Platinum Jubilee Asha Scholarship Program: आपल्या भारतामधील अनेक विद्यार्थी खूप हुशार असतात तसेच त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची जिद्द देखील असते आणि अशा विद्यार्थ्यांना जगामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख देखील निर्माण करायची असते पण त्यांच्या या स्वप्नांचा अडथळा नेहमी त्यांची आर्थिक परिस्थितीच ठरते.
म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर केवळ आणि केवळ पैशांच्या अभावी गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते पण आता काळजी करण्याची काहीही कारण नाही कारण विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्वप्नांना पंख देण्याकरिता तसेच शिक्षणाच्या आधारे तुमचं भविष्य उज्वल करण्याकरिता Platinum Jubilee Asha Scholarship Program स्कॉलरशिप तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरवू शकते
तर आता Platinum Jubilee Asha स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून लेख शेवटपर्यंत वाचा आणि हो लेखाच्या शेवटी मी तुम्हाला अर्ज प्रक्रियेच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे तर चला सुरू करूया.
Platinum Jubilee Asha Scholarship Program Overview
| मुद्दा | तपशील |
| योजनेचे नाव | प्लॅटिनम ज्युबिली आशा स्कॉलरशिप प्रोग्राम (Platinum Jubilee Asha Scholarship Program) |
| लाभार्थी (Eligibility) | गुणवंत आणि होतकरू विद्यार्थी (ज्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे) |
| मुख्य फायदा | शैक्षणिक शुल्कासाठी आणि इतर खर्चासाठी थेट आर्थिक मदत. |
| अर्ज करण्याची पद्धत | अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन |
| महत्त्वाचा मुद्दा | अर्जदारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल |
Jubilee Asha Scholarship Program ही योजना नेमकी काय आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो Jubilee Asha Scholarship Program ही एक एसबीआय बँक ऑफ इंडिया फाउंडेशन द्वारे सुरू करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जे विद्यार्थी हुशार आहेत गुणवंत आहेत आणि त्यांना पदव्युत्तर शिक्षण (Postgraduate studies) शिक्षण घ्यायचे आहे परंतु ते विद्यार्थी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच पैशांच्या अभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही योजना भारतामधील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे जी त्यांना पैशांची चिंता न करता उच्च शिक्षण पूर्ण मदत करते जेणेकरून ते आपले करिअर यशस्वीपणे घडवू शकतील.
Platinum Jubilee Asha Scholarship Program Objectives
- जे विद्यार्थी शिक्षणामध्ये तर हुशार आहेत पण ते आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडतात तर अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे शुल्क तसेच इतर संबंधित खर्च भागवण्याकरिता थेट आर्थिक मदत करणे.
- अनेक विद्यार्थी पैशांच्या अभावी त्यांच्या शिक्षण अपूर्ण सोडत असतात आता याचे प्रमाण कमी करणे आणि त्यांना त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
- समाजामधील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून तेही स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतील आणि त्यांचे भविष्य उज्वल करू शकतील.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गुंतवणूक करून देशासाठी कुशल आणि शिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा या योजनेमागील महत्त्वाचा हेतू आहे.
हे नक्की वाचा: लेक लाडकी योजनेअंतर्गत तुमच्या मुलींना मिळणार आर्थिक मदत अर्ज प्रक्रिया तसेच सविस्तर माहिती जाणून घ्या
Platinum Jubilee Asha Scholarship Program Eligibility Criteria
- अर्जदार विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याने मागील वर्षात परीक्षेमध्ये किमान 75 टक्के गुण किंवा 7.0 CGPA मिळवलेला असावा.
- आणि महत्त्वाचे म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पूर्ण गुणांमध्ये 10% टक्के सूट आहे . त्यांना किमान 67.5% गुण किंवा 6.3 CGPA असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावी मध्ये जर शिकत असेल तर त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा कमी असावे
- आणि जर विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर, IIT, IIM, इ. अशा प्रकारचे शिक्षण घेत असेल तर त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपये पेक्षा कमी असावे.
तुम्ही कोणत्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहात हा देखील एक महत्त्वाचा निकष या योजनेमध्ये मानला जातो
- विद्यार्थी अर्जदार NIRF रँकिंग मध्ये टॉप 300 मध्ये येणाऱ्या कॉलेज किंवा विद्यापीठात किंवा NAAC A+ रेटिंग असलेल्या संस्थेत शिकत असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी कोणत्याही IIT किंवा IIM (MBA/PGDM) मध्ये शिकत असल्यास असे देखील विद्यार्थी या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- आता महत्त्वाचं म्हणजे ही संधी फक्त SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच आहे जे टॉप 200 QS/THE रँकिंगनुसार ग्लोबल युनिव्हर्सिटी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
योजनेच्या मार्फत विद्यार्थ्यांना आरक्षण तसेच इतर महत्त्वाचे मुद्दे
- आनंदाची गोष्ट म्हणजे या शिष्यवृत्ती मधील 50% जागा विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- 50% जागा SC/ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत (ज्यात 25% SC आणि 25% ST साठी आहे.
- या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची age limit ठेवण्यात आलेली नाही.
- बारावीनंतर किंवा पदवीनंतर शिक्षणात जास्तीत जास्त दोन वर्षाचा गॅप स्वीकारला जाऊ शकतो म्हणजेच दोन वर्षाचा गॅप असेल तर विद्यार्थी अर्ज करू शकतो.
Platinum Jubilee Asha Scholarship Financial Benefits
खालील तक्त्यामध्ये कोणत्या अभ्यासक्रमासाठी दरवर्षी किती शिष्यवृत्ती मिळते, हे थोडक्यात दिले आहे:
| शिक्षणाचा स्तर / अभ्यासक्रम | शिष्यवृत्तीची रक्कम (वार्षिक) |
| शालेय (इयत्ता ९ वी ते १२ वी) | ₹ 15,000 पर्यंत |
| पदवी (UG Courses) | ₹ 75,000 पर्यंत |
| पदव्युत्तर (PG Courses) | ₹ 2,50,000 पर्यंत |
| IIT मधील विद्यार्थी | ₹ 2,00,000 पर्यंत |
| IIM मधील विद्यार्थी (MBA/PGDM) | ₹ 5,00,000 पर्यंत |
| वैद्यकीय (Medical Students) | ₹ 4,50,000 पर्यंत |
| परदेशातील शिक्षण (SC/ST साठी) | ₹ 20,00,000 पर्यंत |
Platinum Jubilee Asha Scholarship Documents
- जर तुम्ही पदवीच्या पहिल्या वर्षाला असाल, तर १२वीची गुणपत्रिका
- सध्याच्या अभ्यासक्रमाची ‘फी पावती’
- आधार कार्ड (किंवा) पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक
- तुम्ही सध्या शिकत असलेल्या कॉलेज/संस्थेचे ओळखपत्र बोनाफाईड सर्टिफिकेट
- तहसीलदार किंवा सक्षम सरकारी अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला (किंवा) पालकांचे सॅलरी स्लिप (किंवा) फॉर्म 16
- अर्जदाराच्या स्वतःच्या (किंवा पालकांच्या) बँक खात्याच्या पासबुकची प्रत किंवा रद्द केलेला चेक
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचा दाखला (जर तुम्ही SC/ST प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत असाल तरच आवश्यक आहे.)
Platinum Jubilee Asha Scholarship Application Process
अधिकृत वेबसाइट: विद्यार्थी मित्रांनो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज SBI फाउंडेशनच्या (sbiashascholarship.co.in) अधिकृत स्कॉलरशिप पोर्टलवरून किंवा त्यांचे अंमलबजावणी भागीदार (Implementation Partner) असलेल्या buddy4study.com (Buddy4Study) च्या वेबसाइटवरून करता येतो.
- तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. या दोन्हीपैकी कोणत्या एका अधिकृत लिंक वरती क्लिक करा.
- आता जर तुम्ही नवीन वापरकरते असाल तर तुम्हाला New रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी किंवा गुगल किंवा फेसबुक अकाउंट वापरून रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा.
- रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या नोंदणी करून मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवण्यात येईल तो पासवर्ड आणि लॉगिन आयडी वापरून अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन करा.
- लॉग इन केल्यानंतर स्कॉलरशिपच्या डॅशबोर्डवर तुम्हाला Platinum Jubilee Asha Scholarship Program हे शोधायचा आहे पण विद्यार्थी मित्रांना सहसा हे होम पेज वरतीच दिसतं.
- आता या योजनेच्या माहिती पेजवर तुम्हाला अप्लाय नाव किंवा स्टार्ट अप्लिकेशन असे बटन दिसतील तर त्यावरती क्लिक करा.
- तर आता तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती अचूक रित्या भरायची आहे. जसे की तुमची शैक्षणिक माहिती वैयक्तिक माहिती कौटुंबिक उत्पन्नाची माहिती आणि तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स.
- फॉर्म भरून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला अर्जासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून वेबसाईट वरती अपलोड करायची आहे या कागदपत्रांची यादी आपण लेखांमध्ये आधी बघितलीच आहे.
- आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर प्रेव्ह्यू या बटणावर क्लिक करून तुमचा भरलेला अर्ज हा पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासून घ्या आणि अर्जामध्ये काही चूक झाली असल्यास तो लगेच दुरुस्त करा.
- आता सर्व माहिती तुम्ही जर बरोबर भरली असेल आणि याची तुम्हाला खात्री पटली असेल Terms and Conditions या ऑप्शन वरती टिक करा आणि त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
NOTE: विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर Application Copy किंवा Application ID हा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे कारण भविष्यामध्ये यांचे काम पडू शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Deadline)
विद्यार्थी मित्रांनो या स्कॉलरशिप अंतर्गत अर्ज साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होत असतात आणि या 2025 वर्षासाठी अर्ज प्रक्रिया ही 19 सप्टेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 अशी स्पष्ट करण्यात आली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कृपया अर्ज करण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका कारण तांत्रिक टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या भरून तो सबमिट करा.
अर्ज करताना टाळायच्या चुका (Common Mistakes)
“प्लॅटिनम ज्युबिली आशा स्कॉलरशिप” चा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून काही सामान्य चुका होऊ शकतात. सर्वात मोठी चूक म्हणजे अस्पष्ट किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड करणे, विशेषतः Income Certificate. दुसरी चूक म्हणजे, बँक खात्याचे तपशील किंवा IFSC कोड चुकीचा भरणे, ज्यामुळे शिष्यवृत्ती मिळाल्यास पैसे जमा होण्यात अडथळा येतो.
तसेच, अनेक विद्यार्थी पात्रतेचे निकष नीट न वाचता (उदा. गुणांची टक्केवारी किंवा NIRF रँकिंग) अर्ज करतात, ज्यामुळे त्यांचा अर्ज सरळ Reject जातो. या चुका टाळण्यासाठी, अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेला संपूर्ण फॉर्म आणि अपलोड केलेली कागदपत्रे दोनदा तपासून घ्या. तसेच, शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करणे नेहमीच उत्तम.
Contact Details
| माध्यम | तपशील |
| Helpline Number | 011-430-92248 (वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी १० ते संध्याकाळी ६) |
| ईमेल (Email ID) | ashascholarship@sbifoundation.co.in (किंवा) sbiashascholarship@buddy4study.com |
| अधिकृत वेबसाइट | sbiashascholarship.co.in |
| Address | SBI फाउंडेशन, मुंबई, महाराष्ट्र. |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
या शिष्यवृत्तीसाठी कोण अर्ज करू शकतो?
आता या योजनेसाठी भारतीय विद्यार्थीच अर्ज करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांमध्ये परीक्षेत किमान 75 टक्के गुण (SC/ST:67.S%) आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 06 लाखापेक्षा कमी आहे आणि जे मान्यता प्राप्त शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतात असे विद्यार्थी या योजनेसाठी अगदी सहज पद्धतीने अर्ज करू शकतात.
मला किती शिष्यवृत्ती मिळेल?
शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या अभ्यासक्रमावर अवलंबून आहे. ही रक्कम वार्षिक ₹15,000 (शालेय) पासून ते ₹75,000 (पदवी), ₹2,50,000 (पदव्युत्तर) किंवा ₹5,00,000 (IIM) पर्यंत असू शकते.
अर्ज ऑनलाइन करायचा की ऑफलाइन?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. तुम्हाला sbiashascholarship.co.in किंवा Buddy4Study पोर्टलवरून अर्ज करावा लागेल. कोणताही ऑफलाइन फॉर्म स्वीकारला जाणार नाही.