ऑक्टोबरचा ₹1500 चा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात! E-KYC नसलेल्यांचे काय? Ladki bahin Yojana October installment

ladki bahin Yojana October installment: नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तर महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी ऑक्टोबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत होत्या तर आता सरकारने ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठे अपडेट जाहीर केले आहे.

तर ताज्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हे पैसे लवकरच तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतील. पण तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींनी अद्यापही केवायसी केली नसेल त्यांना पैसे मिळतील का?

तसेच या योजनेबद्दल आणखी महत्त्वाचे अपडेट्स काय आहेत असे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणूनच लेख शेवटपर्यंत वाचा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Overview

मुद्दातपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला (ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा कमी आहे)
मुख्य लाभदरमहा ₹1500 थेट बँक खात्यात (DBT) जमा
अर्ज पद्धतऑनलाइन (अधिकृत पोर्टलद्वारे) आणि ऑफलाइन (उदा. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्या मदतीने)

माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केली ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच त्यांच्या आरोग्याचा आणि पोषणाचा स्तर उंचावणे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबातील त्यांची निर्णय क्षमता अधिक बळकट करणे. मित्रांनो अनेकदा महिलांना लहान-सहान गोष्टींसाठी कुटुंबातील इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते आता हाच आर्थिक अडथळा दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयाची रक्कम जमा करण्यात येते आणि ही रक्कम थेट कोणतेही मध्यस्थी न ठेवता महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीमार्फत ट्रान्सफर करण्यात येते.

योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत थेट पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते आताही रक्कम कोणत्याही मध्यस्थशिवाय Direct Benefit Transfer – DBT महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारमार्फत पाठवले जाते याचा अर्थ थेट पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतात यामुळे पैशांचा व्यवहार पूर्ण पारदर्शक राहतो आणि लाभाची संपूर्ण रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते.

ऑक्टोबर हप्त्याबद्दल विशेष अपडेट

लाडक्या बहिणींनो तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलच्या पोस्टच्या माध्यमातून असे सांगितले आहे की ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे याचा अर्थ लवकरात ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील आणि विशेष म्हणजे ज्या महिलांचे अद्यापही केवायसी पूर्ण झालेले नाही त्यांना सुद्धा ऑक्टोंबर मिळण्याचा लाभ मिळणार आहे.

विभागाने जाहीर केले आहे की, हप्ते दरमहा 15 तारखेनंतर वाटप होतात. आज 9 ऑक्टोबर 2025 असल्याने, 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान पैसे बँक खात्यात जमा होतील. हा हप्ता फक्त 1500 रुपये आहे, 3000 नाही. eKYC पूर्ण असेल तर पैसे लगेच येतील. काही वेळा तांत्रिक कारणांमुळे 10-15 दिवसांचा उशीर होऊ शकतो, पण बहुतांश बहिणींना 15 ऑक्टोबरनंतर मिळेल.

पण महिलांना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्टोबर महिन्याचा लाभ तर तुम्हाला मिळेलच पण यापुढील नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला E-KYC करणे बंधनकारक आहे आणि हे सरकारने अनिवार्य देखील केले आहे जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सुरळीतपणे सुरू ठेवायचा असेल तर येथे क्लिक करा आणि E-KYC बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

लाडकी बहिणी योजना महत्त्वाची माहिती

कोणत्या महिला अपात्र होणार? सविस्तर माहिती
लाडकी बहिण EKYC कशी करावी?सविस्तर माहिती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

माझ्या बँक खात्यात हप्ता जमा झाला नाही, तर काय करावे?

सर्वात आधी, तुमचे बँक खाते आधार कार्डशी योग्यरित्या लिंक (DBT Enabled) आहे का ते तपासा. तसेच, तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, हे सुनिश्चित करा. सर्व काही बरोबर असूनही पैसे आले नसल्यास, तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) अधिकृत पोर्टलवर तपासा किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात चौकशी करा.सर्वात आधी, तुमचे बँक खाते आधार कार्डशी योग्यरित्या लिंक (DBT Enabled) आहे का ते तपासा. तसेच, तुमची E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, हे सुनिश्चित करा. सर्व काही बरोबर असूनही पैसे आले नसल्यास, तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) अधिकृत पोर्टलवर तपासा किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात चौकशी करा.

एकाच कुटुंबातील सासू आणि सून, दोघींनाही लाभ मिळू शकतो का?

होय, नक्कीच मिळू शकतो. ही योजना ‘प्रति कुटुंब एक महिला’ अशी नसून, ‘प्रति पात्र महिला’ आहे. जर सासू आणि सून दोघीही २१ ते ६५ वयोगटात असतील आणि योजनेच्या इतर सर्व अटी (उदा. कुटुंबाचे एकूण उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणे) पूर्ण करत असतील, तर त्या दोघीही स्वतंत्रपणे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करायचा?

तुम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर (Portal) जाऊन स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकता. जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करणे शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेची, ग्रामसेवकाची किंवा ‘आपले सरकार’ सेवा केंद्राची मदत घेऊनही अर्ज सहजपणे भरू शकता.

Conclusion

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे फक्त महिलांना केवळ दरमहा आर्थिक मदत देणारीच योजना नाही तर महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणारी देखील आहे त्यांना मिळणारी पंधराशे रुपयाची आर्थिक मदत महिलांना त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता व आरोग्यासाठी खर्च करण्याचे स्वातंत्र्य देते.

महिलांना जर तुम्ही देखील या योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये बसत असाल तर अजिबात उशीर करू नका सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडा गोळा करा जसे की तुमचे आधार कार्ड तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचे आधार कार्ड आणि तुम्ही जर अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचे आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे गोळा करून तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून पुढील मिळणारे हप्ते अगदी सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *