WRD Recruitment: विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकार तर्फे आनंदाची बातमी समोर आली आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत होते अशा तरुणांसाठी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागामार्फत तब्बल 14,051 रिक्त पदांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या भरती प्रक्रियेमध्ये वेग देखील आला आहे आणि तसेच लवकरच याची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध होणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही देखील दहावी बारावी पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असाल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे साध्य आहे म्हणूनच आज या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या भरतीचे पात्रता पदे काय असणार आहेत आणि भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करावी याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जलसंपदा विभाग भरती 2026 – Quick Information Table
| माहिती वर्णन | तपशील |
|---|---|
| योजना/भरती नाव | जलसंपदा विभाग भरती 2026 (WRD Recruitment) |
| सरकार | महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) |
| संबंधित विभाग | जलसंपदा विभाग (Jalsampada Vibhag) |
| एकूण रिक्त पदे | १४,०५१ (गट ‘क’ आणि गट ‘ड’) |
| लागू राज्य | महाराष्ट्र |
| प्रमुख लाभार्थी | सुशिक्षित बेरोजगार, पदवीधर, डिप्लोमा धारक |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
| निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा (IBPS द्वारे अपेक्षित) |
| अधिकृत वेबसाइट | wrd.maharashtra.gov.in |
| नवीन अपडेट 2026 | मुख्यमंत्र्यांकडून 14,000+ पदांच्या भरतीला हिरवा कंदील |
WRD Recruitment Latest News 2026
विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 2026 च्या सुरुवातीलाच महाराष्ट्र विधानसभेमध्ये जलसंपदा विभागातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला होता आणि त्यामध्ये असे स्पष्ट झाला आहे की Group C साठी 8446 पदे भरली जाणार आहेत. आणि या सोबतच Group D साठी 5,605 मध्ये भरली जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS (Institute of Banking Personnel Selection) या नामांकित संस्थेमार्फत राबवली जाण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे सर्व भारतीय प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडेल.
आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कनिष्ठ अभियंता पदांसाठी सर्वाधिक 2,200 पेक्षा जास्त जागा रिक्त असल्याचे RTI अहवाला मधून समोर आले आहे.
जलसंपदा विभाग भरती काय आहे
विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग हा महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो जो राज्यातील धरणांचे व्यवस्थापन सिंचन आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन करत असतो गेल्या काही वर्षापासून या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत होती त्यामुळे कामाचा ताण कमी करण्याकरिता आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याकरिता महाराष्ट्र सरकारने ही मेगा भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला.
जलसंपदा विभाग भरती Eligibility Criteria
विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे की तुम्ही खाली दिलेल्या माहितीनुसार तपासू शकता.
वयोमर्यादा
- किमान वय: १८ वर्षे.
- खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय: ३८ वर्षे.
- राखीव प्रवर्गासाठी (SC/ST/OBC): ४३ वर्षांपर्यंत सवलत.
- दिव्यांग/माजी सैनिक: ४५ वर्षांपर्यंत सवलत.
शैक्षणिक पात्रता
- कनिष्ठ अभियंता (JE): स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी (Civil Engineering Diploma/Degree).
- लिपिक/टंकलेखक (Clerk): कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी (३० श.प्र.मि.) आणि इंग्रजी (४० श.प्र.मि.) टायपिंग.
- कालवा निरीक्षक/दप्तर कारकून: १० वी/१२ वी पास किंवा पदवी.
- गट ‘ड’ पदे: १० वी उत्तीर्ण.
जलसंपदा विभाग भरतीचे मुख्य फायदे
- महाराष्ट्र सरकारची कायमस्वरूपी नोकरी आहे
- सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पगार आणि भक्त दिले जातात.
- जलसंपदा विभागामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करण्याची संधी मिळते.
- आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेनुसार प्रमोशनची संधी सुद्धा मिळते.
जलसंपदा विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (ओळखपत्रासाठी).
- शाळा सोडल्याचा दाखला (LC) किंवा १० वी चे सनद (जन्मतारखेचा पुरावा).
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (Degree/Diploma).
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) – आवश्यक असल्यास.
- नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer).
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate – महाराष्ट्र रहिवासी).
- पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (Signature).
जलसंपदा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करावी
- या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता होमपेज वरती दिलेल्या सरळ सेवा भरती या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करा.
- लॉगिन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती अचूक पद्धतीने भरा.
- आता आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि डिजिटल सिग्नेचर अपलोड करा.
- आता अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा यासाठी तुम्ही नेट बँकिंग यूपीआय किंवा कार्डचा वापर करू शकता.
- आता फॉर्म सबमिट करा आणि याची प्रिंटआऊट काढून ठेवा.
संपर्क आणि हेल्पलाईन
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अर्ध भरताना काही अडचण आली किंवा इतर काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही थेट महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागासोबत या अधिकृत माध्यमातून संपर्क साधू शकता.
- अधिकृत वेबसाइट: wrd.maharashtra.gov.in
- ईमेल: support.wrd@maharashtra.gov.in
- पत्ता: जलसंपदा विभाग, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई – 400032.
महत्वाचे प्रश्न
जलसंपदा विभाग भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण १४,०५१ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
परीक्षा कोण घेणार आहे?
अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, ही परीक्षा IBPS मार्फत घेतली जाण्याची शक्यता अधिक आहे.
कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्रता काय आहे?
स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) मधील पदविका (Diploma) किंवा पदवी अनिवार्य आहे.
Conclusion
विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जलसंपदा विभाग भरती 2026 ची महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नोकर भरती ठरणार आहे जर तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात असाल किंवा पदवीधर असाल तर असायला सुरुवात करणे हे आणि ही केवळ करिअर घडवणे मोठी संधी तुमच्यासाठी आहे आणि मित्रांनो आनंदाची बाब म्हणजे या भरतीची अधिकृत जाहिरात लवकरच महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्ध केली जाणार आहे आणि याची LINK आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून प्रसिद्ध करणार आहोत.