PM Kisan 22nd Installment: खुशखबर! १३ मार्चला येणार 2000 रुपये? पण हे शेतकरी ठरणार अपात्र नवीन नियम बघा

PM Kisan 22nd Installment: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे अनेक दिवसांपासून शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट बघत होते पण आता ताज्या माहितीनुसार केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा 22 वा हप्ता जमा करणार आहे.

फेब्रुवारी महिना संपला तरीही हप्ता न मिळाल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते पण आता केंद्र सरकारने 13 मार्च 2026 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22 व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. याची अधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली. त्यामध्ये असे सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असताना सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहेत तर मग चला या हप्त्याबद्दलची आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Quick Overview Table: PM Kisan Yojana 2026

माहितीतपशील (Details)
योजनेचे नावPM Kisan Samman Nidhi Yojana
राज्य / विभागकेंद्र सरकार (Central Government)
लाभार्थीपात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
मुख्य लाभवार्षिक ₹6,000 (3 हप्त्यात)
पुढील हप्ता22वा हप्ता (22nd Installment)
संभाव्य तारीख13 मार्च 2026
अधिकृत वेबसाईटpmkisan.gov.in
नवीन अपडेट 2026e-KYC आणि Farmer ID अनिवार्य
PM-Kisan Helpline155261 / 011-24300606
Toll-Free1800115526

Latest News 2026: 13 मार्चला 2026 ला काय होणार?

शेतकरी मित्रांनो आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी 13 मार्च 2026 रोजी आसाम मधील कोकराझार येथे एका भव्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहे आणि मिळालेला सूत्रांच्या माहितीनुसार याच कार्यक्रमांमधून रिमोटचे बटन दाबून भारत देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22 व्या त्याचे पैसे पाठवले जाणार आहेत.

पण 22 व्या हप्त्याचे पैसे काही ठराविक शेतकऱ्यांना दिले जाणार आहे कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या निकषांमध्ये सरकारने नवीन बदल केले आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी नवीन फार्मर आयडी साठी नोंदणी केली होती या शेतकऱ्यांनाच 22 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

आणि तसेच सरकारने अलीकडेच अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून हटवण्याची मोहीम राबवली होती यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी e-KYC किंवा Land Seeding आणि फार्मर आयडी तयार केले नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभांमधून पूर्णपणे वगळले जाणार आहे म्हणजेच अशा शेतकऱ्यांचे पैसे थांबू शकतात.

PM किसान योजना काय आहे?

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शंभर टक्के अर्थसहायित योजना आहे केंद्र सरकारने ही योजना 01 डिसेंबर 2018 पासून सुरू केली होती तसेच या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बियाणे खाते आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चासाठी आर्थिक मदत करणे असा आहे.

पात्रता निकष

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर लागवणी योग्य जमीन असणे अनिवार्य आहे.
  • जे शेतकरी सरकारी कर्मचारी आहेत तसेच संस्थात्मक जमीनधारक आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • जर शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असेल तर त्याला सातबारा (7/12) आणि ८-अ उतारा अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

मिळणारे फायदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे दिले जातात जसे की वर्षाला 6000 हजार रुपयाची थेट मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि हे पैसे कोणत्याही मध्यस्तीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Aadhaar Card) – बँकेशी लिंक असणे अनिवार्य.
  • सातबारा / ८-अ उतारा (Land Documents).
  • बँक पासबुक (Bank Details).
  • मोबाईल नंबर (Aadhaar Linked).

अर्ज कसा करावा

तुम्ही अजूनही प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेसाठी अर्ज केला नसेल तर याची नोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या स्टेप्स चा वापर करून अगदी सहज पद्धतीने या योजनेचा अर्ज करू शकता.

  • योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या पोर्टलला भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता समोर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर आणि आधार अशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून राज्याची निवड करा.
  • त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि जमिनीची माहिती अगदी अचूक पद्धतीने भरा.
  • आता अर्जामध्ये विचारले जाणारे कागदपत्रे व्यवस्थित रित्या वेबसाईट वरती अपलोड करा आणि अर्ज Submit करा.

मित्रांनो तुम्हाला जर अर्ज भरताना काही अडचणी येत असतील म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर जाऊन या योजनेचा अर्ज अगदी सहज पद्धतीने ऑपरेटर करून भरून घेऊ शकता पण सीएससी केंद्रावरती तुम्हाला काही नाममात्र शुल्क द्यावे लागेल जे तुमच्या गावातील सीएससी केंद्राचे वेगवेगळे असू शकते.

लाभार्थी स्टेटस कसे तपासावे?

  • अधिकृत वेबसाईटवर ‘Know Your Status‘ वर क्लिक करा.
  • तुमचा Registration Number टाका.
  • कॅप्चा कोड भरून ‘Get Data’ वर क्लिक करा.
  • येथे तुमची e-KYC, Land Seeding आणि Aadhaar Bank Seeding ‘Yes’ आहे का ते तपासा.

Important FAQs

22वा हप्ता कधी येणार?

प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा बावीसवा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 13 मार्च 2026 रोजी जमा होणार आहे.

e-KYC करणे अनिवार्य आहे का?

हो प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना EKYC करणे सरकारने बंधनकारक केले आहे. जर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेच्या कोणत्याही हप्त्यांचा लाभ दिला जाणार नाही.

Conclusion

शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपले स्टेटस तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे या सोबतच सर्व कागदपत्रे बरोबर आहेत का? हे पण तपासून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे 13 मार्च 2026 ही तारीख लक्षात ठेवा याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 22 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

हे नक्की वाचा: राज्यातील कामगारांसाठी मोठी बातमी! Essential Kit Appointment Kamgar Yojana 2026 सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *