PM Internship Scheme 2026: दरमहा ₹5000 विद्यावेतन! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख

PM Internship Scheme: विद्यार्थी मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशामध्ये बेरोजगारी आणि तरुणांकडे असलेल्या व्यवहारिक कौशल्याचा अभाव आहे आणि आता यावर उपाय म्हणून केंद्र सरकार मार्फत PM Internship Scheme 2026 सुरू करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे केवळ एक योजना नसून तर ती तरुणांसाठी देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी आणि स्वतःचे करिअर घडवण्यासाठी केंद्र सरकारने केलेली एक महत्त्वाची संधी आहे.

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही देखील पदवीधर असाल किंवा तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल आणि तुम्ही एका चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही योजना फक्त तुमच्यासाठीच आहे विद्यार्थी मित्रांनो PM Internship 2026 योजनेद्वारे तुम्हाला केवळ कामाचा अनुभवच मिळणार नाही तर सरकारकडून दरमहा 5000 हजार रुपयांचा Stipend तर मग चला आता या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया जसे की योजनेची पात्रता फायदे आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

PM Internship Scheme 2026

वैशिष्ट्यतपशील
योजनेचे नावPM Internship Scheme (PMIS) 2026
विभागकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs)
लाभार्थी21 ते 24 वयोगटातील तरुण
एकूण जागा1 कोटी (5 वर्षांत) / 1.25 लाख (चालू वर्ष)
Stipend₹5,000 दरमहा + ₹6,000 (One-time Grant)
कालावधी12 महिने (1 वर्ष)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटpminternship.mca.gov.in

पीएम इंटर्नशिप योजना नेमकं काय आहे?

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की PM Internship Scheme नेमकी कोणासाठी आहे आणि ही योजना कशी काम करते तर बघा भारत सरकारच्या बजेट 2024 25 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि या अंतर्गत भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये उदाहरणार्थ रिलायन्स टाटा महिंद्रा एचडीएफसी बँक तसेच इत्यादी कंपन्यांमध्ये तरुणांना 12 महिन्यांसाठी Internship करण्याची संधी दिली जाते.

आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कंपनीमध्ये काम कसं चालते याचा अनुभव देखील मिळतो आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी तयार केले जाते हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अर्धवेळ काम आणि अर्धवेळ प्रशिक्षण अशा स्वरूपात तरुणांना हे काम शिकवले जाते.

PM Internship योजनेची मुख्य उद्दिष्टे

  • भारतातील तरुणांना On-the-job Training नोकरी करण्यासाठी सक्षम बनवणे.
  • आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या परंतु हुशार विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेश मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • तसेच पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगार मिळवून देणे.
  • शैक्षणिक ज्ञान आणि Industry Requirements यातील दरी कमी करणे.

PM Internship Scheme पात्रता निकष

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खाली दिलेल्या अटींची पूर्तता करत आहात की नाही हे नक्की तपासा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाणार नाही.

  • अर्जदार विद्यार्थी या भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 21 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे शिक्षण: इयत्ता 10वी किंवा 12वी पास. ITI प्रमाणपत्र धारक. ITI टेक्निक डिप्लोमा धारक. ITI टेक्निकशाखेतील पदवीधर (BA, B.Sc, B.Com, Pharmacy इ.).
  • पूर्णवेळ नोकरीला नसावा किंवा पूर्ण वेळ शिक्षण घेत नसावा.

कोणाला अर्ज करता येणार नाही?

बरेच विद्यार्थी माहितीच्या अभावी अपात्र असून सुद्धा या योजनेसाठी अर्ज करतात आणि त्यांचा अर्ज Reject केला जातो म्हणूनच खाली दिलेल्या यादीमध्ये तुम्ही पात्र आहात की नाही हे नक्की तपासा त्यानंतरच या योजनेसाठी अर्ज करा.

  • ज्यांनी IIT, IIM, NLU किंवा IISER मधून शिक्षण घेतले आहे.
  • ज्यांच्याकडे CA, CS, MBBS, BDS, MBA किंवा Ph.D. अशी उच्च पदवी आहे.
  • ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा जास्त आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत (कायमस्वरूपी) आहे.

PM Internship Scheme आर्थिक फायदे आणि स्वरूप

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील PM Internship योजनेसाठी अर्ज केला असेल तर या योजनेमध्ये तुम्हाला कोणते आर्थिक फायदे मिळणार आहे तसेच तुम्हाला मासिक वेतन आणि इतर अनुदान कोणते मिळणार आहे याची माहिती तुम्ही खाली दिलेल्या तक्त्या मधून जाणून घेऊ शकतात.

लाभ प्रकार Amountतपशील
मासिक विद्यावेतन₹5,000/-₹4,500 (सरकारकडून DBT द्वारे) + ₹500 (कंपनीकडून CSR फंडातून)
एकदाच मिळणारे अनुदान₹6,000/-इंटर्नशिप सुरू झाल्यावर ‘इन्सिडेंटल ग्रांट’ म्हणून दिले जातील.
विमा संरक्षणमोफतप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजना अंतर्गत संरक्षण.

PM Internship Scheme आवश्यक कागदपत्रे

  • Aadhaar Card
  • 10वी/12वी/पदवी गुणपत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक पासबुक (आधार लिंक असणे आवश्यक)
  • शिधापत्रिका (रेशन कार्ड – उत्पन्नाच्या पडताळणीसाठी)
  • सेल्फ डिक्लरेशन फॉर्म (पात्रतेबाबत हमीपत्र – पोर्टलवर उपलब्ध)

PM Internship Scheme 2026 Step-by-Step Application Process

  • विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारच्या https://pminternship.mca.gov.in/login/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर होमपेजवर दिसत असलेल्या रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका आणि आलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
  • लॉगिन केल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
  • यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता आणि आवडीचे क्षेत्र निवडायचे आहे.
  • त्यानंतर पोर्टलवर तुमचा आपोआप बायोडाटा तयार होतो.
  • आता तुमच्या आवडीनुसार IT, Banking, Marketing आणि लोकेशन नुसार तुम्ही Internship शोधू शकता.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी तुम्ही जास्तीत जास्त 5 Internship साठी अर्ज करू शकता.
  • आता अर्ज सबमिट करा आणि कन्फर्मेशन प्रिंट वर क्लिक करा.

PM Internship Scheme नवीन अपडेट 2026

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या या योजनेचे अर्ज भरणे सुरू आहेत आणि याची अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2026 पर्यंत आहे पण मित्रांनो ही तारीख केव्हाही बदलू शकते म्हणूनच तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊन तारीख आणि अर्ज प्रक्रियेची विषयी आणखी माहिती जाणून घेऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी काळात Internship चे विद्यावेतन वाढवून दहा हजारापेक्षा जास्त करण्याचा प्रस्ताव चर्चेत आला होता पण सरकारने सध्या 5000 इतकेच मंजूर केले आहेतआणि विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रियेमध्ये तुमची निवड प्रक्रिया कंपनी द्वारे केली जाईल परंतु त्यात कोणत्याही माणसाचा हस्तक्षेप नसेल कारण ही निवड प्रक्रिया करण्यासाठी पूर्णपणे AI अल्गोरिदमचा वापर केला जातो.

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

संपर्क माध्यममाहिती
अधिकृत पोर्टलpminternship.mca.gov.in
हेल्पलाइन नंबर1800-11-6090
ईमेल आयडीpminternship@mca.gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मी Post Graduate आहे, मी अर्ज करू शकतो का?

नाही विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या नियमानुसार Master’s Degree असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र नाहीत.

अर्ज करण्यासाठी काही फी आहे का?

या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही फी लागणार नाही आणि कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही

निवड कशी केली जाते?

विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रोफाईल आणि शैक्षणिक पात्रतेनुसार कंपन्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट करतात आणि काही ठिकाणी ऑनलाइन मुलाखत सुद्धा घेतली जाऊ शकते.

Conclusion

PM Internship Scheme 2026 ही महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. केवळ पैसे कमावणे हा उद्देश नसून, मोठ्या कंपन्यांच्या कामाची पद्धत शिकण्याची ही मोठी संधी आहे. जर तुम्ही २१ ते 24 वयोगटात असाल, तर आजच अर्ज करा! आणि हो मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिक आणि अधिकृत माहितीसाठी केंद्र सरकारच्या https://pminternship.mca.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *