OTP येत नाही? आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा फक्त 50 रुपयांमध्ये (Aadhaar Mobile Link)

Aadhaar Mobile Link: नमस्कार मित्रांनो आजच्या या डिजिटल युगामध्ये आधार कार्ड हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे आपल्याला बँकेचे काम असो किंवा कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा अगदी छोटीशी गोष्ट म्हणजे सिमकार्ड घेणे असो आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला आधार कार्ड मागितले जाते याचमुळे हे सर्वात महत्त्वाचे पण तुम्ही या महत्त्वाच्या आधार कार्डला तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का?

आता सर्वप्रथम हे आधी समजून घ्या की आधार आणि मोबाईल लिंकिंग म्हणजे काय? तर मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आधार आणि मोबाईल लिंकिंग हे एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुमचा 12 अंकी आधार तुमच्या दहा अंकी मोबाईल नंबर सोबत अधिकृतपणे लिंक केले जातात आणि हे प्रक्रिया तुमच्या ओळखीचे डिजिटल पद्धतीने पडताळणी करण्यासाठी महत्त्वाची असते

आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की आजच्या काळामध्ये हे आधार सोबत मोबाईल नंबर लिंकिंग एवढे का महत्त्वाचे आहे तर मित्रांनो विचार करा हे लिंकिंग म्हणजे तुमच्या डिजिटल तिजोरीची चावी आहे आज कालच्या डिजिटल युगामध्ये अनेक महत्त्वाच्या सेवांसाठी जसे की ऑनलाईन बँक व्यवहार करणे पॅन कार्ड काढणे किंवा कोणतेही सरकारी काम ऑनलाईन करणे यासाठी तुमचे आधार कार्ड मागितले जाते तसेच आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर अर्ज भरताना एक ओटीपी येतो म्हणजेच वन टाइम पासवर्ड आता हाच ओटीपी सिद्ध करतो की ती सेवा वापरणारी व्यक्ती तुम्हीच आहात.

आता तर तुमचा देखील मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक नसेल तर तुम्ही या सर्व महत्त्वाच्या ऑनलाईन सुविधांपासून वंचित राहू शकता आणि इतकेच नाही तर तुमच्या आधार कार्डचा अनेक पद्धतीने गैरवापर सुद्धा होऊ शकतो आता तुम्हाला देखील हा गैरवापर टाळायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड सोबत मोबाईल लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.

तरी या लेखाच्या माध्यमातून आज आपण आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा याबद्दलची सर्वात सोपी प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

आधार-मोबाईल लिंकिंग (Overview)

मुद्दातपशील
पद्धतबायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी आधार नोंदणी केंद्राला (Aadhaar Enrolment Center) भेट देणे आवश्यक आहे. (सध्या ही प्रक्रिया ऑनलाईन होत नाही.)
लागणारा वेळकेंद्रावर: साधारणपणे ५ ते १५ मिनिटे. सिस्टीममध्ये अपडेट होण्यासाठी: २४ ते ७२ तास (कधीकधी जास्त).
खर्चसरकारी शुल्क: ₹५० (बायोमेट्रिक अपडेटसाठी).
मुख्य फायदाOTP आधारित पडताळणी (Verification) शक्य होते, ज्यामुळे सर्व सरकारी आणि बँकिंग ऑनलाईन सेवांचा सुरक्षित वापर करता येतो.
आधार-मोबाईल लिंकिंग (Overview)

UIDAI (आधार) ने मोबाईल नंबर लिंक करण्याचे मुख्य उद्दिष्ट्ये

  • तर बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही आधार कार्ड क्रमांक वापरून कोणतीही ऑनलाइन सेवा वापरता जसे की उदाहरणार्थ बँकेचा व्यवहार पीएफ काढणे या सर्व सेवांसाठी आधार कार्ड वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड पाठवला जातो आणि हा वन टाइम पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण होतो. तर आता यामुळे सिद्ध होते की ती सेवा वापरणारी व्यक्ती तुम्हीच आहात ज्यामुळे तुमच्या आधार डेटाचा गैरवापर होत नाही आणि यामध्ये फसवणूक टाळण्यास मोठी मदत होते.
  • आजच्या डिजिटल युगात बहुतेक सरकारी आणि खाजगी सेवा डिजिटल झाल्या आहेत आणि यामध्ये पॅन कार्ड काढणे इन्कम टॅक्स रिटर्न भरणे किंवा डीजी लॉकर वापरणे यांसारख्या अनेक सेवा सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागते. मोबाईल नंबर लिंक केल्यामुळे नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेणे शक्य होते.
  • आपल्याला आधी बँकेचे खाते उघडायचे असेल किंवा नवीन सिमकार्ड घ्यायची असेल किंवा म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर यासाठी पूर्वी अनेक कागदपत्रे जमा करावी लागत होती पण आता तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असल्यामुळे तुम्ही इ केवायसी पर्याय वापरू शकता याद्वारे एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड व्हेरिफिकेशन होताच तुमची सर्व माहिती जसे की तुमचे नाव पत्ता फोटो डिजिटल पद्धतीने संबंधित संस्थांकडे जाते आणि ही प्रक्रिया अगदी जलद पद्धतीने पार पडते म्हणजेच ही प्रक्रिया सोपी आणि पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने पार पडते.
  • अनेक गरजू गरीब लोक सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतात जसे की गॅस सबसिडी शेतकरी सन्मान निधी योजना लाडकी बहीण योजना स्कॉलरशिप आणि या योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये सरकारमार्फत जमा केले जातात आपण याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हणतो आता हे पैसे जेव्हा जमा होतात तेव्हा तुमच्या मोबाईल नंबर वरती एसएमएस द्वारे एक नोटिफिकेशन येते आणि बऱ्याचदा आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती हा एसएमएस येतो यामुळे लाभार्थ्याला पैसे मिळाले याची पूर्णपणे खात्री होते आणि ही संपूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरन्सीने पार पडते.
  • जर तुमच्या आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला किंवा तुमचा आधार कार्डचा डेटा कोणीही बदलण्याचा प्रयत्न केला तसेच तुमच्या आधार कार्डचा वापर करून कोठेही व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न झाला तर UIDAI मार्फत तुमच्या नोंदणीतून मोबाईल नंबर वरती तात्काळ एसएमएस द्वारे तुम्हाला सूचना पाठवले जाते यामुळे तुमच्या आधार कार्ड विषयी तुम्हाला सतत माहिती मिळत राहते.

आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी पात्रता काय आहे?

  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी अशी कोणतीही विशेष पात्रता अद्याप तयार करण्यात आलेली आहे प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे वैद्य आधार कार्ड आहे तो आपला मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करू शकतो.
  • आता अनेक लोकांना प्रश्न पडतो की मोबाईल नंबर कोणाच्या नावावर असावा आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा UIDAI या नियमानुसार तुम्ही आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक करत आहात तर तुमच्याच नावावर असला पाहिजे असे बंधनकारक नाही
  • तुम्ही तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा उदाहरणार्थ पती किंवा पत्नी आई किंवा वडील किंवा इतर पालकांचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करू शकता
  • फक्त महत्त्वाची अट एकच आहे की तो मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असला पाहिजे म्हणजे जेव्हाही आधार वेरिफिकेशन साठी तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड येईल तर तो तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे.

हे नक्की वाचा: Good News! लाडकी बहीण योजनेची E-KYC सुरू, Direct Link वरून अर्ज भरा!

या सुविधेचा फायदा कोणाला होतो?

ज्या व्यक्तींकडे स्वतःचा मोबाईल नंबर नाही जसे की घरातील वृद्ध व्यक्ती किंवा लहान मुले ते त्यांच्या जवळच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक करू शकतात. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एका पालकाचा मोबाईल नंबर त्यांच्या स्वतःच्या आधार कार्ड सह त्यांच्या मुलाच्या आधार कार्ड सोबत देखील लिंक केला जाऊ शकतो.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी तुम्ही कोणाचाही मोबाईल नंबर लिंक करत असाल तरी स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर लिंक करणे हा सर्वात सुरक्षित आणि उत्तम मार्ग आहे कारण तुमचे सर्व आर्थिक व्यवहार जसे की सरकारी कामे केवायसी चे ओटीपी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरतीच येतील जर तो नंबर दुसऱ्या व्यक्तीचा असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी ओटीपी साठी त्यांच्यावर अवलंबून राहावे लागेल ज्यामुळे तुमची गोपनीयता आणि सुरक्षेचे प्रश्न देखील निर्माण होतात.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड: तुम्हाला फक्त तुमचे मूळ आधार कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जावे लागेल
  • कोणताही पुरावा नाही: UIDAI या नियमानुसार तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या Proof of Identity (POI)’ किंवा ‘Proof of Address (POA)’ ची गरज नसते.
  • आवश्यक शुल्क: तर बघा मित्रांनो आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर लिंक किंवा व त्यामध्ये बदल करण्यासाठी UAIDI द्वारे निर्धारित केलेले एकसमान शुल्क रक्कम पन्नास रुपये असा आहे.

NOTE: जर तुमच्याकडून आधार ऑपरेटरने मोबाईल नंबर मध्ये बदल केला किंवा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी अतिरिक्त शुल्क म्हणजेच पैसे मागितले उदाहरणार्थ फॉर्म साठी वेगळे पैसे मागितल्यास तुम्ही त्यांना थेट नकार देऊ शकता किंवा UIDAI कडे त्यांची तक्रार करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला ऑपरेटर करून 50 रुपये भरल्याची पावती घ्यावी लागेल कारण पावतीवर तुमचा अपडेट विनंती क्रमांक म्हणजेच URN लिहिलेला असतो.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्याची सविस्तर प्रक्रिया

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर बघा कृपया लक्ष द्या की सुरक्षेच्या कारणे वास्तव तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करू शकत नाही किंवा अपडेट करू शकत नाही ऑनलाइन पद्धत SSUP पोर्टल हे केवळ आधार केंद्रावर जाण्यासाठी Appointment Booking करण्यासाठी वापरली जात असते जेणेकरून तुमचा वेळ वाचेल कारण प्रत्यक्षात मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक करण्याकरिता तुम्हाला बायोमेट्रिक वेरिफिकेशन म्हणजेच तुमचे फिगर प्रिंट देणे अत्यंत आवश्यक असते जे फक्त आधार केंद्रावरच शक्य आहे.

ऑफलाइन पद्धत थेट आधार केंद्रावर जाऊन

  • सर्वप्रथम तुम्हाला UADAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे तिथे तुम्हाला loacate an enrolment center या पर्यायाचा वापर करून तुमच्या परिसरातील जवळचे आधार नोंदणी केंद्र किंवा आधार सेवा केंद्र शोधायचे आहे.
  • त्यानंतर तुमचे मूळ आधार कार्ड सोबत घेऊन निवडलेल्या आधार सेवा केंद्रावर भेट द्या.
  • आता आधार केंद्रावर उपलब्ध असलेला aadhar update form व्यवस्थितरित्या आणि काळजीपूर्वक भरा.
  • या फॉर्ममध्ये तुमचा आधार क्रमांक आणि जो मोबाईल नंबर तुम्हाला आधार सोबत लिंक करायचा आहे तसेच तुमची वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • आता तुम्ही भरलेला फॉर्म आणि आधार कार्ड घेतल्या ऑपरेटरला द्या ऑपरेटर तुमचा तपशील हा त्यांच्या सिस्टीम मध्ये भरेल.
  • त्यानंतर तुमची ओळख पटवण्याकरिता ऑपरेटर तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच तुमच्या बोटाचे ठसे आणि शक्य असल्यास डोळ्यांचे स्कॅन घेईल.
  • यासाठी तुम्हाला ऑपरेटरला फक्त पन्नास रुपये एवढी रक्कम द्यायची आहे कारण हे सरकारने निश्चित केलेले सरकारी शुल्क आहे.
  • ही रक्कम भरल्यानंतर ऑपरेटर तुम्हाला एक पावती देईल या पावतीवर update request number असतो तर ही पावती तुम्हाला काळजीपूर्वक जपून ठेवायची आहे.
  • आता साधारणपणे 24 ते 72 तासांच्या आत मध्ये तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केल्या जाईल पण काही तांत्रिक अडचणी आल्यास कधी कधी पाच ते सात दिवस देखील लागू शकतात जसा तुमचा आधार क्रमांक तुमच्या नवीन मोबाईल सोबत लिंक होईल तसं तुम्हाला तुमच्या नवीन मोबाईल क्रमांक वरती SMS पाठवला जाईल.

ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन आधार केंद्रावर जाणे

मित्रांनो या पद्धतीचा वापर करून तुम्ही आधीच ऑनलाइन बुकिंग करू शकता जेणेकरून तुम्हाला आधार सेंटरवर गेल्यावर लांब रांगीमध्ये उभा राहण्याची गरज पडणार नाही

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे अपॉइंटमेंट बुक करणे अगदी सोपा आहे तुम्हाला UADAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे यानंतर MY AADHAR (https://myaadhaar.uidai.gov.in/) या पोर्टलवर जा.
  • आता होम पेजवर तुम्हाला BOOK AN APPOINTMENT या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • ‘Book an Appointment at UIDAI run Aadhaar Seva Kendra’ (जर तुमच्या शहरात उपलब्ध असेल) किंवा ‘Book an Appointment at Registrar run Aadhaar Seva Kendra’ (इतर सर्व केंद्रांसाठी) यापैकी एक निवडा.
  • यानंतर तुमचे शहर किंवा राज्य किंवा जिल्हा निवडून PROCEED या बटनावर क्लिक करा.
  • आता AADHAR UPDATE हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर सध्या तुमच्याकडे असलेला कोणताही एक मोबाईल नंबर फक्त अपॉइंटमेंट चा ओटीपी घेण्याकरिता तेथे सबमिट करा आणि CAPTCHA कोड टाका.
  • आता GENERATE OTP या पर्यायावर क्लिक करा आणि आलेला OTP टाकून व्हेरिफाय करा.
  • आता समोरील पेजवर तुमचा आधार क्रमांक किंवा आधार कार्ड वरील नाव टाका.
  • तेथे तुम्हाला What do you want to update या विभागामध्ये update mobile number हा पर्याय दिसेल तो निवडा आणि proceed या बटनवर क्लिक करा.
  • आता सर्व माहिती भरून झाल्यानंतर सिस्टीम तुम्हाला तुमच्या गावातील जवळचे आधार केंद्र आणि तिथे उपलब्ध असलेल्या तारखा आणि वेळा दाखवेल.
  • तुमच्या सोयीनुसार तारीख आणि वेळ निवडा व कन्फर्म या ऑप्शन वर क्लिक करा.
  • ही सर्व प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट बुक होईल आणि तुम्हाला एक अपॉइंटमेंट स्लिप म्हणजेच पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा आणि व्यवस्थित रित्या क्लिअर पद्धतीने print करून घ्या.
  • आता तुम्हाला निवडलेल्या दिवशी आणि वेळेवर तुमचे मूळ आधार कार्ड आणि अपॉइंटमेंट स्लिप घेऊन सिस्टीम मध्ये निवडलेल्या आधार केंद्रावर जायचे आहे.
  • अपॉइंटमेंट असल्यामुळे तुम्हाला वेगळ्या लांब रांगेमध्ये उभा राहण्याची गरज नाही तुमचा थेट नंबर लागेल.
  • ऑपरेटर तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच बोटाचे घेईल आणि सोबतच सरकारच्या नियमानुसार पन्नास रुपये शुल्क तुमच्याकडून आकारले जाईल त्यानंतर ऑपरेटरने सर्व प्रोसेस फॉलो केल्यावर तुम्हाला URN असलेली एक पावती देण्यात येईल.

हे नक्की वाचा: Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2025: बांधकाम कामगार योजना, फायदे आणि नोंदणी

आधार (UIDAI): तक्रार आणि मदतीसाठी महत्त्वाचे संपर्क

सेवेचा प्रकार Contact Details
टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक1947
अधिकृत ई-मेलhelp@uidai.gov.in
अधिकृत माहिती वेबसाईटhttps://uidai.gov.in/
ऑनलाईन सेवा पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

मी माझा मोबाईल नंबर आधारशी घरी बसून (Online) लिंक करू शकतो का?

नाही मित्रांनो सुरक्षेच्या कारणामुळे तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डची लिंक करू शकत नाही यासाठी तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक म्हणजेच बोटाची ठसे देणे आवश्यक असते आणि हे फक्त जवळच्या आधार केंद्रावर जाऊन शक्य आहे.

आधारला मोबाईल नंबर लिंक/अपडेट करण्यासाठी एकूण किती वेळ लागतो?

आधार केंद्रावर या प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनिटे लागतात पण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार क्रमांक हा सिस्टीम मध्ये अपडेट होण्यासाठी साधारणपणे 24 ते 72 तास किंवा कधीकधी पाच ते सहा दिवसापर्यंत इतका कालावधी लागू शकतो

या प्रक्रियेसाठी किती शुल्क (Fees) लागते?

तुम्हाला जर आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचे असेल किंवा नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर यासाठी आधार केंद्रावरील ऑपरेटरला तुम्हाला पन्नास रुपये इतके शुल्क द्यावे लागेल आणि हे शुल्क सरकारमार्फत निश्चित करण्यात आले आहे यापेक्षा जास्त देण्याची गरज नाही

मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी कोणती कागदपत्रे (Documents) सोबत न्यावी लागतात?

यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर कागदपत्रांची गरज पडत नाही फक्त तुम्हाला तुमचे मूळ आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक सोबत घेऊन जावा लागेल.

One comment

  1. Thank you for making OTP access to all online submissions convenient due to Yojana Trend.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *