India Post GDS 3rd Merit List 2026 (Out): 28,636 पदांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर; येथे तपासा तुमचे नाव!

India Post GDS 3rd Merit List: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही देखील इंडियन पोस्ट ऑफिस भरतीसाठी ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, किंवा सहाय्यक पोस्ट मास्टर या पदांसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण भारतीय पोस्ट ऑफिस विभागाने 28,636 पदांसाठी 3rd Merit List अधिकृत पद्धतीने त्यांच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध केली आहे.

आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला परीक्षा द्यायची नव्हती कारण या भरती अंतर्गत दहावीच्या गुणांच्या आधारावरती थेट तुमची निवड करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या लेखांमध्ये बघणार आहोत की या भरतीचा निकाल कसा पाहायचा तसेच कट ऑफ किती लागला आणि पुढची प्रक्रिया काय असेल याची सविस्तर माहिती आजच्या लेखांमधून आपण जाणून घेणार आहोत.

India Post GDS Maharashtra Circle – List 1 2026 Quick Information

माहिती / वर्णनतपशील
योजनेचे / भरतीचे नावIndia Post GDS Recruitment 2026
संबंधित विभागभारतीय टपाल विभाग (Department of Posts)
एकूण पदे२८,६३६ (GDS, BPM, ABPM)
लागू राज्येसंपूर्ण भारत (२३ सर्कल्स)
प्रमुख पात्रता१० वी उत्तीर्ण (गणित आणि इंग्रजीसह)
निवड प्रक्रिया१० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit Based)
अधिकृत वेबसाइटindiapostgdsonline.gov.in
नवीन अपडेट २०२६दुसरी गुणवत्ता यादी

India Post GDS Maharashtra Circle – List 1 2026 Latest News

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय पोस्ट ऑफिस विभागाने Schedule-I January 2026 28 अंतर्गत 28,636 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. आणि महत्त्वाचे म्हणजे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या दरम्यान उमेदवाराकडून या भरतीचे अर्ज भरून घेतले होते. आणि आता 6 मार्च 2026 रोजी या भरतीची दुसरी मेरिट लिस्ट देखील प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये उमेदवारांची निवड झाली आहे. आणि या सोबतच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या उमेदवारांची निवड या भारतीय अंतर्गत करण्यात आली आहे त्यांना 23 मार्च 2026 पूर्वी Document Verification पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.

India Post GDS Maharashtra Circle – List 1 2026 काय आहे

बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून देखील असा प्रश्न पडला आहे की इंडियन पोस्ट जीडीएस भरती काय आहे तर बघा भारतीय ग्रामीण टपाल सेवा हे ग्रामीण भागातील टपाल कार्यालयीन व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवली जात असते याद्वारे ग्रामीण भागात पोस्टल सेवा, बँकिंग सेवा, आणि सरकारी योजना पोहोचवल्या जात असतात.

  • BPM (Branch Postmaster): टपाल कार्यालयाचे प्रमुख.
  • ABPM (Assistant Branch Postmaster): टपाल वितरणात मदत करणे.
  • Dak Sevak: टपाल पोहोचवण्याचे काम.

Step-by-Step Process to Check India Post GDS 3rd Merit List 2026

  • Step 1: सर्वप्रथम indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Step 2: होमपेजवर डाव्या बाजूला ‘Shortlisted Candidates’ हा पर्याय दिसेल.
  • Step 3: त्यावर क्लिक केल्यावर भारताच्या सर्व राज्यांची (Circles) यादी उघडेल.
  • Step 4: तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज केला आहे (उदा. Maharashtra), त्यावर क्लिक करा.
  • Step 5: ‘List I’ यावर क्लिक करा. तुमच्या समोर PDF फाईल उघडेल.
  • Step 6: या PDF मध्ये तुमचा Registration Number सर्च करा (Ctrl+F वापरून).

India Post GDS 3rd Merit List 2026 PDF Download Maharashtra

GDS Merit ListPDF Download Link
GDS Merit List 1stLink for Download
GDS Merit List 2ndLink for Download
GDS Merit List 3rdTo be Activated Soon
GDS Merit List 4thTo be Activated Soon
GDS Merit List 5thTo be Activated Soon
GDS Merit List 6thTo be Activated Soon
Other State Post GDS Merit ListTo be Activated Soon

Maharashtra Circle Vacancy

महाराष्ट्रातील विद्यार्थी असाल तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी या भारतीय अंतर्गत मोठी संधी देण्यात आली आहे कारण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एकूण 3553 पदे रिक्त ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये मराठी आणि कोकणी भाषेचा समावेश आहे.

Common Mistakes to Avoid

बरेच विद्यार्थी मेरिट लिस्ट च्या नावांमधून वगळले जातात कारण त्यांनी अर्ज भरताना या चुका केलेल्या असतात.

  • विद्यार्थी मित्रांनो अर्जामध्ये भरलेले गुण आणि मार्कशीट मधील असलेले गुण जोडले नाहीत तर मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येणार नाही आणि तुमचा अर्ज देखील बाद होऊ शकतो.
  • आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 23 मार्च 2026 पूर्वी तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन पूर्ण करून घ्यायचे आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चुकीचा जात प्रवर्ग निवडला असेल तर तुम्हाला त्याचे फायदे मिळणार नाहीत.

Helpline Number

  • Official Website: indiapostgdsonline.gov.in
  • Maharashtra Circle Helpline: 022-22621682 (किंवा संबंधित विभाग प्रमुख कार्यालय).

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

GDS ची दुसरी मेरिट लिस्ट कधी येईल?

पोस्ट ऑफिस मार्फत दुसरी गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया कशी होते?

निवड पूर्णपणे १० वीच्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित आहे. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही.

मला पडताळणीसाठी कुठे जावे लागेल?

तुमच्या नावासमोर जो ‘Divisional Office’ चा पत्ता दिला आहे, तिथे तुम्हाला जावे लागेल.

पगार किती मिळतो?

BPM साठी ₹12,000 आणि ABPM/GDS साठी ₹10,000 बेसिक पगार असून इतर भत्ते मिळून हा आकडा वाढतो.

Conclusion

विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आले आहे त्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो आणि ज्यांचे नाव आले नाहीत त्यांनी निराश होऊ नका कारण भारतीय टपाल विभागामध्ये पाच ते सहा वेटिंग लिस्ट जाहीर केल्या जातात त्यामुळे पुढच्या यादीसाठी तुम्ही वाट नक्की बघा कारण दहावी पास असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्तम संधी आहे.

हे नक्की वाचा: Maharashtra HSC Board Result 2026: 12 वी निकाल जाहीर? वेळ आणि तारीख बघा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *