेतीचं ठीक आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण जर पाणीच नसेल तर रात्रंदिवस घाम गाळून देखील शेतामधील पीक सुकून जातं.
पण शेतकरी मित्रांनो आता ही चिंता कायमची दूर होऊ शकते. जर तुम्हाला देखील तुमच्या शेतात कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न घ्यायचे असेल तर तुम्हाला ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या माध्यमातून तुमच्या शेतीच्या पिकाला पाणी द्यायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळते.
तर आता तुम्हाला देखील तुमच्या शेतामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचन बसवायचे असेल तर केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही फक्त तुमच्यासाठी आहे या योजनेच्या मार्फत अर्ज करून तुम्ही तुमच्या शेतातील पाण्याच्या समस्या अगदी सहज पद्धतीने सोडवू शकता कारण या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक शेताला पाणी देणे असा आहे.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना Overview
| मुद्दा | माहिती |
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना (PMKSY) |
| कोणी सुरू केली | भारत सरकार (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय) |
| लाभार्थी | भारतातील सर्व शेतकरी (ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे) |
| मुख्य उद्देश | ‘हर खेत को पानी’ (प्रत्येक शेताला पाणी) आणि ‘पर ड्रॉप, मोअर क्रॉप’ (कमी पाण्यात जास्त पीक) |
| अधिकृत वेबसाइट | pmksy.gov.in |
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना काय आहे
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही भारत सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचनाचे पाणी पोहोचवण्यासाठी सुरू केलेली एक सरकारी योजना आहे आता ही योजना सुरू करण्यात मागचे मुख्य उद्देश म्हणजे निसर्गावर अवलंबून न राहता आणि पाण्याची बचत करून शेतामध्ये जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल असा आहे म्हणून ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे यामधून ठिबक किंवा तुषार सिंचनांसारख्या आधुनिक पद्धतीसाठी अनुदान दिले जाते ज्यामुळे कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त पीक घेणे शक्य होते तसेच ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर केल्यामुळे शेतकऱ्याचे श्रम देखील वाचतात तसेच त्याचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो.
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये
- भारत देशातील सिंचना खालील क्षेत्र वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अजून पाणी पोहोचले नाही तेथे Canals तसेच पाईपलाईन किंवा इतर मार्गाने सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे.
- जे शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून राहतात अशा कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खात्रीशीर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.
- आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा दुरुपयोग टाळणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवणे.
- शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- या आधुनिक तंत्रज्ञानासाठी सरकारतर्फे शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते जेणेकरून शेतकरी कमी खर्चामध्ये हे संच त्यांच्या शेतामध्ये बसवू शकतील.
- पावसाचे पाणी साठवण्यासाठी उपाययोजना करणे जसे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेततळे बंधारे तयार करण्यासाठी मदत करणे.
- शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य वापर व पाण्याची बचत करणाऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे.
हे नक्की वाचा: PM Kisan Good News! ₹2000 चा 21 वा हप्ता जमा, तुमचे Status लगेच Check करा!
प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेसाठी पात्रता निकष
- या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन असणे बंधनकारक आहे.
- जर शेतकऱ्याने भाडेतत्त्वावरती जमीन घेतलेली असेल तरीही असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात मात्र यासाठी तुम्हाला कमीत कमी सात वर्षाचा नोंदणीकृत भाडे करार सादर करावा लागेल.
- शेतकरी उत्पादन कंपन्या किंवा बचत गट किंवा सहकारी संस्था यांनाही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करता येतो पण अट एवढीच आहे की जर ते एका समूहाच्या वतीने अर्ज करत असतील
- तसेच काही विशिष्ट प्रकारचे जसे की शेती करणाऱ्या सहकारी संस्था या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ आणि इतर फायदे
| शेतकरी प्रवर्ग | मिळणारे अनुदान (Subsidy) |
| अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी | ५५% अनुदान (केंद्र + राज्य हिस्सा) |
| इतर सर्व शेतकरी | ४५% अनुदान (केंद्र + राज्य हिस्सा) |
आवश्यक कागदपत्रांची यादी
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८-अ उतारा
- बँक पासबुक
- जातीचा दाखला
- वीज बिल
- सिंचन संचाचे कोटेशन
- स्वयं-घोषणापत्र
- भाडेकरार
अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया (Application Process)
शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेची अर्ज प्रक्रिया हे आता खूप सोपे आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया MahaDBT पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन पद्धत आता अर्ज स्वीकारण्यासाठी वापरली जात नाही परंतु तुम्ही माहिती घेण्यासाठी किंवा इतर मदतीसाठी कृषी कार्यालयाला भेट देऊ शकता.
- जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या MahaDBT Farmer (https://mahadbt.maharashtra.gov.in/) या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे
- आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी यावरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमचा आधार कार्ड नंबर तसेच मोबाईल नंबर वापरून तुम्हाला नोंदणी पूर्ण करायची आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड चे लिंक असणे आवश्यक आहे
- एकदा नोंदणी झाल्यावर ती तुमच्या आधार नंबर ने परत वेबसाईट पोर्टलवर लॉगिन करा.
- आता तुम्हाला तुमचा प्रोफाइल तयार करायचा आहे आणि यामधील हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे
- आता प्रोफाइल तयार करताना तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल जसे की तुमच्या जमिनीचा तपशील तसेच बँक खात्याचे तपशील आणि शेतीच्या पिकाची अचूक माहिती.
- शेतकरी मित्रांनो ही प्रोफाइल तुम्हाला फक्त एकदाच भरायची असते.
- संपूर्ण प्रोफाईल भरून झाल्यानंतर आता परत तुम्हाला डॅशबोर्ड वरती यायचं आहे आणि अर्ज करा या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर कृषी विभाग हा पर्याय निवडायचा आहे.
- आता परत (Irrigation Tools and Facilities) मुख्य घटक निवडा
- आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट तुमच्यासमोर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY – Per Drop More Crop) हा पर्याय दिसेल त्याखालील तुम्हाला ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यापैकी जे हवे आहेत ते निवडायचे आहे
- त्यानंतर अर्जामध्ये आवश्यक ती माहिती भरा आणि सेव तसेच सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
लॉटरी आणि पूर्व-संमती (Lottery & Pre-Sanction)
- शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरती अनेक शेतकरी अर्ज करत असतात त्यामुळे लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जात असते.
- जर तुमची निवड देखील लॉटरीमध्ये झाली असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती तुम्हाला महाडीबीटी तर्फे एक SMS पाठवण्यात येईल आणि तुमच्या महाडीबीटी लॉगिन मध्ये तुम्हाला Pre-Sanction Letter देखील दिसेल.
संच खरेदी करणे (Purchase)
- शेतकरी मित्रांनो हे सर्वात महत्त्वाची पायरी आहे Pre-Sanction Letter जर तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही सिंचन संच लगेच खरेदी करू नका.
- कारण पत्र मिळाल्यानंतरच सरकारने मान्यता दिलेल्या कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडून कोटेशन फायनल करून तसेच पक्के जीएसटी चे बिल घेऊन हा संच खरेदी करा.
कागदपत्रे अपलोड करणे (Document Upload)
संच बसवल्यानंतर खरेदी केलेले जीएसटी चे बिल आणि तुमच्या शेतामध्ये संच बसवण्याचे फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ हमीपत्र तुमच्या महाडीबीटी लॉगिन मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे.
मोका तपासणी आणि अनुदान (Physical Inspection & Subsidy)
ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तालुक्यामधील कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक प्रत्यक्ष तुमच्या शेतामध्ये भेट देऊन तुम्ही संच बसवला आहे की नाही याच्या physical verification करतील. तपासणी यशस्वी झाल्यानंतर अधिकारी तुमचा अर्ज अंतिम मंजुरीसाठी पुढे पाठवतील आणि काही दिवसांमध्येच अनुदानाची रक्कम थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
हे नक्की वाचा: PM Kisan Good News! ₹2000 चा 21 वा हप्ता जमा, तुमचे Status लगेच Check करा!
अर्ज करताना हमखास होणाऱ्या 5 चुका (आणि त्या कशा टाळाव्यात)
चूक: शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी ही सर्वात मोठी चूक हमखास करतात अनेक शेतकरी अर्ज करताना आणि लॉटरी लागण्याआधी किंवा Pre-Sanction Letter मिळण्याची वाट न बघता ठिबक किंवा तुषार संच विकत घेतात.
- असे टाळा: शेतकरी मित्रांनो असे करणे टाळा कारण नियम असा आहे की तुमच्या खरेदीच्या बिलाची तारीख ही जर Pre-Sanction Letter मिळण्यापूर्वीची असेल म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर बिल तारखेच्या आधीचे असेल तर तुमचा अर्ज शंभर टक्के रिजेक्ट होऊ शकतो.
चूक: शेतकऱ्याचे नाव आधार कार्डवर वेगळे (उदा. ‘विठ्ठल एकनाथ पाटील’), 7/12 वर वेगळे (उदा. ‘पाटील विठ्ठल एकनाथ’) आणि बँक पासबुकवर वेगळे (उदा. ‘Viththal E. Patil’) असते.
- असे टाळा: शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी तुम्हालाही तिन्ही कागदपत्रे व्यवस्थित रित्या तपासायची आहेत कारण सर्व ठिकाणी तुमचे एकच नाव असायला हवे यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते म्हणूनच नावामध्ये थोडाही फरक चालणार नाही.
चूक: शेतकरी कोणत्याही स्थानिक हार्डवेअर किंवा कृषी सेवा केंद्रावरून कोटेशन (Quotation) किंवा बिल घेतात.
- असे टाळा: शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिंचन संच फक्त महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांच्या विक्रेत्या करूनच घ्यायचे आहे म्हणूनच या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी तुमच्या तालुक्यातील अधिकृत विक्रेत्यांची यादी पहिले तपासा.
चूक: एकदा अर्ज ‘सबमिट’ केला की आपले काम संपले, असे समजून शेतकरी त्यांच्या महा-डीबीटी लॉग-इनकडे किंवा मोबाईल SMS कडे दुर्लक्ष करतात.
- असे टाळा: मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर या योजनेची लॉटरी पद्धतीने निवड होत असते जर तुमची निवड झाल्यास तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती एक SMS पाठवला जातो आणि कोर्टावर पूर्व संमती पत्र देखील दिसते आता हे पत्र मिळाल्यानंतर तुम्हाला ठराविक मुदत दिली जाते उदाहरणार्थ दहा ते पंधरा दिवसाची मदत या मुदतीपूर्वी तुम्हाला अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन शेतामध्ये बसवायचे आहे आणि तुमच्या संचाचा फोटो तसेच कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागतात जर तुम्ही हे मदत चुकवली तर तुमची निवड रद्द सुद्धा होऊ शकते.
महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन
| संपर्काचा प्रकार | तपशील |
| अधिकृत अर्ज पोर्टल | mahadbt.maharashtra.gov.in (MahaDBT Portal) |
| योजनेची माहिती (भारत सरकार) | pmksy.gov.in |
| महा-डीबीटी मदत क्र. (Helpdesk) | 022-49192994 (किंवा पोर्टलवर दिलेला नवीनतम क्रमांक) |
| महा-डीबीटी ईमेल | helpdesk.mahadbt@maharashtra.gov.in |
| प्रत्यक्ष भेट (Offline Help) | तुमचा गावाचा ‘कृषी सहाय्यक’ किंवा ‘तालुका कृषी अधिकारी कार्यालय’ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मला ठिबक/तुषार संच बसवण्यासाठी सरकारकडून नक्की किती टक्के सबसिडी (अनुदान) मिळेल?
नियमाप्रमाणे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान मिळते. पण, महाराष्ट्र सरकार त्यात स्वतःच्या निधीतून भर घालते. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी एकूण सबसिडी (Total Subsidy) ही 75% ते 80% पर्यंत जाते, जी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते.
का शेतकऱ्याला जास्तीत जास्त किती क्षेत्रासाठी (Acres) लाभ मिळतो?
एका शेतकरी कुटुंबाला (एका आधार कार्डवर) जास्तीत जास्त 05 हेक्टर म्हणजेच सुमारे 12.5 एकर क्षेत्रासाठी या अनुदानाचा लाभ घेता येतो.
मी 4 वर्षांपूर्वी ठिबक सिंचनावर सबसिडी घेतली होती. मला त्याच शेतासाठी (त्याच गट नंबरवर) पुन्हा लाभ मिळेल का?
नाही. सरकारी नियमानुसार, तुम्ही ज्या सर्वे नंबर/गट नंबरवर एकदा लाभ घेतला आहे, त्याच जागेसाठी तुम्हाला किमान 7 वर्षांनंतरच पुन्हा अर्ज करता येतो. (मात्र, तुमच्याकडे दुसरी जमीन असल्यास, ज्यावर आधी लाभ घेतलेला नाही, त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता).
अर्ज ऑनलाइन (MahaDBT) करायचा आहे की तालुक्याच्या कृषी कार्यालयात (Offline) करायचा?
अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया फक्त ऑनलाइन ‘महा-डीबीटी’ (MahaDBT) पोर्टलवरूनच होते. तुम्ही तालुक्याच्या कृषी कार्यालयात कागदी (Offline) अर्ज जमा करू शकत नाही. पण, जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरताना अडचण येत असेल, तर तुम्ही मदतीसाठी कृषी कार्यालयात किंवा जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ (CSC) जाऊ शकता.