Ladki bahin Yojana ekyc Ineligible: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी एक मोठा आर्थिक आधारच बनली आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणाऱ्या १५००/- रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाला एक मोठा हातभार लागतो पण जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून या योजनेमध्ये एक नवीन बदल करण्यात आला आहे तो म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेची EKYC केली नसेल त्या महिलांचे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार आहेत आणि यामध्ये महत्त्वाचे अपडेट अशी आहे की ज्या महिलांनी अपात्र असून सुद्धा या योजनेचे मागील काही हप्ते घेतले होते आणि अशा महिला आता जर KYC करण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा महिलांचे सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मिळणारी पंधराशे रुपये कायमचे बंद होऊ शकतात.
त्यामुळे या योजनेची EKYC करणे फक्त पुरेसं नाही तर ती अचूकपणे करणे आणि महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वाच्या निकषांची पूर्तता करणे देखील बंधनकारक आहे तर आता आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पुढील मिळणारे हप्ते सुरक्षित कसे ठेवू शकता. केवायसी करताना कोणती काळजी घ्यावी आणि यासोबतच कोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता हा कायमचा बंद होऊ शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
माझी लाडकी बहीण EKYC Overview
| मुद्दा | माहिती (सोप्या भाषेत) |
| योजनेचे नाव | माझी लाडकी बहीण योजना |
| मुख्य लाभ | राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम (हप्ता) आर्थिक मदत म्हणून दिली जाते. |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शासनाने ठरवलेल्या अटी व निकषांनुसार पात्र असलेल्या महिला व भगिनी. |
| राज्य | महाराष्ट्र |
| सध्याची महत्त्वाची अपडेट | योजनेचे पैसे (हप्ते) सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना e-KYC करणे बंधनकारक आहे. ज्या महिला KYC करणार नाहीत, त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात. |
| E-KYC प्रक्रिया शेवटची तारीख | 18 नोव्हेंबर 2025 |
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
तर लाडक्या बहिणीने सर्वप्रथम समजून घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमधील मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक सक्षम करणे असा आहे आता महाराष्ट्र राज्यामधील महिला विशेष म्हणजे गृहिणी या आर्थिक गरजांसाठी बऱ्याचदा इतरांवर अवलंबून असतात आता त्यांना स्वतःच्या गरजांसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कुटुंबातील इतर आर्थिक आधारांसाठी पैसे मिळावेत तसेच त्या महिलांना स्वावलंबी कसं बनवता येईल आणि या महिलांचा समाजामध्ये सन्मान कसा वाढवता येईल या विचाराने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आता या योजनेअंतर्गत सरकार काही ठराविक निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत जमा करत असते आणि या पैशांचा वापर महिला त्यांच्या आवश्यकतेनुसार करू शकतात.
लाडकी बहीण योजनेमध्ये कोण पात्र आहे
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असावी.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे अत्यंत आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेचा लाभ विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटीत महिला किंवा परित्यक्ता महिला घेऊ शकतात.
- या योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे कारण या योजनेचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.
लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या महिला अपात्र आहेत
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पेक्षा जास्त आहेत अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
- जर कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स पेयर असेल म्हणजेच इन्कम टॅक्स फाईल करत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- जर महिलेच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नोकरी करत असते तर अशा महिला सुद्धा या योजनेमधून अपात्र ठरतील.
- महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असेल उदाहरणार्थ (CAR, JEEP) तर या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही पण जर महिन्याच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर असेल तर अशा महिला या योजनेसाठी पात्र आहे.
- ज्या महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमधून उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनेमधून दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
- महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार किंवा सरकारने नेमलेल्या मंडळामध्ये अध्यक्ष किंवा संचालक असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेवरून अपात्र ठरवण्यात येतील.
या योजनेअंतर्गत अर्ज भरताना ज्या महिलांनी वरील निकष पूर्ण न करता अर्ज केला असेल आणि त्यांना जर बहीण योजनेचे मागील हप्ते मिळाले असतील. तर अशा महिलांनी आता केवायसी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे समोरील लाडकी बहीण योजनेचे हप्ते पूर्णपणे बंद होणार आहे आणि जर त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत केवायसी पूर्ण केली नाही तरीसुद्धा त्यांचे हप्ते बंद होणारच आहे कारण अशा महिलांनी अपात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता जे की शासनाने दिलेल्या निकषाच्या बाहेर आहे.
लाडकी बहीण योजनेची EKYC करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे (पात्र महिलांसाठी)
तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत दिले जाणारे निकष पूर्ण केले असतील तर तुम्हाला या योजनेची EKYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. आता हे केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एका डॉक्युमेंट ची गरज आहे ते म्हणजे आधार करा. कारण केवायसी पूर्ण करण्यासाठी तसेच तुमची ओळख पाठवण्यासाठी आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत त्यामुळे केवायसी चा अर्ज भरण्यापूर्वी तुमचे आणि तुमच्या वडील किंवा पतीचे आधार कार्ड हे जवळ ठेवा.
आणि महत्त्वाची गोष्ट तुमचे आधार कार्ड आणि तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड हे मोबाईल नंबर सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे कारण केवायसी करताना आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या मोबाईल वरती एक वन टाइम पासवर्ड पाठवला जातो हा तुम्हाला वेबसाईट मध्ये सबमिट करायचं असतं जर तुम्हाला देखील बघायचं असेल की तुमच्या आधार कार्ड ला किंवा तुमच्या पतीच्या/ वडिलांच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर ते तुम्ही https://uidai.gov.in/en/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अगदी सहज पद्धतीने बघू शकता.
हे नक्की वाचा: तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या
जुन्या लाभार्थ्यांनी E-KYC कशी पूर्ण करायची
- केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- आता वेबसाईटच्या होम पेजवर लाडकी बहीण योजना EKYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारचे तुम्हाला बॅनर दिसेल तर तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर दोन बॉक्स येतील एका मध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये वेबसाईट वरती दिलेला कॅपच्या व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
- त्यानंतर सेंड OTP या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या आधार नंबरची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो वेबसाईट मध्ये व्यवस्थित रित्या भरा.
- त्यानंतर व्हेरिफाय या बटन वरती क्लिक करा.
- आता दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर वेबसाईट मध्ये दिलेला कॅपच्या बॉक्समध्ये व्यवस्थित रित्या भरा.
- आणि परत SNED OTP या पर्यायावर क्लिक करा आता तुमच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल.
- वेबसाईट मध्ये व्यवस्थित रित्या भरा. आणि व्हेरिफाय ऑप्शन वरती क्लिक करा.
- ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल की तुमची केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली.
तर लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहजपणे मोबाईल किंवा कम्प्युटरचा वापर करून लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्हाला केवायसी करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर आम्ही या वरती सुद्धा एक सविस्तर लेख लिहिला आहे ज्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीची उत्तरे आम्ही त्यामध्ये तुम्हाला दिले आहेत म्हणून लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या चार मुख्य अडचणी तुम्हाला येऊ शकतात हे बघण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मी e-KYC नाही केले तर काय होईल?
लाडक्या बहिणींनो तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी असाल आणि या सोबतच तुम्ही या योजनेचे पात्रता व निकष पूर्ण करत असाल तरी देखील तुम्ही जर या योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा या योजनेचा पुढील हप्ता थांबवला जाईल सरकारच्या नवीन नियमानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ठेवायचे करणे बंधनकारक आहे. केवायसी न केल्यास तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात असे मानले जाऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे नाव यादी मधून कायमचे वगळले जाऊ शकते.
e-KYC करण्याची शेवटची तारीख (Last Date) काय आहे?
शासनाच्या नवीन माहितीनुसार केवायसी पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र भविष्यामध्ये हे मुदत वाढेल की नाही हे सध्या तरी सांगता येत नाही त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता तसेच शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तुम्ही लवकरात लवकर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या हेच सर्वात सुरक्षित राहील.
सरकार अचानक e-KYC का करत आहे? याचा खरा उद्देश काय?
बऱ्याच लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडला आहे की सरकार अचानकपणे EKYC प्रक्रिया का करायला सांगत आहे तर बघा याचे दोन मुख्य उद्देश आहे एक म्हणजे तुम्ही योजनेचे खरे लाभार्थी आहात का? आणि दुसरा उद्देश म्हणजे या योजनेमधून अपात्र लाभार्थी वगळते कारण बऱ्याच महिलांनी अपात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता योजनेसाठी अर्ज केला होता. आणि त्यांना मागील काही हप्ते देखील मिळाले होते म्हणूनच अशा अपात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत केवायसी प्रक्रिया राबवली जात आहे.