नमस्कार मित्रांनो Pradhan Mantri Awas Yojana 2.0 हे केंद्र सरकारची गरजू गरीब लोकांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे तसेच या योजनेचा मुख्य उद्देश मध्यमवर्गीय कुटुंबाला त्याच्या हक्काचे स्वतःचे घर मिळवून देणे असा आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2015 मध्ये केली होती परंतु 2025-2026 मध्ये Pradhan Mantri Awas Yojana 2.0 लॉन्च करून केंद्र सरकारने यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहे.
मित्रांनो 2026 मधील नवीन अपडेट नुसार केंद्र सरकारने बजेटमध्ये वाढ देखील केली आहे आता शहरी आणि ग्रामीण भागातील अधिक लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत जर तुमच्या आता स्वतःचे घर नसेल तर हे अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण या अपडेट मध्ये योजनेचे नियम आणि अर्ज प्रक्रिया अगदी सोपी व पारदर्शक करण्यात आली आहे.
What is PMAY 2.0 Scheme In Marathi
मित्रांनो तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत सरकारकडून तुम्हाला घरी बांधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी Financial Assistance म्हणजेच आर्थिक मदत दिली जातेतसेच सरकारकडून या योजनेद्वारे पात्र नागरिकांना HOME LOAN च्या व्याजदरामध्ये सबसिडी दिली जाते किंवा नागरिकांना थेट 2.50 ते 03 लाखापर्यंतचे अनुदान प्रदान करण्यात येते आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मित्रांनो ही योजना प्रामुख्याने EWS (Economically Weaker Section) आणि LIG (Low Income Group) कॅटेगिरी मधील लोकांसाठी राबवली जात असते जेणेकरून त्या लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.
PMAY 2.0 Overview Table 2026
| Point | Details |
|---|---|
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (PMAY 2.0) |
| मंत्रालय/विभाग | गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) |
| लाभार्थी | बेघर कुटुंबे, EWS, LIG आणि मध्यमवर्गीय (MIG) |
| मुख्य लाभ | घर बांधण्यासाठी ₹2.5 लाख ते ₹3 लाख पर्यंत अनुदान |
| अर्ज पद्धत | Online (अधिकृत पोर्टल) आणि Offline (CSC केंद्र) |
| अधिकृत वेबसाईट | pmaymis.gov.in |
| Eligibility Check | तुम्ही पात्र आहात का हे तपासा येथे क्लिक करा |
| योजना अपडेट | 2026 नवीन बजेट आणि वाढीव उद्दिष्टे |
PMAY 2.0 योजनेचे मुख्य उद्देश
- भारतातील शहरे झोपडपट्टी मुक्त बनवणे आणि सर्व नागरिकांना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळवून देणे.
- घराची मालकी घरातील महिलेच्या नावावर किंवा संयुक्त नावावर ठेवण्यास नागरिकांना प्राधान्य देणे.
- जर तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न कमी असेल तर कुटुंबांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध करून देणे.
- भारतीय नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज पाणी आणि स्वच्छालय असलेल्या घरांची निर्मिती करून देणे.
PMAY 2.0 पात्रता निकष
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना 2.0 साठी अर्ज करण्याकरिता आणि या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही खाली दिलेले पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्जदार नागरिक हा भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- अर्जदार नागरिक जर EWS कॅटेगिरी मध्ये येत असेल तर त्याचे वार्षिक उत्पन्न हे 03 लाखापर्यंत असावे आणि जर तो LIG कॅटेगिरी मध्ये येत असेल तर त्याची वार्षिक उत्पन्न 03 लाख ते 06 लाखापर्यंत असावे.
- तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे.
- या योजनेअंतर्गत SC, ST, OBC, अल्पसंख्यांक आणि महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते.
Financial Benefits & Subsidy
- या योजनेतून मिळणारी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
- घर बांधण्यासाठी सरकारकडून साधारण ₹2,50,000 ते ₹3,00,000 पर्यंतची मदत मिळते.
- मित्रांनो जर तुम्ही बँकेकडून होम लोन घेतलेला असेल तर तुम्हाला व्याजावरती मोठी सवलत मिळते. ज्यामुळे तुमचा EMI देखील कमी होतो.
Required Documents List 2026
- Identity Proof: आधार कार्ड (Aadhaar Card) – अनिवार्य.
- Address Proof: मतदान कार्ड, रेशन कार्ड किंवा वीज बिल.
- Income Certificate: तहसीलदार किंवा अधिकृत विभागाकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला.
- Caste Certificate: जातीचा दाखला (लागू असल्यास).
- Bank Details: बँक पासबुक आणि कॅन्सल चेक (Subsidy जमा होण्यासाठी).
- Affidavit: स्वतःचे पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र.
- Photo: अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो.
PMAY 2.0 अर्ज कसा करावा? (Step-by-Step Application Process)
मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की PMAY 2.0 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2026 मध्ये पूर्णपणे सरकारने डिजिटल केली आहे आणि यासोबतच सोपी देखील केली आहे आता अर्जाच्या स्टेप्स कशा फॉलो करायच्या याची सविस्तर माहिती मी तुम्हाला खाली दिली आहे.
- Official Website वर जा: सर्वप्रथम pmaymis.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- Citizen Assessment निवडा: होमपेजवर ‘Citizen Assessment’ या पर्यायावर क्लिक करा.
- आधार व्हेरिफिकेशन: तुमचा 12 अंकी आधार नंबर आणि नाव टाका. आधार व्हेरिफाय झाल्याशिवाय फॉर्म उघडणार नाही.
- Application Form भरा: आता तुमच्यासमोर एक विस्तृत फॉर्म उघडेल. यामध्ये तुमचे नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि उत्पन्नाचा तपशील अचूक भरा.
- कागदपत्रे अपलोड करा: विचारलेली सर्व कागदपत्रे (आधार, उत्पन्न दाखला इ.) स्कॅन करून अपलोड करा.
- Form Submit करा: सर्व माहिती एकदा तपासून ‘Save’ किंवा ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- Application Number जपून ठेवा: अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक Application ID मिळेल, तो भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट करून ठेवा किंवा लिहून ठेवा.
NOTE: मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या भागातील जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन या योजनेचा अर्ज भरून घेऊ शकता फक्त अर्ज सबमिट झाल्यावरती CSC सेंटर वाल्याकडून एप्लीकेशन आयडी मिळेल तो जपून ठेवा.
सावधान! अर्ज करताना ‘या’ चुका टाळा
- तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे कारण अर्ज करताना व्हेरिफिकेशन साठी मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवण्यात येतो.
- तुमचे वार्षिक उत्पन्न जेवढे आहे ते खरी आणि व्यवस्थित माहिती द्या कारण चुकीची माहिती भरल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.
- मित्रांनो एकाच नावावरती दोन वेळा घरकुल साठी अर्ज करू नका असं केल्यामुळे डुबलीकेट एप्लीकेशन तयार होते आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
- बँक खात्याची माहिती भरताना तुमचे बँक खाते चालू स्थितीत आहे की नाही हे नक्की तपासा आणि महत्त्वाचे म्हणजे बँक खात्यासोबत आधार नंबर लिंक असावा.
PMAY Status कसे तपासावे?
- PMAY च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- ‘Track Your Assessment Status’ या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा Application ID किंवा नाव आणि मोबाईल नंबर टाका.
- ‘Submit’ करा, त्यानंतर तुमच्या अर्जाचे सध्याचे स्टेटस (Pending/Approved/Rejected) स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर नवीन यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही येथे क्लिक करून तपासू शकता – घरकुल योजनेच्या नवीन यादी मध्ये नाव तपासा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
PMAY 2.0 साठी उत्पन्नाची मर्यादा काय आहे?
EWS साठी ₹3 लाख आणि LIG साठी ₹6 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
भाड्याच्या घरात राहणारे लोक अर्ज करू शकतात का?
हो, जर तुमच्या नावावर भारतात कुठेही पक्के घर नसेल, तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता.
2026 मध्ये मिळणारी अनुदानाची रक्कम वाढली आहे का?
हो, नवीन बजेटनुसार काही विशेष श्रेणींसाठी निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Conclusion
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ही बेघर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे 2026 मधील नवीन अपडेट पुणे या योजनेची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत खऱ्या आणि गरजू लोकांनाच लाभ मिळवता यावा यासाठी निकष देखील शिथिल करण्यात आले आहे मित्रांनो जर तुमचे कागदपत्रे तयार असतील तर आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि आपल्या स्वप्नातील घर मिळवण्यासाठी एका नवीन दिशेने पाऊल टाका.