PM फसल विमा योजना: ‘ही’ 1 चूक करू नका, नाहीतर अर्ज 100% रद्द होईल! PM Fasal Bima Yojana

केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात, पण काही वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे अवकाळी पावसामुळे कीटक किंवा पिकावर आलेल्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार मार्फत भारतातील शेतकऱ्यांसाठी Pradhan Mantri Fasal Bima Yojana ही 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती.

ही एक अशी योजना आहे जी विविध दुर्दैवी घटनांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानी विरुद्ध विम्याच्या मार्फत संरक्षण देते. ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे अवकाळी पाऊस, पिकावरील रोग, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते अशा शेतकऱ्यांना पिक विमा मार्फत मदत मिळून संरक्षण दिले जाते.

ही योजना “एक राष्ट्र, एक पीक, एक प्रेमियम,” या ब्रीद वाक्याखाली कार्यरत आहे तसेच भारतातील शेतकऱ्यांना परवडणारे पिक विमा प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Overview

योजना नावप्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY)
सुरुवात2016
अंमलबजावणी करणारे मंत्रालयकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार
उद्दिष्टपिकांचे नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक संरक्षण
शेतकरी प्रीमियम दरखरीप – 2%
रब्बी – 1.5%
बागायती/व्यावसायिक पिके – 5%
उर्वरित प्रीमियमकेंद्र व राज्य सरकारकडून भरला जातो
लाभार्थीसर्व शेतकरी (भाडेकरू व स्वामित्व हक्कधारक)
अर्ज प्रक्रियाबँक / CSC केंद्र / अधिकृत पोर्टल pmfby.gov.in
मुख्य लाभपिकाचे नुकसान झाल्यास विमा रक्कम मिळते
Pradhan Mantri Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा उद्देश

  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरून काढणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेती करण्यास प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पन्न अगदी स्थिर ठेवणे.
  • आजच्या काळातील आधुनिक शेती पद्धती तसेच गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे प्रमुख फायदे / लाभ

प्रधानमंत्री फसल विमा योजने करिता पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सरकारमार्फत अनेक फायदे मिळतात जसे की जर शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल, तर त्याला नुकसानीवर पिकाचे विमा कवच मिळतं. तसेच अगदी कमी दरात प्रीमियम उपलब्ध करून दिले जाते जसे की खरीप पिकासाठी 2% जर रब्बी पिके असतील तर 1.5% आणि वार्षिक तसेच व्यावसायिक पिकांसाठी 5% आणि जर आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास तर नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतातील सर्व शेतकरी या योजनेकरिता अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पात्रता निकष

  • जर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर भारतातील लहान सामंत मोठे शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.
  • शेतकऱ्यांना रब्बी खरीप व वार्षिक तसेच व्यावसायिक पिकांचा विमा अगदी कमी प्रीमियम भरून काढता येतो.
  • लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डाचे लिंक असणे आवश्यक आहे.
  • जर शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कृषी कर्ज घेतलेलं असेल अथवा घेतलेलं नसेल असे दोन्ही शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेची आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • शेतीचा सातबारा उतारा / जमीन मालकी हक्काची कागदपत्रे
  • लागवडीचा पुरावा (पिकाची पेरणी माहिती)
  • पासपोर्ट साईझ फोटो

प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम भारत सरकारच्या pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • यानंतर Farmer Corne नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
  • आता अर्जामध्ये विचारली जाणारी आवश्यक ती वैयक्तिक माहिती तसेच योग्य कागदपत्रे अपलोड करा.
  • यासोबतच पिकाची माहिती व विमा योजना निवडा.
  • आणि अर्ज सबमिट करून अर्जाचा क्रमांक जतन करून ठेवा.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

ज्या शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे असे शेतकरी खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात:

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या बँकेमध्ये किंवा सहकारी संस्था किंवा CSC केंद्रात संपर्क साधावा लागेल.
  • तेथे संबंधित अधिकाऱ्याकडून अर्ज मागवा आणि व्यवस्थितरित्या अर्ज भरा या सोबतच अर्जासोबत लागणारी कागदपत्रे जोडा.
  • अर्ज भरून झाल्यानंतर व्यवस्थित रित्या चेक करा आणि अर्जावरती स्वाक्षरी करा.
  • आता अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करा आणि अर्ज स्वीकारल्याची पावती घ्या.

महत्वाच्या तारखा (2025)

  • खरीप हंगामासाठी अर्जाची शेवटची तारीख: 31 जुलै 2025
  • रब्बी हंगामासाठी अर्जाची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2025

हेल्पलाइन क्रमांक / संपर्क माहिती

शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेविषयी अधिक सविस्तर माहिती तसेच अर्ज भरताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या याची माहिती आणखी सविस्तरपणे पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांक किंवा ईमेल द्वारे संपर्क करून थेट शासनाकडून माहिती मिळवू शकता:

राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक1800-180-1551
ई-मेलhelp.agri@gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रधानमंत्री फसल विमा योजनेत कोण अर्ज करू शकतो?

भारतातील सर्व शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात तसेच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो

विमा प्रीमियम किती आहे?

खरीप पिके 2%, रब्बी पिके 1.5%, व्यावसायिक पिके 5%.

भरपाईची रक्कम कुठे जमा होते?

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो

ही योजना कोणत्या पिकांसाठी लागू आहे?

जे शेतकरी खरीप रब्बी तसेच वार्षिक व व्यावसायिक पिकांची शेती करतात असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *