10वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि रोज 6 जीबी डेटा | Mahajyoti Free Tablet Yojana 2026 Marathi

Mahajyoti Free Tablet Yojana: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील नुकतीच दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही NEET, JEE, MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर आता महाराष्ट्र सरकारच्या महाज्योती संस्थामार्फत तुम्हाला चक्क FREE TABLET आणि दररोज सहा जीबी इंटरनेट डाटा मोफत मिळणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही योजना महाराष्ट्र राज्यातील OBC, VJNT, आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थी मित्रांनो जसे की तुम्हाला माहिती आहे आता शिक्षण देखील डिजिटल झाले आहे आणि या डिजिटल शिक्षणामध्ये गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागडे टॅबलेट विकत घेणे शक्य नसते आता हेच अडचण ओळखून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्फत ही योजना राबवली जात आहे त्यामुळे तुम्हाला देखील मोफत टॅबलेट हवे असेल आणि या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर 2026 मधील अर्ज प्रक्रिया तसेच या योजनेचे पात्रता व निकष काय राहणार आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Mahajyoti Free Tablet Yojana 2026 Marathi

InformationDetails
Scheme NameMahajyoti Free Tablet Scheme 2026
Launched ByMahatma Jyotiba Phule Research & Training Institute (Mahajyoti)
DepartmentOther Backward Bahujan Welfare Department, Government of Maharashtra
Applicable StateMaharashtra
Beneficiaries10th Pass Students (OBC, VJ, NT, SBC)
Key BenefitsFree Tablet + 6GB Data Per Day + Online Coaching
Application ProcessOnline
Official Websitewww.mahajyoti.org.in
Latest Update 2026Registration and selection list process started for 2026–27 batch

What is Maharashtra Mahajyoti Tablet Yojana

विद्यार्थी मित्रांनो महा ज्योती टॅबलेट योजना ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आली आहे. आता महाजोती संस्था या विद्यार्थ्यांना NEET, JEE, MHT-CET साठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देत असते हे प्रशिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांकडे साधन असावे याच उद्देशाने सरकार त्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबतच सहा जीबी इंटरनेट देखील प्रदान करत असते.

महा ज्योती टॅबलेट योजनेचा मुख्य उद्देश

  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच डिजिटल सुविधा तसेच डिजिटल शिक्षण मिळावे हा या योजने मागचा मुख्य उद्देश आहे.
  • जे विद्यार्थी महागडे टॅबलेट तसेच इंटरनेटचा खर्च भागवू शकत नाही अशा गरजू विद्यार्थ्यांना अगदी मोफत टॅबलेट आणि इंटरनेट प्रोव्हाइड करून देणे.
  • खेड्या गावातील विद्यार्थ्यांना टॅबलेट सोबतच मोफत सहा जीबी इंटरनेट प्रोव्हाइड करणे.

महाज्योती टॅबलेट योजनेचे पात्रता निकष

  • या योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार विद्यार्थी हा कायमस्वरूपी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • या योजनेअंतर्गत OBC,VJ,NT,SBC प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची कुटुंब न-क्रिमीलेअर गटातील असावे.
  • विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याने अकरावी मध्ये Science शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थ्याला दहावी मध्ये किमान 60% ते 70% असावे पण विद्यार्थी मित्रांनो प्रवर्गानुसार हे बदल देखील शकते कारण प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पात्रता व निकष वेगळे आहेत.

महाज्योती टॅबलेट योजनेचे फायदे

  • Aadhaar Card
  • Caste Certificate
  • Current Non-Creamy Layer Certificate
  • 10th Marksheet
  • ११ वी विज्ञान प्रवेशाचा पुरावा (College Admission Receipt/Bonafide)
  • Domicile Certificate
  • पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी

महाज्योती टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • STEP 1: महाज्योतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.mahajyoti.org.in.
  • STEP 2: होमपेजवर ‘Notice Board’ किंवा ‘Application for JEE/NEET/MHT-CET’ या लिंकवर क्लिक करा.
  • STEP 3: नवीन नोंदणी करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरिफाय करा.
  • STEP 4: अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, १० वी चे गुण आणि प्रवर्ग अचूक भरा.
  • STEP 5: वरील सर्व आवश्यक कागदपत्रे (Documents) योग्य साईजमध्ये अपलोड करा.
  • STEP 6: अर्ज पूर्ण भरल्यावर एकदा तपासा (Preview) आणि ‘Submit’ करा.
  • STEP 7: अर्जाची प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा.

Application Status Check

मित्रांनो तुम्ही जर या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुम्हाला देखील अर्जाची स्थिती तपासायची असेल तर खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करून तुम्ही अगदी सहज पद्धतीने तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

  • सर्वप्रथम महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर ने वेबसाईट वरती लॉगिन करा.
  • आता ‘Check Status’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.

महाज्योती टॅबलेट लाभार्थी यादी

महाज्योती दरवर्षी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार (Merit List) निवड यादी जाहीर करते. ही यादी महाज्योतीच्या ‘Notice Board’ विभागात पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध असते. तुमचे नाव यादीत असेल तरच तुम्हाला टॅबलेट वाटपासाठी बोलावले जाते.

Helpline Details

Contact InformationDetails
AddressMahajyoti, Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan, Shraddhanand Peth, Nagpur – 440022
Toll-Free Number0712-2870120 / 2870121
Emailmahajyotingp@gmail.com
Websitemahajyoti.org.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

महाज्योती टॅबलेट योजनेसाठी कोण पात्र आहे?

महाराष्ट्रातील ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी जे ११ वी सायन्समध्ये शिकत आहेत.

अर्ज करण्यासाठी फी भरावी लागते का?

नाही, ही योजना पूर्णपणे मोफत असून अर्जासाठी कोणतीही फी घेतली जात नाही.

10 वी मध्ये किती टक्के गुण असणे आवश्यक आहे?

सामान्यतः शहरी भागासाठी ७०% आणि ग्रामीण भागासाठी ६०% गुण आवश्यक असतात, परंतु दरवर्षी मेरिटनुसार हे बदलू शकते.

टॅबलेट कधी मिळतो?

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि तुमची निवड यादीत नाव आल्यावर, विभागीय कार्यालयामार्फत टॅबलेटचे वाटप केले जाते.

Conclusion

विद्यार्थी मित्रांनो महाज्योती टॅबलेट योजना ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक नवीन क्रांतिकारक पाऊलच आहे जर तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचे असेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तर या योजनेचा लाभ तुम्ही नक्की घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे वेळे अगोदर अर्ज करा आणि अधिकृत वेबसाईटवरूनच अर्ज करा तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीतील दहावी पास गरजू गरीब विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील स्वप्न पूर्ण होईल.

ही पोस्ट नक्की वाचा: MSRTC मेगा भरती 2026: एसटी महामंडळात 17,742 जागांसाठी भरती जाहीर; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया पहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *