लाडकी बहीण Update: e-KYC चं टेंशन संपणार! Portal मध्ये झाला मोठा बदल (Ladki Bahin Yojana EKYC Update)

Ladki Bahin Yojana EKYC Update: नमस्कार महिलांनी या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते अशा लाखो महिलांकरिता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जसे की तुम्हाला माहिती आहे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने महिलांना EKYC करणे बंधनकारक केले होते पण अनेक महिलांना EKYC करताना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता यामध्ये मुख्य अडचण म्हणजे वेबसाईटचे सर्वर डाऊन असणे किंवा अर्ज भरल्यानंतर मोबाईल वरती ओटीपी न येणे अशा बऱ्याच तांत्रिक अडचणी येत होत्या.

आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट न्यूज चैनल च्या माध्यमातून दिली आहे त्यांनी असे सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती आम्ही काही महत्त्वाचे बदल करत आहोत असे सांगितले तर आता हे महत्त्वाचे बदल कोणते होणार आहेत आणि लाडक्या बहिणींना या बदलांचा काय फायदा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

Overview

विषयमाहिती
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
संबंधित मंत्रीआदिती तटकरे (महिला व बालविकास)
सध्याची अडचणe-KYC करताना तांत्रिक अडचणी (Server Down, OTP)
मोठी अपडेटवेबसाइटमध्ये तांत्रिक बदल केले जात आहेत
e-KYC अंतिम मुदत१८ नोव्हेंबर २०२५

मंत्री आदिती तटकरेंनी काय माहिती दिली? 

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना असे स्पष्ट केलं की महिलांना ekyc करताना येणाऱ्या अडचणींची सरकारला पूर्ण जाणीव आहे आणि याच मुख्य अडचणी दूर करण्यासाठी आम्ही वेबसाईट मध्ये काही तांत्रिक बदल करणार आहोत.

मंत्री अदिती तटकरे यांनी असा स्पष्ट केला आहे की ekyc प्रक्रियेत अनेक महिलांना ज्या तांत्रिक अडचणी येत होत्या आता यावरती कायमस्वरूपी तोडगा करण्याकरिता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर आवश्यक ते बदल केले जात आहेत आणि यामुळे काही काळ प्रक्रिया Slow पाठवू शकते पण लवकरच EKYC प्रक्रिया अधिक सुरळीत होईल.

ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांसाठी सर्वात मोठी अपडेट

लाडकी बहीण योजना EKYC वेबसाईट अपडेट मधील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांनो आता ज्या महिलांना वडील किंवा पती नाही किंवा ज्या महिलांचे लग्न झाले असून सध्या त्यांचा divorce झालेला आहे अशा महिलांना अर्ज भरताना किंवा EKYC करताना अनेक कागदपत्रांच्या अडचणी येत होत्या.

आता अशा महिलांची देखील दखल सरकार मार्फत घेतली जाणार आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट मध्ये स्वतंत्र पर्याय किंवा विशेष तांत्रिक बदल केले जाणार आहेत जेणेकरून एकही पात्र महिला कागदपत्रांच्या अभावी किंवा तांत्रिक चुकीमुळे त्या योजनेपासून वंचित राहणार नाही.

EKYC का होत नव्हते? 

महिलांना गेल्या काही दिवसापासून EKYC करण्यासाठी एकाच वेळी लाखो महिलांनी लाडकी पण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रचंड गर्दी केली होती आणि याच गर्दीमुळे सर्वर वरती प्रचंड ताण आला होता आता यामुळे वेबसाईट वारंवार बंद पडणे, तसेच ओटीपी उशिरा येणे, आणि महत्त्वाचे म्हणजे काही महिलांचे तर अर्जच सबमिट होत नव्हते आता हाच ताण कमी करण्यासाठी आणि ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी वेबसाईट मध्ये बरेच तांत्रिक बदल केले जात आहेत.

आता महिलांनी काय करावे?

महिलांनो तुमची अद्याप देखील केवायसी झाली नसेल किंवा होत नसेल तर घाबरू नका कारण महाराष्ट्र सरकार स्वतः वेबसाईट मध्ये अनेक बदल करत आहे. दोन-तीन दिवसांनी हे तांत्रिक बदल पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुमची केवायसी अगदी सहज पद्धतीने पूर्ण होऊन जाईल केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे आणि ही मुदत सरकारमार्फत वाढवून देखील दिली जाऊ शकते कारण बऱ्याच महिलांची केवायसी वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण झाली नाही.

केवायसी करताना तुम्हाला दोन मुख्य कागदपत्रांची गरज पडते एक म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि दुसरे म्हणजे तुमच्या पतीचे आधार कार्ड आणि हे दोन्ही आदर करा अधिकृत मोबाईल नंबर सोबत लिंक असणे आवश्यक आहे कारण केवायसी करताना मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जातो आणि याच ओटीपी च्या आधारे तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होते.

आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील या जगामध्ये नाहीत त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा महिलांसाठी लवकरच लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती मुख्य बदल केले जाणार आहेत म्हणून अशा महिलांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता चुकीच्या पद्धतीने केवायसी करण्याचा प्रयत्न करू नये.

Conclusion

महिलांनो महाराष्ट्र सरकार लाडके बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत गंभीर असून वेबसाईट मधील बऱ्याच तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे मंत्री अदिती तटकरेच्या या माहितीमुळे लाखो महिलांना एक मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे EKYC प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल अशी महिलांमध्ये अपेक्षा आहे.

महिलांनो आमची छोटीशी मदत करण्यासाठी तुम्ही हा महत्त्वाचा लेख तुमच्या भागातील केवायसी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना नक्की पाठवा जेणेकरून तुमच्या या छोट्याशा मदतीमुळे त्यांना महाराष्ट्र सरकार मार्फत मिळणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचा आर्थिक लाभ सुरळीत मिळत राहील तसेच केवायसी बाबत तुम्हाला काही अडचणी येत असल्यास तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुमच्या अडचणी मांडू शकता जेणेकरून आम्ही तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *