Bandhkam Kamgar Renewal Receipt: तुमची रिन्यूअल पावती 2 मिनिटात Online Download करा!

Bandhkam Kamgar Renewal Receipt: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केली आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर बघा मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार ही योजना राबवण्यात येते तसेच या योजनेअंतर्गत अनेक फायदे देखील मिळतात जसे की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत या सोबतच तुमचा आरोग्य विमा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ देखील फक्त हे एक नोंदणी केल्यामुळे मिळतो.

आता तुम्ही देखील या सर्व योजनांचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला देखील समोर देखील लाभ घेणे सुरू ठेवायचं असेल तर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दरवर्षी तुमची नोंदणी Renewal करणे हे बंधनकारक असते पण तुम्ही देखील विचार करत असाल जर हे वेळेत नोंदणी केले नाही तर म्हणजेच रिन्यूअल केलं नाही तर काय होईल?

बघा मित्रांनो जर तुम्ही वेळेवरती बांधकाम कामगार योजनेचे रिन्यूअल केलं नाही तर तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारे तुमचे हक्काचे लाभ थांबू शकतात आणि अनेक बांधकाम कामगारांना असं वाटतं एकदा ओळखपत्र मिळाले म्हणजे आपले काम झाले तर मित्रांनो तसं नसते. तुम्ही जर तुम्ही जर रिन्यूअल केलं नाही तर तुमची नोंदणी Inacative होते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत लाभ मिळतात ते सर्व बंद होऊ शकतात.

पण तुम्ही काळजी करू नका! तुम्ही ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या रिन्यूअल पावती कशी मिळवू शकतो हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या महाराष्ट्र बांधकाम कामगार रिन्यूअल पावती अगदी सहज पद्धतीने पाहू शकता आणि ते डाऊनलोड देखील करू शकता आता हे पावती मिळवण्याच्या सर्व स्टेप्स जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

बांधकाम कामगार रिन्यूअल प्रक्रिया Overview

मुद्दा माहिती
विभागाचे नावमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MahaBOCW)
रिन्यूअल का आवश्यक?मंडळाच्या सर्व योजना (उदा. आर्थिक मदत, विमा, शैक्षणिक लाभ) अविरत सुरू ठेवण्यासाठी
कोणासाठी अनिवार्य?सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्यांना आपली नोंदणी ‘सक्रिय’ (Active) ठेवायची आहे
अधिकृत वेबसाईटhttps://mahabocw.in/
लागणारी फीसाधारणपणे ₹१ प्रति वर्ष (वार्षिक वर्गणी म्हणून)

बांधकाम कामगार रिन्यूअल म्हणजे काय?

मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की बांधकाम कामगार योजनेची रिन्यूअल पावती नेमकी काय आहे तर बघा मित्रांनो बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुम्हाला जे लाभ दिले जातात जसे की तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप, आरोग्य विम्याचे संरक्षण तसेच महिलांना भांडे मेकअप किट आता हे सर्व लाभ सक्रीय ठेवण्यासाठी दरवर्षी या योजनेचे रिन्यूअल करणे हे अत्यंत आवश्यक असते.

जर का तुम्ही रिन्यूअल केले नाही तर तुम्हाला मोठा तोटा होऊ शकतो म्हणजेच तुम्ही जर या योजनेचे वेळेवरती रिन्यूअल केले नाही तर तुमची नोंदणी निष्क्रिय समजली जाते याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मिळणाऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ घेऊ शकत नाही तसेच ज्या योजनांचा लाभ तुम्हाला आधी मिळत होता तो देखील बंद होऊ शकतो म्हणूनच सतत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दरवर्षी रिन्यूअल प्रक्रिया पूर्ण करणे हे अनिवार्य आहे.

बांधकाम कामगार नोंदणी रिन्यूअलची मुख्य उद्दिष्ट्ये

  • या रिन्यूअल प्रक्रियेचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे बांधकाम कामगार योजनेमधून बोगस लाभार्थी वगळणे तर बघा मित्रांनो या प्रक्रियेमुळे जे कामगार आता बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत नाही तसेच त्यांचा मृत्यू झाला आहे किंवा इतर काही कारणांमुळे ते अपात्र ठरले आहे अशा लाभार्थ्यांना या यादीमधून अगदी सहज पद्धतीने वगळले जाते आणि फक्त गरजू गरीब कामगारापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला जातो.
  • तसेच बांधकाम कामगारांना या योजनेचा खरोखर लाभ मिळतो का जसे की त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत पोहोचते का तसेच त्यांना आरोग्य विभाग संरक्षण मिळते का यासोबतच बांधकाम कामगारांना इतर आर्थिक सहाय्य हे सुरळीत पद्धतीने सुरू राहणे हे या नोंदणी मागील मुख्य उद्दिष्ट आहे.
  • या रिन्यूअल प्रक्रियेमुळे हे सिद्ध होते की बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्रिय आहे आणि जर बांधकाम कामगाराने दरवर्षी या योजनेचे रिन्यूअल केले नाही तर त्याची नोंदणी निष्क्रिय ठरते म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बांधकाम कामगाराला या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येते.

हे नक्की वाचा: बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज नक्की करा कारण ही एक योजना तुम्हाला देणार 30 पेक्षा जास्त फायदे

बांधकाम कामगार रिन्यूअलसाठी पात्रता

तुम्ही देखील बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत केलेली नोंदणी रिन्यूअल करायची असेल तर कामगाराला काही ठराविक निकष पूर्ण करणे बंधनकारक असते या योजनेमधील नोंदणीचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा निकष म्हणजे त्या बांधकाम कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मूळ नोंदणी असणे आवश्यक आहे आता ज्या कामगाराचे नाव आधीच नोंदवले आहे तोच कामगार या योजनेची नोंदणी रिन्यूअल करून घेऊ शकतो आणि दुसरा महत्त्वाचा निकष म्हणजे तुम्ही सुरळीत रित्या बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी रिन्यूअल करायच्या वेळेस कामगाराला मागील बारा महिन्यात किमान 90 दिवस त्यांनी काम केले याचा पुरावा म्हणून सर्टिफिकेट सादर करावे लागते. तसेच बांधकाम कामगाराचे वय मंडळाने ठरवून दिलेल्या वयोमर्यादेच्या उदाहरणार्थ 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे.

रिन्यूअलसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • ९० दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र
  • नोंदणी ओळखपत्र
  • रिन्यूअल पावती – जर असेल तर
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक 
  • पासपोर्ट साईज फोटो

ऑनलाइन रिन्यूअल पावती काढण्याची सविस्तर प्रक्रिया (Step-by-Step)

  • तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन रिन्यूअल पावती काढण्यासाठी तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर च्या ब्राउझरवर ही अधिकृत https://mahabocw.in/ वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल आता थोडं खाली स्क्रोल करा.
  • आता तुम्हाला Construction Worker Online Renewal नावाचा असा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • मित्रांनो परत तुमच्यासमोर आता एक नवीन पेज उघडेल.
  • इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ( हा क्रमांक तुमच्या बांधकाम कामगार ओळखपत्रावरती दिलेला असतो)
  • रजिस्ट्रेशन क्रमांक टाकल्यावरती प्रोसीड या बटणावर क्लिक करा.
  • मित्रांनो प्रोसीड वरती क्लिक करताच तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल ज्याला आपण one time password असे देखील म्हणतो.
  • आता हा OTP रिकाम्या रकान्यामध्ये टाका, त्यानंतर Verify किंवा validate या बटणावर क्लिक करा
  • मित्रांनो OTP बरोबर असल्यास तुमचे कामगार प्रोफाइल डॅशबोर्ड उघडेल.
  • आता या डॅशबोर्ड वरती Renewal किंवा Aaaply For Renewal असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता येथे तुम्हाला तुमचे मागील बारा महिन्यात 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करायला सांगितले जाईल.
  • तर बघा मित्रांनो तुमच्या मोबाईल मधील कॅमेराने प्रमाणपत्राचा फोटो स्पष्ट काढा किंवा तुम्ही PDF File सुद्धा अपलोड करू शकता.
  • ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला रिन्यूअल साठी लागणारी नाममात्र वार्षिक उदाहरणार्थ फक्त 60 रुपये ऑनलाईन भरायची आहे.
  • आता ही फी भरण्यासाठी तुम्ही यूपीआयचा वापर देखील करू शकता किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे देखील पेमेंट करू शकता.
  • पेमेंट सक्सेसफुल होताच तुमची रिन्यूअल प्रक्रिया त्या क्षणामध्ये पूर्ण होईल.
  • आणि स्क्रीनवर तुमची रिन्यूअल रिसिप्ट दिसेल.
  • आता डाऊनलोड रिसिप्ट किंवा प्रिंट या बटणावर क्लिक करून तुम्ही रिसिप्ट डाऊनलोड देखील करू शकता किंवा प्रिंट देखील काढू शकता.
  • तुम्ही बांधकाम कामगार रिन्यूअल पावती डाऊनलोड केल्यानंतर ती तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये पीडीएफ फाईल मध्ये डाउनलोड होईल
  • आता ही पावती नक्की तपासा आणि त्यावरील पुढील रिन्यूअल ची तारीख स्पष्टपणे दिलेली असेल ती तारीख लक्षात ठेवा आणि ही पावती तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव करून ठेवा कारण भविष्यामध्ये काही अपडेट आली तर कामात पडू शकते.

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

माहितीचा प्रकार तपशील
अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/
हेल्पलाइन / संपर्क क्रमांक022-26572631 / 022-26572632 / 022-26572633
ईमेल आयडीinfo@mahabocw.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बांधकाम कामगार नोंदणीचे Renewal कधी करावे लागते?

तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणीचे रिन्यूअल हे दरवर्षीच करावे लागत असते तुमची नोंदणी ज्या तारखेला झाली आहे ती तारीख संपण्यापूर्वी तुम्हाला पुढील वर्षासाठी रिन्यूअल प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

बांधकाम कामगार रिन्यूअल फी (Renewal Fee) किती आहे?

महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळाची Annual Subscription Fee 60/- रुपये इतकी आहे. आणि ही नोंदणी रिन्यूअल करताना तुम्हाला ही फी ऑनलाईन किंवा संबंधित केंद्राकडे भरावी लागते.

जर मी वेळेत नोंदणी Renewal केली नाही तर काय होईल?

जर का तुम्ही बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही दरवर्षी या योजनेची नोंदणी रिन्यू केली नाही तर तुम्हाला जे काही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ मिळतात जसे की शैक्षणिक आरोग्य तसेच आर्थिक मदत हे कोणतेही लाभ तुम्ही घेऊ शकत नाही कारण नोंदणी रेणू न केल्यास तुमची नोंदणी निष्क्रिय ठरवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *