Don’t Miss! लाडकी बहीण योजना E-KYC साठी Govt ची Last Warning! Ladki bahin yojana ekyc last date

ladki bahin yojana ekyc last date: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत हे महाराष्ट्र सरकार मार्फत देण्यात येते आणि महत्त्वाचं म्हणजे ही 1500 रुपयाची आर्थिक मदत महिलांच्या कुटुंबाचा एक मोठा आधार बनली आहे.

पण आता सरकारने या योजनेमध्ये एक मोठी अपडेट आणली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC पूर्ण करणे तर हो महिलांनो जर तुम्ही महाराष्ट्र शासनाने सांगितल्यानुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत E-KYC पूर्ण केली नाहीतर तुम्ही या योजनेच्या लाभापासून कायमचे वंचित राहू शकता आणि तुमचा अर्ज अपात्र देखील ठरू शकतो.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Overview)

मुद्दातपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
कोणामार्फत राबवली जातेमहाराष्ट्र राज्य शासन
लाभार्थीमहाराष्ट्रातील पात्र महिला
मिळणारे लाभदरमहा ₹1500
E-KYC शेवटची तारीख31 मार्च 2025
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
E-KYC अधिकृत GRअधिकृत GR LINK
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

तर भगिनींनो आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने गरजू गरीब महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सुरू केली आहे आता या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ठराविक अटी आणि निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांची रक्कम जमा करण्यात येते.

आता हा पैसा महिला त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच कुटुंबाच्या छोट्या-मोठ्या खर्चासाठी किंवा आरोग्य साठी खर्च करू शकतात हाच या योजनेमागे मुख्य उद्देश आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकार मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून हे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात म्हणजेच यामध्ये कोणीही मध्यस्थी नसतो थेट पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.

माझी लाडकी बहीण योजने’ची मुख्य उद्दिष्ट्ये

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याचे काम मुख्यमंत्री माझे लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून केले जाते.
  • महिलांना मिळणाऱ्या पैशांचा वापर महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करू शकतात तसेच पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील महिला या पैशांचा वापर करू शकतात जेणेकरून त्यांचं जीवनमान सुधारेल.
  • महिलांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पतीवर किंवा कुटुंबावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही
  • महिलांच्या हातामध्ये स्वतःचा पैसा आल्यामुळे ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांच्या कुटुंबातील आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी होऊ शकतात.

‘माझी लाडकी बहीण योजने’साठी पात्रता निकष

  • या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील महिलाच अर्ज करू शकतात.
  • अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे (म्हणजेच बघा जर 21 पेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय नसावे)
  • या योजनेसाठी विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटी महिला तसेच निराधार महिला आणि कुटुंबातील एक अविवाहित महिला अर्ज करू शकते.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹2,50,000 जास्त नसावे.
  • अर्जदार महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे बंधनकारक आहे.

E- KYC करण्यापूर्वी हे नक्की वाचा: लाडकी बहीण e-KYC च्या 4 मुख्य अडचणी

लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला अपात्र ठरतील

  • आता ज्या महिला महाराष्ट्र मध्ये राहतात आणि त्यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती उदाहरणार्थ पती किंवा स्वतः महिला इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  • महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  • महिलेच्या कुटुंबातील सदस्य पती किंवा पत्नी हे राज्य किंवा केंद्र सरकारचे कायमस्वरूपी कर्मचारी अधिकारी किंवा निमशास्त्रीय मंडळे महामंडळावर कार्यरत असतील तर अशा महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  • महिलेच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती माजी आमदार किंवा खासदार किंवा विद्यमान आमदार किंवा खासदार असतील अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असेल उदाहरणार्थ जीप, कार अशा महिलांना सुद्धा या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येईल पण महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर ट्रॅक्टर असेल तर त्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत.

लाडकी बहीण योजनेचे आर्थिक लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना मिळणारा आर्थिक लाभ अतिशय स्पष्ट आणि थेटपणे सरकारने सांगितला आहे या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम मिळते आणि ही रक्कम महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीच्या माध्यमातून जमा केली जाते आता ही मदत महिलेला दर महिन्याला दिली जाईल ज्यामुळे महिलांना एक नियमित आर्थिक आधार मिळेल.

मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही अटी आणि नियम तयार करण्यात आले आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे महिलांना E-KYC करणे बंधनकारक आहे जर एखाद्या पात्र महिलेने 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी जी महाराष्ट्र शासनाने अधिकृत जीआर मध्ये शेवटची तारीख दिलेली आहे या तारखेपूर्वी जर E-KYC कम्प्लीट केली नाही. तर त्या महिलेचे नाव लाभार्थी यादी मधून कायमचे वगळले जाईल कारण EKYC न केल्यास महाराष्ट्र सरकारला त्या महिलेची ओळख पटवता येणार नाही म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महिलेचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे की नाही हेच त्यांना समजणार नाही.

परिणामी EKYC पूर्ण न केलेल्या महिलांना अपात्र मानले जाईल आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांची रक्कम देखील जमा होणार नाही त्यामुळे हा नियम आर्थिक लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपयाची आर्थिक मदत ही दरमहा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावी यासाठी EKYC वेळेआधी पूर्ण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

E-KYC पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • महिलेचे आणि महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड: महिलांनो तुमची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे आणि याचाच वापर करून तुम्हाला E-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर: महिलांनो EKYC करताना तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक वन टाइम पासवर्ड येतो तो वन टाइम पासवर्ड अर्जामध्ये सबमिट केल्यानंतरच तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.

NOTE: जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक नसेल तर हा मोबाईल नंबर तुम्ही आधार कार्डशी लिंक कसा करू शकता याच्याबद्दल आपण सविस्तर माहितीचा लेख लिहिलेला आहे तुम्ही येथे क्लिक करून हा लेख संपूर्ण वाचा आणि तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या.

माझी लाडकी बहीण योजना E-KYC प्रक्रिया

  • E-KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत सरकारी पोर्टलवर भेट द्यायची आहे
  • त्यानंतर वेबसाईटच्या होम पेज वरती तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करा.
  • आता पहिल्या स्टेप मध्ये तुमचा वैयक्तिक 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका त्यानंतर कॅपच्या कोड टाका आता तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • आता बघा तुमच्या आधार कार्डशीट लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी वन टाइम पासवर्ड येईल.
  • हा आलेला OTP तुम्हाला वेबसाईटवर योग्यरीत्या भरायचा आहे.
  • आता परत तुमच्यासमोर दुसरे पेज ओपन होईल फक्त या पेजवर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
  • त्यानंतर परत सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबर वर वन टाइम पासवर्ड पाठवला जाईल तो व्हेरिफाय करा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • तुमचा वन टाइम पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती बरोबर असल्यास तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.

NOTE: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताय तर तुम्हाला कोणत्या अडचणी येऊ शकतात हे जाणून घ्या त्यानंतरच EKYC प्रक्रिया पूर्ण करा आता या अडचणीत समजून घेण्यासाठी येथे क्लिक करून संबंधित लेख शेवटपर्यंत वाचा

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

अधिकृत वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांक181
संबंधित विभागमहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

माझी लाडकी बहीण योजने’साठी E-KYC करणे बंधनकारक आहे का? 

हो महिलांना या योजनेची e-kyc करणे हे शंभर टक्के बंधनकारक आहे जर तुम्ही ekyc पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येईल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयाची रक्कम जमा होणार नाही कारण e-kyc द्वारे सरकार तुमची ओळख आणि तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्यासोबत लिंक आहे हे व्हेरिफाय करत असते.

E-KYC करण्याची शेवटची तारीख (Deadline) काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC प्रक्रिया तुम्हाला 31 मार्च 2025 पूर्वी पूर्ण करायची आहे म्हणजेच या तारखेच्या पहिलेच तुम्हाला ही केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे महिलांनो या तारखेची वाट पाहू नका कारण वेबसाईट वरती ट्राफिक वाढवू शकते आणि तुम्हाला केवायसी करण्यामध्ये अडचणी सुद्धा येऊ शकतात.

E-KYC करण्यासाठी काही पैसे (फी) लागतात का?

बघा महिलांनो सरकारी पोर्टलवर जर तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर वापरून ओटीपी द्वारे E-KYC पूर्ण करत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही ते पूर्णपणे मोफत आहे पण जर तुम्ही CSC सेंटर किंवा महा-ई-सेवा केंद्रावर गेलात तर ते फक्त तुमच्याकडून नाममात्र शुल्क घेऊ शकतात जे की 50 किंवा 100 रुपये असू शकते.

मी E-KYC केले, पण माझे बँक खाते आधारशी लिंक (NPCI) आहे की नाही हे कसे तपासू? 

तुमच्या बँकेच्या शाखेत (Home Branch) जाऊन तुम्ही ‘NPCI मॅपिंग’ किंवा ‘आधार सीडिंग’ झाले आहे का, हे विचारू शकता आणि नसेल तर करून घेऊ शकता. किंवा तुम्ही UIDAI (आधार) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘Check Aadhaar Bank Linking Status’ या पर्यायाद्वारे देखील हे तपासू शकता.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *