महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana” जाहीर केली आहे. ही योजना राज्यातील कोट्यावधी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी म्हणून त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याकरिता एक मोठा आधार देत आहे.
तसेच या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचे आरोग्य पोषण तसेच त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यास मदत करणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि यामुळे महिलांचे केवळ जीवनमानच उंचावणार नाही तर त्यांची कुटुंबातील आणि समाजातील भूमिका आणखी मजबूत होईल.
आणि नुकतेच या योजनेमध्ये सरकारने एक नवीन नियम जाहीर केला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट आणि आणि पारदर्शकपणे प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचावा याकरिता महाराष्ट्र सरकारने महिलांना E-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
E-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) या प्रक्रियेमुळे महिलेचे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर एकमेकांशी जोडले जातात म्हणजेच सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत कोणत्याही अडथळ्याशिवाय तसेच मध्यस्थी शिवाय थेट महिन्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता येते आणि फसवणुकीला काळा देखील बसतो म्हणूनच महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र महिलांना E-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) पूर्ण करणे बंधनकारक केला आहे आणि यासाठी दोन महिन्याचा कालावधी देखील देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Overview)
| योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील पात्र महिला |
| मुख्य लाभ | दरमहा ठराविक आर्थिक मदत थेट बँक खात्यात |
| अर्ज पद्धत (E-KYC) | योजनेचा लाभ घेण्यासाठी E-KYC करणे अनिवार्य |
| (E-KYC) प्रक्रिया शेवटची तारीख | EKYC प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरजू गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते महत्त्वाचे म्हणजे महिलांना त्यांच्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी कुटुंबावर किंवा इतर कोणावरती अवलंबून राहावे लागू नये यासोबतच आर्थिक दृष्ट्या महिलांना सक्षम करणे आणि त्यांच्या आरोग्यासाठी तसेच पोषणासाठी हातभार लावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून ठरवलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या आणि तसेच प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500/- रुपयाची रक्कम जमा करण्यात येते.
पण सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी काही प्रमुख अटी आणि नियम तयार केले आहे यामधील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अर्जदार महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे यासोबतच तिचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल व कुटुंबातील महिला विवाहित विधवा घटस्फोटित किंवा निराधार याच महिलांना या योजनेचा फायदा मिळतो मात्र ज्या महिलांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीवर असेल किंवा इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरत असेल तर तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात नाही.
आता थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे ही योजना महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे यामुळे महिलांना मिळणाऱ्या पैशातून महिला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तसेच स्वतः औषधीसाठी घरखर्चासाठी हातभार लावू शकतील आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे आणि कुटुंबात तसेच समाजात त्यांचे महत्त्व दृढ होण्यास मदत होत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची प्रमुख उद्दिष्ट्ये
- महाराष्ट्र सरकार मार्फत राज्यातील गरजू गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेमार्फत महिलांना आर्थिक आधार दिला जातो या योजनेची जर खूप उद्दिष्ट आहेत पण त्यापैकी मी तुम्हाला पाच महत्त्वाची उद्दिष्टे सांगणार आहे जे की खालील प्रमाणे आहेत.
- सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गरजू गरीब महिलांना दरमहा ठराविक रक्कम देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवणे जेणेकरून महिला त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतील आणि त्यांना परिवारावर किंवा समाजावर अवलंबून राहावे लागणार नाही.
- या योजनेमार्फत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे गरजू गरीब महिला त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर तसेच पोषणावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतील.
- महाराष्ट्र सरकारने महिलांना पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा देखील महिलेच्या हातात तिचा स्वतःचा पैसा आला तेव्हा कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयांमधील तिचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण झाला.
- गरजू गरीब महिला स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची समाजामध्ये स्थिती सुधारण्यास देखील मदत होते.
- तसेच या योजनेचा मुख्य उद्देश हा कोणत्याही मध्यस्थशिवाय थेट लाभ मात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करणे असा आहे जेणेकरून सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण होईल.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्रतेचे प्रमुख निकष
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्जदार महिला आहे महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे म्हणजेच तिच्याकडे संबंधित पुरावा उदाहरणार्थ रहिवासी दाखला असावा.
- अर्जदार महिलेची वयोमर्यादा 21 वर्षापेक्षा जास्त तर 65 वर्षापेक्षा कमी असावी.
- लाडकी बहीण योजनेचा अर्ज विवाहित, विधवा, घटस्फोटित, तसेच निराधार, महिला करू शकतात म्हणजेच त्या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे जर जास्त असल्यास महिलेला या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबीयांच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त सिंचनाखालील म्हणजेच बागायती जमीन नसावी.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन म्हणजेच कार जीप इत्यादी नसावे मात्र महिलेच्या कुटुंबीयांनी उदरनिर्वाहासाठी ट्रॅक्टर घेतले असेल अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र कोण असेल?
- ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य पती किंवा पत्नी जर आयकर भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येईल.
- जर अर्जदार महिला स्वतः सरकारी नोकरीवर असेल किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही सदस्य राज्य सरकार किंवा केंद्र सरकार त्या विभागातील कोणत्याही स्थानिक उपक्रमामध्ये स्वराज्य संस्थेमध्ये कायमस्वरूपी नोकरी पदावर असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणीही सदस्य माजी खासदार/आमदार असतील तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष/सदस्य पंचायत समिती अध्यक्ष/सदस्य किंवा इतर कोणत्याही नोंदणीकृत महामंडळामध्ये अध्यक्ष/संचालक असतील तर अशा महिलांना देखील या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.
- जर महिलेला कोणत्याही इतर शासकीय योजनेतून उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना या योजनांमधून दर महिन्याला पंधराशे रुपयांची रक्कम मिळत असेल तर अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येत आहे.
- महिलेच्या घरी जर मोठे व्यवसाय असतील म्हणजेच महिलेच्या कुटुंबातील सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट सारख्या नोंदणीकृत व्यवसायामध्ये असतील तर अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक लाभ कसा मिळतो
ज्या महिलांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत आणि ज्यांना सरकारने या योजनेमध्ये पात्र ठरवून 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे अशा महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची रक्कम मिळत असते म्हणजेच वर्षाला एकूण 18000 रुपयाचा आर्थिक लाभ त्यांना होतो हे पैसे सरकार कोणत्याही मध्यस्तीशिवाय थेट महिलांच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दर महिन्याच्या ठराविक तारखेला जमा करत असते.
या प्रक्रियेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) असे म्हणतात ज्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्ण पारदर्शकता राहते आणि या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च, तसेच दैनंदिनी गरजा भागवण्यासाठी आर्थिक आधार मिळतो. ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वालंबन वाढते आणि कुटुंबातील त्यांचे महत्त्व अधिक भरभक्कम होते.
योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhaar Card): हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे.
- पॅन कार्ड (PAN Card)
- मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate): हा एक महत्त्वाचा पुरावा आहे.
- रेशन कार्ड (Ration Card)
- वीज बिल किंवा पाणीपट्टी पावती (Electricity Bill/Water Bill)
- मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा तहसीलदाराने दिलेला अधिकृत दाखला.
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, ज्यावर अर्जदाराचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्टपणे दिलेला असेल.
- NOTE: बँक खाते अर्जदार महिलेच्या नावावरच असावे आणि ते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar-Seeded) असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो.
- अर्जदाराचा किंवा कुटुंबातील सदस्याचा चालू असलेला मोबाईल क्रमांक (जो आधार कार्डशी लिंक असल्यास उत्तम).
eKYC साठी सर्वात महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhaar Card): eKYC प्रक्रियेचा संपूर्ण आधारच ‘आधार कार्ड’ आहे. तुमची सर्व माहिती आधार डेटाबेसवरून घेतली जाते.
- आधार-लिंक्ड मोबाईल क्रमांक (Aadhaar-Linked Mobile Number): eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP (One Time Password) येतो. हा OTP टाकल्यानंतरच तुमची ओळख प्रमाणित होते.
हे नक्की वाचा: EKYC करत आहात तर या चार चुका करू नका अन्यथा योजनेचा लाभ बंद होईल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC कशी करावी
- सर्वात आधी शासनाने सांगितलेल्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या अधिकृत वेबसाईटवर जा.
- वेबसाईटच्या मुख्य पानावर (Homepage) दिसणाऱ्या ‘eKYC Banner’ वर क्लिक करा.
- उघडलेल्या eKYC फॉर्ममध्ये लाभार्थी महिलेने स्वतःचा आधार क्रमांक आणि पडताळणी कोड (Captcha) टाकावा.
- त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या आणि ‘Send OTP’ या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- तो OTP स्क्रीनवर टाकून ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
(या टप्प्यावर तुमची eKYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासले जाईल. जर ती पूर्ण नसेल आणि तुमचे नाव पात्र यादीत असेल, तर प्रक्रिया पुढे जाईल.)
- यानंतर, त्याच पेजवर लाभार्थी महिलेच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि पडताळणी कोड (Captcha) टाकावा.
- त्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन पुन्हा ‘Send OTP’ बटनावर क्लिक करा.
- आता तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधार-लिंक्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- तो OTP स्क्रीनवर टाकून ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर एक घोषणापत्र येईल. यामध्ये तुम्हाला खालील गोष्टी प्रमाणित कराव्या लागतील:
- जात प्रवर्ग निवडा.
- तुमच्या कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत किंवा निवृत्तीवेतनधारक नाही, यासाठी ‘होय’ निवडा.
- तुमच्या कुटुंबातील फक्त १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे, यासाठी ‘होय’ निवडा.
- शेवटी चेक बॉक्सवर क्लिक करून ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
सर्व प्रक्रिया यशस्वी झाल्यावर, स्क्रीनवर “Success तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा हिरव्या रंगात संदेश दिसेल. याचा अर्थ तुमची eKYC प्रक्रिया शासनाच्या नियमाप्रमाणे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
एकाच कुटुंबातील सासू आणि सून, दोघीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?
हो एकाच कुटुंबातील सासू आणि सून या योजनेसाठी अर्ज करू शकतात पण याच्यामध्ये एक अट आहे योजनेसाठी कुटुंब म्हणजेच पती आणि पत्नी आणि त्यांची अविवाहित मुळे त्यामुळे सासू आणि सून या दोन्ही पण वेगवेगळ्या कुटुंब म्हणून गणल्या जातात याच कारणामुळे सुनेचे कुटुंब नीतीचा पती आणि तिची मुले आहेत जर सासू आणि सून दोघेही या योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करत असतील जसे की त्यांचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल आणि इतरही सर्व अटी या सासु सुना पूर्ण करत असतील तर त्या दोघेही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात
मला विधवा पेन्शन योजनेचे दरमहा १००० रुपये मिळतात, तर मला या योजनेचे १५०० रुपये मिळतील का?
हो महिलांनो तुम्हाला या योजनेचा नक्कीच फायदा मिळेल शासनाच्या नियमानुसार तुम्हाला आधीच्या योजनेतून मिळणारी रक्कम आणि या योजनेत मिळणारी रक्कम यामध्ये खूप फरक आहे ती रक्कम दिली जाईल उदाहरणार्थ तुम्हाला विधवा पेन्शनचे हजार रुपये जर मिळत असतील तर सरकार या योजनेअंतर्गत तुम्हाला अतिरिक्त पाचशे रुपये देईल जेणेकरून तुमच्या खात्यात एकूण पंधराशे रुपये जमा होतील म्हणजेच तुम्हाला पंधराशे रुपयांची मासिक रक्कम शासनातर्फे मिळेल.
माझे eKYC अयशस्वी (Fail) होत आहे किंवा aadhar link मोबाईलवर OTP येत नाही, मी काय करावे?
असा प्रॉब्लेम अनेक महिलांना येत आहे पण पहिली शक्यता: तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तो लिंक असला तरी बंद असेल अशावेळी जवळच्या आदर केंद्रावर जाऊन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या
दुसरी शक्यता: मोबाईल नेटवर्कची असू शकते काही खेड्या भागात भारतामध्ये मोबाईलचे इंटरनेट खूप स्लो चालते यामुळे वेबसाईट ओपन होण्यास प्रॉब्लेम येतो
माझा अर्ज मंजूर (Approved) झाला आहे, पण माझ्या बँक खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत. कारण काय असू शकते?
याचा सर्वात मोठा कारण म्हणजे DBT सक्रिय नसणे बघा तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसेल किंवा DBT ट्रान्सफर सक्रिय नसेल याकरिता तुम्ही तुमच्या गावातील बँक शाखेत जाऊन आधार सेटिंग तसेच डी पी टी चा फॉर्म भरून घ्या.
आणि दुसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचे बँक खाते बऱ्याच काळापासून जर वापरले गेले नसेल तर ते इन-ऍक्टिव्ह मोड मध्ये जाते म्हणूनच बँकेत जाऊन बँक अकाउंट ची KYC करा आणि बँक खाते पुन्हा सुरू करून घ्या.
अर्ज भरण्यासाठी किंवा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणाला पैसे देण्याची गरज आहे का?
सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया ही विनामूल्य केली आहे तुम्ही जर स्वतः तुमच्या मोबाईलवरून कम्प्युटर वरून अर्ज करत असाल तर त्यासाठी कोणताही खर्च येत नाही पण जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरत असाल तर ते फक्त शासनाने ठरवलेले नाममात्र सेवाशुल्क म्हणजेच 20 ते 30 रुपये देऊ शकतात या व्यतिरिक्त कोणीही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुमच्याकडे जर पैशांची मागणी करत असेल तर ती मोठी फसवणूक आहे अशा व्यक्तीला पैसे देऊ नका किंवा त्याची सरकारकडे तक्रार करा
(E-KYC) प्रक्रिया शेवटची तारीख काय आहे
लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC प्रक्रिया हे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येईल.
माझे लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत यासंदर्भात
Mala paise pahije
Mala paise yet nahit
मला पैसे येत नाही.
Ladaki Bahin yovajana
Me vidhava mahila ahe ekyc kashi karaychi vadil Hayat nahit