Ambedkar vs Shahu Scholarship: महाराष्ट्रातील ‘Top’ शिष्यवृत्तीमधील फरक, Apply करण्याआधी वाचा!

Ambedkar vs Shahu Scholarship: बरेच विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगतात अशा गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचे स्कॉलरशिप हा एक मोठा आधारस्तंभ बनते आता हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेश शिक्षण स्कॉलरशिप आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप या दोन्ही योजना म्हणजे जणू काही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधीच आहेत आता या दोन्ही योजनांचा लाभ घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी घेऊन त्यांचे भविष्य उज्वल केले आहे.

पण विद्यार्थी मित्रांनो जेवायला योजनांसाठी तुम्हाला अर्ज करण्याची वेळ येते तेव्हा अनेक विद्यार्थी असे आहेत आणि त्यांचे पालक देखील सहाजिकच गोंधळामध्ये पडत असतात म्हणजेच आपल्यासाठी कोणती योजना अधिक फायदेशीर ठरेल आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनांमध्ये नेमका फरक काय आहे? आणि अर्ज करताना विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो माझे शिक्षण जात आणि उत्पन्न कोणत्या योजनेच्या निकषांमध्ये बरोबर बसते?

आता हात सर्वात मोठा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच तुम्हाला सर्वात योग्य योजनेची निवड करण्यास मदत करण्यासाठी आम्ही हा लेख तयार केला आहे या लेखांमध्ये आपण या दोन्ही प्रतिष्ठित स्कॉलरशिप योजना विषयी सखोल तसेच तुलनात्मक माहिती घेणार आहोत या योजनेचे उद्दिष्टे त्यांचे पात्रता व निकष तसेच आर्थिक मदतीचे स्वरूप आणि अर्ज प्रक्रिया यामधील सर्वात महत्त्वाचे फरक समजून घेणार आहोत जेणेकरून हा लेख वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या शैक्षणिक ध्येयासाठी आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी सर्वात्मक निर्णय घेऊ शकाल.

डॉ. आंबेडकर VS राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती: Comparison Table

मुद्दा (Criteria)डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिष्यवृत्तीराजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती
मुख्य लाभार्थी (प्रवर्ग)अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्धखुला प्रवर्ग (Open), EWS, आणि मराठा (SEBC/EWS)
शिक्षणाचा स्तरपदव्युत्तर पदवी (Masters) आणि पी.एच.डी. (PhD)पदव्युत्तर पदवी (Masters) आणि पी.एच.डी. (PhD)
कौटुंबिक उत्पन्न मर्यादा₹ 8.00 लाख (वार्षिक)₹ 8.00 लाख (वार्षिक)
मिळणारा मुख्य लाभसंपूर्ण शिक्षण शुल्क (Tuition Fees), निर्वाह भत्ता, विमान प्रवास, आरोग्य विमा.शिक्षण शुल्क (बऱ्याचदा विशिष्ट मर्यादेसह), निर्वाह भत्ता, विमान प्रवास, आरोग्य विमा.
अर्ज करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना
डॉ. आंबेडकर VS राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती: Comparison Table

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना प्रामुख्याने महाराष्ट्रामधील अनुसूचित जाती आणि नवबुद्ध प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये मास्टर्स किंवा पीएचडी करायची आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते आता या शिष्यवृत्ती चा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जागतिक संधी देणे आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क तसेच त्यांचा राहण्याचा खर्च विमानाचा प्रवास आणि विद्यार्थ्यांचा आरोग्य विभाग अशा सर्व मोठ्या खर्चांचा समावेश होतो.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना प्रामुख्याने open कॅटेगिरी मधील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ज्यांना आपण EWS असे म्हणतो आणि यासोबतच मराठा ज्यांना आपण SEBC/ EWS असे म्हणतो या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गामध्ये लाभ मिळत नाही पण त्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याची म्हणजेच पदव्युत्तर पदवी किंवा पी.एच.डी. अशा प्रकारचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे तसेच त्यांची पात्रता देखील आहे तर अशा विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एक मोठा आर्थिक आधार दिला जातो आता या योजनेद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना परदेशातील टॉप विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी लागणारे शिक्षण शुल्क निर्वाह भत्ता तसेच विमानाचा प्रवास असे अनेक प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून विद्यार्थी त्याच्या उज्वल भविष्यासाठी अगदी सहज पद्धतीने शिक्षण घेऊ शकेल.

दोन्ही शिष्यवृत्ती योजनांची मुख्य उद्दिष्ट्ये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती उद्दिष्ट्ये

तर बघा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना ही प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि तिची मुख्य उद्दिष्टे आम्ही खालील प्रमाणे तुम्हाला दिलेली आहेत:

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून ही योजना सरकारमार्फत सुरू करण्यात आली.
  • तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये मास्टर्स किंवा पीएचडी करण्यासाठी या योजनेमार्फत समान संधी उपलब्ध करून दिली जाते.
  • अनुसूचित जाती व नव-बौद्ध  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन त्यांच्या गुणवत्तेला आणखी भरभक्कम बनवले जाते आणि त्यांच्यात जागतिक स्पर्धेसाठी क्षमता देखील निर्माण केली जाते.
  • विद्यार्थ्याने परदेशामध्ये शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा आणि त्याच्या कौशल्याचा उपयोग हा आपल्या भारत देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी व्हावा हा या योजनेमागे मुख्य हेतू आहे.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना ही प्रामुख्याने ओपन कॅटेगिरी मधील म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि तिची मुख्य उद्दिष्टे आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहेत:

  • आता जे गुणवंत विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही राखीव प्रवर्गातून परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
  • खुला/EWS/मराठा प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा हुशार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत परदेशामध्ये शिकण्याची संधी दिली जाते
  • खुला/EWS/मराठा या प्रवर्गात ज्या विद्यार्थ्यांना नामांकित परदेशी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पूर्ण करायची आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत आर्थिक सहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते.

दोन्ही शिष्यवृत्ती योजनांसाठी लागणारे पात्रता निकष

पात्रता निकष डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिष्यवृत्तीराजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती
मुख्य लाभार्थी (प्रवर्ग)अनुसूचित जाती (SC) आणि नव-बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी. (सामाजिक न्याय विभाग)खुला (Open), EWS आणि मराठा (SEBC/EWS) प्रवर्गातील विद्यार्थी. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग / सारथी)
कौटुंबिक उत्पन्न मर्यादा₹ 8.00 लाख (वार्षिक) पेक्षा कमी.₹8.00 लाख (वार्षिक) पेक्षा कमी.
किमान गुणांची अटपदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Masters) परीक्षेत किमान 55% गुण आवश्यक.पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर (Masters) परीक्षेत किमान 55% गुण आवश्यक.
शिक्षणाचा स्तरपदव्युत्तर पदवी (Masters) आणि पी.एच.डी. (PhD)पदव्युत्तर पदवी (Masters) आणि पी.एच.डी. (PhD)
विद्यापीठ रँकिंगQS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये २०० च्या आत असलेल्या विद्यापीठात प्रवेश.QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 200 च्या आत असलेल्या विद्यापीठात प्रवेश.
वयोमर्यादा (साधारणपणे)पदव्युत्तर पदवीसाठी: 35 वर्षे पी.एच.डी. साठी: 40 वर्षेपदव्युत्तर पदवीसाठी: 35 वर्षे पी.एच.डी. साठी: 40 वर्षे
रहिवासीविद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
पात्रता निकष: डॉ. आंबेडकर वि. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

दोन्ही शिष्यवृत्ती योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

तर बघा विद्यार्थी मित्रांनो या योजनेमध्ये बहुतांश कागदपत्रे समान असली तरी सर्वात महत्त्वाचा फरक हा प्रवर्ग सिद्ध करणाऱ्या कागदपत्राचा आहे म्हणूनच सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक गोळा करून अर्ज भरा.

वैयक्तिक ओळखपत्र व रहिवासी पुरावे

  • Aadhaar Card
  • Domicile Certificate
  • Valid Passport
  • Passport Photo

शैक्षणिक कागदपत्रे

  • दहावी आणि बारावीची मार्कशीट.
  • ग्रॅज्युएशन ची गुणपत्रिका आणि डिग्रीचे सर्टिफिकेट.
  • Masters गुणपत्रिका व प्रमाणपत्र ( पण जर तुम्ही phd साठी अर्ज करत असाल तर)
  • Unconditional Offer Letter (मित्रांनो हे विद्यापीठ QS World Ranking 200 च्या आत असणे बंधनकारक आहे)
  • TOEFL / IELTS / GRE / GMAT यांसारख्या प्रवेश परीक्षेची गुणपत्रिका.

आर्थिक कागदपत्रे

  • कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला ( तुमचे कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असावे)
  • पालकांचे मागील वर्षाचे ITR (Income Tax Return) किंवा फॉर्म-16 (Form-16).
  • बँकेचे पासबुक ( तुमचे बँक अकाउंट आणि मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे)
  • Self-Declaration/Affidavit

दोन्ही योजनेनुसार लागणारी वेगवेगळी कागदपत्रे

डॉ. आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी (SC / नव-बौद्ध)

  • कास्ट सर्टिफिकेट
  • कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी (खुला / EWS)

  • EWS Certificate
  • जर तुम्ही या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुम्हाला वरील जात किंवा EWS प्रमाणपत्राची गरज नसते पण तुम्ही इतर कोणत्याही राखीव प्रवर्गाचा लाभ घेऊ शकत नाही

NOTE: विद्यार्थी मित्रांनो ही फक्त एक सर्वसाधारण यादी आहे आता प्रत्येक वर्षी अधिकृत जाहिरातीमध्ये कागदपत्रांच्या यादीत किरकोळ बदल होऊ शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ तपासून नेहमी व्यवस्थित रित्या कागदपत्रांची छाननी करा आणि अर्ज करा.

अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया (Step-by-Step)

तर बघा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी तसेच राजर्षी शाहू शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्यामधील महत्त्वाचा फरक मी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स मध्ये व्यवस्थित रित्या समजून सांगितला आहे.

  • तर या दोन्हीही शिष्यवृत्ती चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी महाराष्ट्र शासनाच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • यानंतर वेबसाईटच्या होमपेज वरती तुम्हाला वेगवेगळ्या विभागातील यादी दिसेल जी तुम्हाला परदेशी शिष्यवृत्ती देतात.
  • आता तेथे तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार योग्य विभाग निवडायचा आहे तर बघा हाच अर्जामधील मुख्य फरक आहे.
  • तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला डॉक्टर आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला Social Justice & Special Assistance Department या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आणि जर तुम्हाला राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल तर Higher and Technical Education Department या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर आणि तुम्ही योग्य विभाग निवडल्यानंतर हे महाराष्ट्र सरकारचे पोर्टल तुम्हाला त्या शिष्यवृत्तीच्या विशिष्ट विभागाच्या आणि स्वतःच्या शिष्यवृत्ती पोर्टल वरती घेऊन जाईल.
  • आता त्या विशिष्ट पोर्टल वरती तुम्हाला नोंदणी करायची आहे तर नवीन नोंदणी करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा.
  • येथे तुमचा स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करा हा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड ची माहिती द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या लॉगिन करून तुमची प्रोफाइल पूर्ण भरायची आहे यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती पत्ता बँक खात्याचे तपशील तसेच शैक्षणिक माहिती व्यवस्थित रित्या भरावी लागेल.
  • प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर योजनेसाठी अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
  • विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या विभागाच्या पोर्टल वरती आहात उदाहरणार्थ सामाजिक न्याय त्या विभागाचे परदेश शिष्यवृत्ती योजना आता तुम्हाला निवडायची आहे.
  • आता मुख्य अर्ज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमच्या परदेशी विद्यापीठाची माहिती भरायची आहे जसं की अभ्यासक्रमाचे नाव कालावधी QS Ranking आणि या सोबतच Unconditional Offer Letter . बद्दल तुम्हाला माहिती भरावी लागेल.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पोर्टल वरती पीडीएफ च्या स्वरूपात व्यवस्थितरित्या सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे. आता या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे याची माहिती आपण लेखांमध्ये आधीच घेतली. तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की उदाहरणार्थ तुम्हाला आधार कार्ड डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र मार्कशीट ऑफर लेटर हे सर्व स्कॅन करून अगदी व्यवस्थित रित्या अपलोड करायचा आहे.
  • संपूर्ण कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड केल्यानंतर आणि तुमची वैयक्तिक माहिती अर्जामध्ये भरल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा पुन्हा तपासा अर्ज बरोबर असल्यास submit या बटणावर क्लिक करा.
  • अर्ज submit केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून तुमच्याकडे व्यवस्थित जपून ठेवा भविष्यामध्ये तुमच्या कामात पडेल.

विद्यार्थी मित्रांनो माझी एक गोष्ट लक्षात असू द्या तर बघा हे पोर्टल जरी एक असले तरी सामाजिक न्याय आणि उच्च व तांत्रिक शिक्षण हे दोन्हीही पर्याय वेगवेगळे आहेत आणि हे तुम्हाला सुरुवातीलाच निवडायचे आहेत.

दोन्ही शिष्यवृत्तींबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मी या दोन्ही योजनांसाठी एकाच वेळी अर्ज करू शकतो का?

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या दोन्ही योजनांचा एकाच वेळी लाभ घेऊ शकत नाही कारण तुम्ही तुमच्या प्रवर्गासाठी एससी किंवा ओपन असलेल्या केवल एकाच योजनेसाठी अर्ज करू शकता शासनाच्या नियमानुसार एकाच उद्देशासाठी दोन वेगवेगळ्या सरकारी शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येत नाही.

कोणत्या योजनेत जास्त आर्थिक लाभ (पैसे) मिळतात?

या दोन्ही योजनांचे आर्थिक लाभ बघितले तर जवळपास सारखेच आहे आणि अत्यंत व्यापक आहे दोन्ही योजनांमध्ये साधारणपणे शिक्षण शुल्क तसेच निर्वाह भत्ता विमानाचा प्रवास खर्च आणि आरोग्य विमा दिला जातो

दोन्ही योजनांसाठी कौटुंबिक उत्पन्न मर्यादा (Income Limit) सारखीच आहे का?

सर्व विद्यार्थी मित्रांनो या दोन्हीही योजनांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे आठ लाखापेक्षा कमी असायला हवे म्हणजेच दोन्हीही योजनांची कौटुंबिक उत्पन्न मर्यादा मी जवळपास सारखीच आहे.

दोन्ही योजनांसाठी किमान गुणांची अट (Percentage) काय आहे?

हो विद्यार्थी मित्रांनो ही अट सुद्धा दोन्ही योजनांसाठी समान आहे तर बघा अर्जदाराला ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स परीक्षेत पंचावन्न टक्के गुण मिळाले असतील तर अर्जदार या योजनेसाठी अगदी सहज पद्धतीने अर्ज करू शकतो पण काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे अभ्यासक्रमासाठी किंवा विद्यापीठांसाठी या अटींमध्ये बहुतांश बदल होऊ शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही नवीन जाहिरात पाहणे अत्यंत आवश्यक आहे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *