YUVA AI for All: भारत सरकारचा मोफत AI कोर्स! आता घरी बसून शिका Artificial Intelligence आणि मिळवा सरकारी प्रमाणपत्र

YUVA AI for All: मित्रांनो Artificial Intelligence (AI) ज्ञान असणे आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाची आहे कारण भविष्यामधील व्यवसाय असो किंवा नोकरी सर्व क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर अगदी वेगाने होणार आहे पण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान शिकण्याकरिता बरेच लोक महागडे कोर्सेस करतात आणि त्यामध्ये त्यांचे पैसे देखील गमावतात पण आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय तरुणांकरिता YUVA AI for All हा अत्यंत महत्त्वाचा प्रोग्रॅम लाँच केला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तंत्रज्ञान शिकण्याकरिता तुम्हाला कोणती फी किंवा पैसे देण्याची गरज नाही.

कारण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा कोर्स संपूर्ण भारतीय विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे आणि तो पूर्ण केल्यावर तुम्हाला भारत सरकारचे अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जाते. तर आता या कोर्ससाठी तुम्ही कसा अर्ज करू शकता याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

YUVA AI for All

InformationDescription
Scheme NameYUVA AI for All
Launched ByCentral Government (Government of India)
DepartmentMinistry of Electronics and Information Technology (MeitY) & IndiaAI Mission
Applicable StateEntire India (All States and Union Territories)
BeneficiariesStudents (Class 8 to 12), Graduates, Job Seekers, and General Citizens
Key BenefitsFree AI Training, Government Certification, Future Job Opportunities
Application ProcessOnline Registration
Latest Update 2026Available in 11 regional languages (including Marathi), Mobile-friendly learning
Official Websiteindiaai.gov.in / futureskillsprime.in

YUVA AI for All म्हणजे नक्की काय?

मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर YUVA AI For ALL हा एक राष्ट्रीय स्तरावरील AI Literecy Program आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय ते कसे काम करते आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा करावा हे या कोर्सच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं जाते आणि हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिक बॅकग्राऊंडची गरज भासत नाही उदाहरणार्थ कोडिंग किंवा इंजिनिअरिंग.

YUVA AI for All चे मुख्य उद्देश

  • भारतीय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्राची ओळख अगदी सहज पद्धतीने करून देणे.
  • तरुणांना भविष्यामधील नवीन नोकऱ्यांसाठी तयार करणे.
  • शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील प्रगत तंत्रज्ञान शिकण्याची संधी देणे.
  • AI जे ज्ञान घेवळ तात्पुरते मर्यादित न ठेवता ते सर्वांसाठी उपलब्ध करून देणे.

YUVA AI for All Eligibility Criteria

  • या कोर्स करिता अर्ज करण्यासाठी तुमचे वय किमान तेरा वर्षे पूर्ण असावे.
  • प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत कोणीही हा कोर्स पूर्ण करू शकतो.
  • कोर्स साठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
  • कोर्स कम्प्लीट करण्यासाठी अर्जदाराकडे चांगले इंटरनेट कनेक्शन यासोबतच मोबाईल किंवा कम्प्युटर असणे आवश्यक आहे.
  • या कोर्ससाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.

YUVA AI for All Benefits

  • हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे तुम्हाला एकही रुपया खर्च न करता दररोज 4 ते 5 तासांचा दर्जेदार कोर्स शिकायला मिळतो.
  • हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला Indian AI आणि MeritY द्वारे स्वाक्षरी प्रमाणपत्र दिले जाते जे तुमच्या भविष्यातील करिअरसाठी खूप महत्त्वाचे ठरते.
  • या कोर्ससाठी कोणतीही एक्झॅक्ट टाइमिंग नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा कोर्स कम्प्लीट करू शकता.
  • या पोस्टच्या माध्यमातून शेती विषयक आरोग्य विषयक तसेच शिक्षण क्षेत्रात AI वापर कसा होत आहे हे शिकायला मिळते.

YUVA AI for All Required Documents

  • आधार कार्ड (ओळखीसाठी)
  • सक्रिय मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी (प्रमाणपत्र मिळवण्यासाठी)
  • शाळेचे किंवा कॉलेजचे नाव (विद्यार्थ्यांसाठी)

YUVA AI for All Step-by-Step Online Application

  • स्टेप 1: सर्वात आधी अधिकृत पोर्टल FutureSkills Prime किंवा IndiaAI वर जा.
  • स्टेप 2: होमपेजवर ‘YUVA AI for All’ या पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 3: तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून Sign Up करा.
  • स्टेप 4: तुमची भाषा निवडा (उदा. मराठी किंवा इंग्रजी).
  • स्टेप 5: तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि Submit करा.
  • स्टेप 6: आता कोर्सचे ६ मॉड्यूल्स (व्हिडिओ स्वरूपात) पाहायला सुरुवात करा.
  • स्टेप 7: प्रत्येक मॉड्यूल नंतर छोटा क्विझ (Quiz) द्या.
  • स्टेप 8: सर्व मॉड्यूल्स पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचे डिजिटल सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.

हेल्पलाइन आणि संपर्क

InformationDetails
Official Websitewww.indiaai.gov.in
Emailcontact@indiaai.gov.in
Helpline1800-120-4613 (Toll Free)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

YUVA AI for All कोर्ससाठी फी किती आहे?

हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही टप्प्यावर शुल्क आकारले जात नाही.

हा कोर्स करण्यासाठी मला कोडिंग यायला हवी का?

नाही. हा कोर्स सामान्य लोकांसाठी आहे, त्यामुळे कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञानाची अजिबात गरज नाही.

कोणकोणत्या भाषांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे?

मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड यांसह एकूण ११ भारतीय भाषांमध्ये हा उपलब्ध आहे.

निष्कर्ष

YUVA AI for All मित्रांनो हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भविष्यातील आर्टिफिशल इंटेलिजन्स च्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची मोठी संधी मिळते आणि हे आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञान शिकणे काळाची मोठी गरज आहे त्यामुळे आजच आपली नोंदणी पूर्ण करा आणि हा लेख तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *