PM Vishwakarma Yojana: मित्रांनो तुमच्या हातामध्ये कौशल्य आहे पण व्यवसायामध्ये वाढ करण्याकरिता हातामध्ये पुरेसं भांडवल नाही किंवा तुम्हाला जर स्वतःचा पारंपारिक व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर मार्केटिंग करण्यासाठी तशी ओळख मिळत नाही आणि जर तुमचं उत्तर यावरती हो असेल तर आता केंद्र सरकार तुमची मदत करणार आहे कारण केंद्र सरकारने PM Vishwakarma Yojana 2026 हे फक्त तुमच्यासारख्या गरजू गरीब आणि कौशल्य असणाऱ्या तरुणांसाठी सुरू केली आहे.
तर बघा अनेक पारंपारिक व्यवसाय करणारे लोक पैशांच्या अभावी प्रगती करू शकत नाही आता हीच समस्या सोडवण्याकरिता केंद्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे यामध्ये तुम्हाला केवळ तीन लाखापर्यंत कर्जच मिळत नाही तर मोफत प्रशिक्षण तसेच नवीन टूलकिट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत ची आर्थिक मदत देखील दिली जाते तर मग चला या लेखाच्या माध्यमातून आपण पीएम विश्वकर्मा योजना 2026 ची सविस्तर माहिती जाणून घेऊया तसेच या योजनेची अर्ज प्रक्रिया आणि नवीन नियम काय असणार आहे हे देखील या लेखांमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगितला आहे.
What is PM Vishwakarma Yojana In Marathi
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम विश्वकर्मा ही केंद्र सरकारची एक फेलोशिप योजना आहे जी प्रामुख्याने 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायात काम करणाऱ्या कारागिरांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कारागीरांना आर्थिक सक्षमीकरण देणे असं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेमध्ये भाव मिळवून देणे आणि त्यांना आधुनिक टूल किट वापरण्याचे प्रशिक्षण अगदी मोफत देणे असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
PM Vishwakarma Yojana Highlights Table
| वैशिष्ट्य | तपशील |
| योजनेचे नाव | PM Vishwakarma Yojana (पीएम विश्वकर्मा योजना) |
| सुरुवात | केंद्र सरकार (Ministry of MSME) |
| लाभार्थी | १८ पारंपारिक क्षेत्रातील कारागीर (सुतार, शिंपी, लोहार इ.) |
| आर्थिक मदत | ₹३ लाखांपर्यंत कर्ज (फक्त ५% व्याजदराने) |
| टूलकिट ई-वाउचर | ₹१५,००० (टूलकिट खरेदीसाठी) |
| प्रशिक्षण भत्ता | ₹५०० प्रतिदिन (Stipend) |
| अधिकृत वेबसाईट | pmvishwakarma.gov.in |
PM Vishwakarma Yojana Eligibility Criteria 2026
मित्रांनो तुम्हाला देखील प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत 2026 मध्ये अर्ज करायचा असेल तर एकदा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या योजनेच्या अटीमध्ये बसता का हे एकदा नक्की तपासा:
- अर्जदार हा 18 पारंपारिक व्यवसायांपैकी एका व्यवसायामध्ये हाताने काम करणारा कारागीर असावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- अर्जदाराने मागील पाच वर्षात प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना तसेच स्वनिधी योजनेचे कर्ज घेतलेले नसावे.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची सरकारी नोकरी करणारा नसावा.
हे नक्की वाचा: PM Gharkul Yojana List Maharashtra 2026: तुमचे नाव यादीत आले का? असे चेक करा
PM Vishwakarma Yojana Required Documents
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)
- बँक पासबुक
- रेशन कार्ड (नसल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
PM Vishwakarma Yojana Financial Benefits
कोणत्याही गॅरंटीशिवाय तुम्हाला केंद्र सरकार मार्फत तीन लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येते.
- पहिला टप्पा: ₹१,००,००० (परतफेड: १८ महिने)
- दुसरा टप्पा: ₹२,००,००० (परतफेड: ३० महिने – पहिला हप्ता फेडल्यानंतरच मिळतो).
- व्याजदर: फक्त ५% वार्षिक (बाकीचे व्याज सरकार सबसिडी म्हणून भरते).
मित्रांनो तुमचे जुने साहित्य बदलून नवीन अवजारे घेण्याकरिता केंद्र सरकार मार्फत तुम्हाला पंधरा हजाराचे ई-वाउचर देण्यात येते याच्या मदतीने तुम्ही नवीन टूलकिट विकत घेऊ शकता.
आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पाच ते सात दिवसाचे मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते आणि या ट्रेनिंगच्या काळामध्ये तुम्हाला दररोज पाचशे रुपये भत्ता देखील मिळतो जो थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
एकदा तुमचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला पीएम विश्वकर्मा आयडी कार्ड आणि सर्टिफिकेट मिळते ज्यामुळे तुम्ही एक अधिकृत कारागीर म्हणून ओळखले जातात.
पीएम विश्वकर्मा योजना: अर्ज कसा करावा? (Step-by-Step Application Process)
तर मित्रांनो तुम्हाला देखील या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पूर्णपणे ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला बायोमेट्रिक पडताळणीसाठी एकदा तरी जवळच्या सीएससी सेंटर ला भेट द्यावी लागेल कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला घरबसल्या अर्ज करता येत नाही.
- तर सर्वप्रथम तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या सीएससी सेंटर वरती जा आणि सोबत आधार कार्ड आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक पासबुक घेऊन जा.
- आता बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्याकरिता सीएससी ऑपरेटर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करून घेईल आणि हीच सर्वात महत्त्वाची स्टेप आहे कारण याशिवाय अर्ज पुढे जातच नाही.
- आता सर्व पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती तसेच व्यवसायाचा प्रकार उदाहरणार्थ सुतार टेलर आणि तुमच्या बँक खात्याची सविस्तर आणि अचूक माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
- मित्रांनो एकदा तुमचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर आणि ऑनलाइन अर्ज सबमिट झाल्यावर हा अर्ज तुमच्या गावातील सरपंचाकडे किंवा महानगरपालिकेकडे पडताळणी करिता जात असतो आणि त्यांनी मान्यता दिल्यावरच तुम्हाला ट्रेनिंग आणि कर्जाचा लाभ मिळतो.
PM Vishwakarma Status Check
- आता सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईट pmvishwakarma.gov.in वर जा.
- उजव्या बाजूला ‘Login’ ऑप्शनवर क्लिक करा आणि ‘Applicant/Beneficiary Login’ निवडा.
- आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरिफाय करा.
- त्या नंतर लॉगिन झाल्यावर तुमच्या डॅशबोर्डवर तुम्हाला दिसेल की तुमचा अर्ज Gram Panchayat Level वर आहे की District Level वर.
- जर अर्ज मंजूर झाला असेल, तर तुम्हाला PM Vishwakarma Certificate तिथेच डाऊनलोड करता येईल.
संपर्क आणि हेल्पलाइन (Helpline Number)
| माहिती | तपशील |
|---|---|
| हेल्पलाइन नंबर | 1800 267 7777 / 17923 |
| अधिकृत वेबसाईट | pmvishwakarma.gov.in |
| yojanatrends.in/ | HOME PAGE |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
सिलाई मशीनसाठी १५,००० रुपये रोख मिळतात का?
नाही मित्रांनो तुम्हालाही रक्कम रोख मिळत नाही तर तुम्हाला e-voucher दिले जाते जे वापरून तुम्ही अधिकृत दुकानातून शिलाई मशीन किंवा टुलकीट खरेदी करू शकता
कर्जावर व्याज किती लागेल?
बघा तुम्हाला फक्त पाच टक्के व्याज द्यावे लागेल बाकीचे व्याज सरकार सबसिडी म्हणून बँकेमध्ये भरते
अर्ज केल्यावर पैसे कधी मिळतील?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला पाच दिवसाचे ट्रेनिंग पूर्ण करावे लागते त्यानंतर टूलकिट खरेदी करण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतात आणि मग कर्जासाठी अर्ज करता येतो.
Conclusion
तर मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजना 2026 ही स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या कारागिरांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून आली आहे म्हणूनच केवळ पैशांच्या अभावी तुमचे कौशल्य वाया जाऊ देऊ नका आजच तुमच्या गावातील जवळील सीएससी सेंटर वरती जाऊन या योजनेसाठी तुमची नोंदणी पूर्ण करा आणि तुम्हाला जर या योजनेबद्दल काहीही शंका असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हो ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना व्हाट्सअप वरती नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत ही मदत पोहोचेल.
I need a machine