ladki bahin yojana kyc problem: लाडक्या बहिणींनो तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहात का? पण E-KYC करताना OTP मोबाईल वरती येत नाही, कधी कधी तर अचानक वेबसाईट बंद पडते, आणि KYC करताना ची सर्वात मोठी समस्या म्हणजे पती किंवा वडिलांच्या आधार कार्ड विषयी माहिती भरताना गोंधळ उडतो. अशा अनेक समस्यांनी तुम्ही देखील त्रस्त झाला आहात का?
जर तुमचे उत्तर हो असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्ही एकट्या नाही आहात सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो-भागिनींना याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पण सर्वात आधी समजून घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची EKYC करणे का महत्त्वाचे आहे? तर बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या योजनेमार्फत मिळणारे पंधराशे रुपये खऱ्या आणि पात्र लाभार्थी महिलेपर्यंतच पोहोचावे तसेच या योजनेतील गैरप्रकार टाळले जावेत आणि महत्त्वाचं म्हणजे बोगस लाभार्थी या योजनेमधून अपात्र व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने E-KYC करणे बंधनकारक केला आहे आता या ई केवायसी द्वारे महाराष्ट्र सरकारची सुनिश्चित करते की तुम्हीच या योजनेच्या खऱ्या लाभार्थी आहात त्यामुळे योजनेचा लाभ आणि योजनेमार्फत मिळणारे पंधराशे रुपये नियमित सुरू ठेवण्यासाठी E-KYC करणे बंधनकारक केला आहे.
तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल महाराष्ट्र सरकारने इ केवायसी करणे बंधनकारक केला आहे तर मग या अडचणी का बर येत आहेत? तर बघा लाडक्या बहिणींनो E-KYC महत्वाची असली तरी ती सध्या ऑनलाईन पद्धतीने करताना महिलांना प्रचंड त्रास होत आहे याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामधील लाखो महिला ही केवायसी करण्यासाठी या अधिकृत वेबसाईटला भेट देत आहेत त्यांचा अर्ज भरत आहेत आणि याच कारणामुळे वेबसाईटच्या सर्वर वरती प्रचंड LOAD येतो. त्यामुळे वेबसाईट कधी स्लो चालते तर कधी बंदच दाखवते याचमुळे अर्ज भरताना OTP न येणे अशा गंभीर तांत्रिक अडचणी आपल्याला सामोरे जावे लागत आहे.
तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडके बहिण योजनेची EKYC करताना येणाऱ्या सहा मुख्य अडचणी कोणत्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तसेच या अडचणींना सामोरे जाऊन तुम्ही तुमची ही केवायसी अगदी यशस्वीरित्या कशी पूर्ण करू शकता याची देखील माहिती आज आपण समजून घेणार आहोत. म्हणून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर रित्या जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Overview
| मुद्दा | माहिती (सोप्या भाषेत) |
| योजनेचे नाव | माझी लाडकी बहीण योजना |
| मुख्य लाभ | राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम (हप्ता) आर्थिक मदत म्हणून दिली जाते. |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शासनाने ठरवलेल्या अटी व निकषांनुसार पात्र असलेल्या महिला व भगिनी. |
| राज्य | महाराष्ट्र |
| सध्याची महत्त्वाची अपडेट | योजनेचे पैसे (हप्ते) सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना e-KYC करणे बंधनकारक आहे. ज्या महिला KYC करणार नाहीत, त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात. |
| E-KYC प्रक्रिया शेवटची तारीख | 18 नोव्हेंबर 2025 |
OTP न येणे (सर्वात मोठी अडचण)
बऱ्याच लाडक्या बहिणी केवायसी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट देत आहेत अर्ज देखील व्यवस्थित रित्या भरत आहेत पण अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांक टाकल्यावर तसेच केकच्या भरल्यावर ती GET OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणींच्या मोबाईल वरती ओटीपी येत नाही याचे दोन कारणे असू शकतात पहिलं म्हणजे वेबसाईटच्या सर्वर वरती प्रचंड लोड असतो तुम्ही e-kyc साठी अर्ज भरता आणि दुसरा आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचा आधार कार्ड क्रमांक हा तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक असायला हवा. तरच तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.
सर्व्हर डाउन / वेबसाईट क्रॅश
महाराष्ट्र मधील लाखो महिला एकाच वेळी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देत होत्या तसेच वेबसाईट वरती लॉगिन करत होत्या याच कारणामुळे एकाच टाईमला जास्त ट्राफिक वेबसाईट वरती आल्यामुळे तसेच एकाच टाईमला जास्त लॉगिन वेबसाईट वरती झाल्यामुळे मुख्यमंत्री माझे लाडके बहिण योजनेची वेबसाईट वारंवार क्रॅश होत होती तसेच बंद देखील पडत होती त्यामुळे वेबसाईटवर सतत एरर दिसत होतं किंवा वेबसाईट स्लो चालत होती. पण नवीन अपडेट नुसार आता महाराष्ट्र सरकारने या वेबसाईटवर ती बरेच बदल केले आहेत आणि महाराष्ट्र सरकारचे असे सांगणे आहे की वेबसाईट वरती बदल केल्यामुळे आता वेबसाईट अगदी सुरळीत पद्धतीने चालत आहे त्यामुळे लाडक्या बहिणी कोणत्याही टाईमला आणि केव्हाही e-kyc करू शकतात.
पती/वडील हयात नसल्यास काय करायचे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांच्या मनात येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वडील किंवा पती या जगामध्ये नसतील तर आम्ही कोणाचे आधार कार्ड वापरून e-kyc करावी कारण E-KYC करताना महाराष्ट्र सरकारने वेबसाईट मध्ये अशा प्रकारचे कुठलेही ऑप्शन दिले नाहीत जेणेकरून महिला इतर मार्गाने E-KYC पूर्ण करू शकतील. आणि अशा महिलांनी अद्याप देखील त्यांचीही केवायसी पूर्ण केली नाही पण हीच जाणीव आता सरकारला झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अशा महिलांसाठी वेबसाईट वरती नवीन ऑप्शन ऍड करायचे काम सुरू केले आहे त्यामुळे ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत अशा महिलांनी कोणतीही चुकीची पद्धत वापरून E-KYC करण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकारकडून E-KYC करण्याचा सोपा मार्ग दिला जाईल तोपर्यंत तुम्ही कोणतीही काळजी करू नका.
मी e-KYC करण्याचा प्रयत्न करत होते, पण ती अर्ध्यावरच राहिली (Error आला)
तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही देखील E-KYC करण्याचा प्रयत्न करत होत्या पण वेबसाईट बंद पडल्यामुळे वेबसाईट वरती जास्त लोड असल्याकारणाने ती क्रश झाल्यामुळे तुमची E-KYC अर्ध्यातच थांबली असेल किंवा इतर कोणता एरर आला असेल तर ती प्रक्रिया अधिकृतपणे थांबली आहे म्हणूनच तुमचा अर्धा राहिलेला अर्ज महाराष्ट्र सरकार ग्राह्य धरणार नाही त्यामुळे तुम्हाला ही केवायसी करण्याचा पुन्हा प्रयत्न करायचा आहे आणि E-KYC यशस्वीरित्या पूर्ण करायचे आहे. आता हे E-KYC यशस्वीरित्या पूर्ण कशी करावी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर द्यायची आहे यावरती आपण सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणूनच ई-केवायसी व्यवस्थित रित्या कशी पूर्ण करायची हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
माहितीत चूक दुरुस्त न करता येणे (No ‘Edit’ Option)
लाडक्या बहिणींनो एकदा का तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-kyc यशस्वीरित्या पूर्ण केले आणि पूर्ण केल्यानंतर तुमच्या लक्षात आले की अर्ज भरताना आपल्याकडून चुका झाल्या होत्या आणि आता जर तुम्हाला अर्जामध्ये दुरुस्ती करायची असेल तर अद्याप सरकारने येथे चूक दुरुस्त करायचे ऑप्शन दिलेले नाहीत त्यामुळे अर्ज भरताना तसेच प्रश्नांची उत्तरे देताना अगदी व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक द्या कारण तुम्ही चुकीचा अर्ज सबमिट केला तर तुम्हाला मिळणारा पंधराशे रुपयांचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो.
Conclusion
तर लाडक्या बहिणींनो आजच्या या लेखांमध्ये आपण E-KYC करताना तुम्हाला कोणत्या अडचणी येत होत्या आणि त्या अडचणींवर मात करून तुम्ही केवायसी यशस्वीरित्या कशी पूर्ण करू शकता याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली तर आता ही महत्त्वाची माहिती तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना तसेच व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा जेणेकरून कोणत्या गरजू गरीब महिलेकडून E-KYC करताना चूक होणार नाही आणि सरकारकडून मिळणारा 1500/- रुपयांचा लाभ त्या लाडक्या बहिणींना व्यवस्थित मिळेल.
हे नक्की वाचा: Sukanya Samriddhi Yojana 2025: मुलीच्या भविष्यासाठी Best Investment Plan!