महाराष्ट्र सरकारने परदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ओपन कॅटेगिरीतील गुणवंत मुला मुलींसाठी Maharashtra Foreign Education Scholarship योजना 4 ऑक्टोबर 2018 पासून सुरू केली.
यासोबतच ही योजना ओपन/अवर्गीकृत प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य देण्याकरिता सुरू करण्यात आली जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील गुणवंत विद्यार्थी परदेशामध्ये पदव्युत्तर (PG), तसेच diploma, PHD सारख्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करू शकतील.
या सोबतच विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करावे. ज्यामधील विद्यापीठे Times Higher Education (THE) किंवा Quacquarelli Symonds (QS) यांच्या टॉप २०० क्रमांकात समाविष्ट आहेत.
Maharashtra Foreign Education Scholarship 2025 In Marathi
| योजनेचे नाव | राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती |
| योजनेचा उद्देश | विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे |
| योजनेची सुरुवात | 4 ऑक्टोबर 2018 |
| आर्थिक सहाय्य | शिक्षण फी, राहण्याचा खर्च, प्रवास खर्च |
| योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी, शैक्षणिक पात्रता व उत्पन्न मर्यादा लागू |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन अर्ज (शिष्यवृत्ती पोर्टलवर) |
| अधिकृत वेबसाइट | mahadbt.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन क्रमांक | 1800-120-8040 |
राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना काय आहे
परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने परदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन इच्छेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकरीता सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण राहण्याचा खर्च आणि प्रवास खर्च दिला जातो, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
आता ज्या विद्यार्थ्यांना परदेशात मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये Post Graduation किंवा Ph.D. चा अभ्यास करण्यासाठी आर्थिक मदत हवी आहे. असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात हा या शिष्यवृत्ती सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे.
राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना उद्दिष्टे
- भारत व महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणे.
- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन भारताचे व महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणे.
- तसेच महाराष्ट्रातील पात्र व हुशार विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षण घेण्याकरिता संधी उपलब्ध करून देणे.
- गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबावे लागू नये म्हणून यासाठी आर्थिक मदत करणे.
- आणि महत्त्वाचे म्हणजे परदेशातील मान्यता प्राप्त विद्यापीठातील उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना संधी मिळवून देणे.
- महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे.
राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना पात्रता
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्याला पदवी/पदव्युत्तर शिक्षणामध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले असावे.
- आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना म्हणजेच SC/ST कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना 55% टक्के गुण असावे.
- या योजनेच्या शिष्यवृत्ती अर्जाची वयोमर्यादा हे 35 वर्षापर्यंत आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे साधारणतः ₹6 ते ₹8 लाखापर्यंत असावे.
- विद्यार्थ्याला परदेशातील मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार विद्यार्थ्याने यापूर्वी याच स्वरूपाची कोणतीही स्कॉलरशिप घेतलेली नसावी.
- तसेच ही स्कॉलरशिप पूर्णपणे अभ्यासक्रमासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठीच लागू आहे.
State Government Foreign Education Scholarship Scheme Benefits and Scholarship Amount
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अनेक लाभ दिले जातात. जसे की विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्च भागवणे त्यांना निवास, अन्न आणि दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत करणे यासोबतच विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च म्हणजेच भारत ते परदेश प्रवासासाठी सरकार करून विद्यार्थ्यांना विमान भाडे देण्यात येते.
तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संपूर्ण फी ही महाराष्ट्र सरकारमार्फत स्कॉलरशिपच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच या लाभामध्ये इतर शैक्षणिक खर्च पण समाविष्ट आहे जसे की पुस्तके, स्टेशनरी आणि विद्यार्थ्यांना लागणारे इतर शैक्षणिक साहित्य.
या योजनेअंतर्गत मिळणारे शिष्यवृत्तीची रक्कम हे देशानुसार तसेच विद्यापीठ व अभ्यासक्रमानुसार बदलत असते तसेच साधारणपणे महाराष्ट्र सरकार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संपूर्ण फ्री आणि त्याच्या राहणीमानाचा खर्च पुरवत असते काही प्रकरणांमध्ये अंदाजे विद्यार्थ्यांना वार्षिक 15 लाखापर्यंत आर्थिक सहाय्यक हे सरकारमार्फत मिळू शकते.
राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाईन आहे, प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स तुम्हाला मदत करतील:
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टल (mahadbt.maharashtra.gov.in) यावरती नोंदणी करायची आहे.
- नवीन उमेदवारांना आधार कार्ड क्रमांक वापरून खाते तयार करावे लागेल.
- आता प्रोफाइल मध्ये तुमची वैयक्तिक माहिती तसेच शैक्षणिक माहिती व बँक खात्याची माहिती भरा.
- आणि यासोबतच पासपोर्ट फोटो व इतर कागदपत्रे अपलोड करा.
- यानंतर शिष्यवृत्ती मधल्या यादीतून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना हा पर्याय निवडा.
- आणि अर्जामध्ये मागितली जाणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या अपलोड करा जसे की शैक्षणिक गुणपत्रिका, पासपोर्ट, परदेशी विद्यापीठाचे प्रवेशपत्र (Admission Letter), उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
- अर्ज व्यवस्थित रित्या भरून झाल्यावर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर अर्ज क्रमांक म्हणजेच Application ID सेव करून ठेवा.
- आता या अर्जाची तपासणी शासन स्तरावर केली जाईल अर्जदार पात्र असल्यास शिष्यवृत्तीला मंजुरी दिली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक गुणपत्रिका
- पासपोर्ट
- प्रवेशपत्र (University Admission Letter)
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (जर लागले तर)
राज्य सरकार परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना – महत्वाच्या सूचना
- विद्यार्थी मित्रांनो अर्ज तुम्हाला फक्त महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे कारण इतर कुठल्याही माध्यमातून हा अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज भरताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करा आणि अपलोड करा.
- अर्जदार उमेदवाराची माहिती हे अर्ज भरताना खरे आणि बरोबर असावी अन्यथा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.
- जर अर्ज दराने अंतिम तारीख संपल्यानंतर अर्ज भरला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांनी एप्लीकेशन स्टेटस पोर्टलवर वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.
- परदेशी विद्यापीठ मान्यताप्राप्त (Recognized University) असणे आवश्यक आहे.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी एकाच वेळी इतर शिष्यवृत्ती किंवा परदेश शिष्यवृत्तीसाठी सरकारकडून आर्थिक मदत घेतलेली असल्यास अर्ज भरताना अशी माहिती जाहीर करावी.
- अर्ज सबमिट करून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट आणि एप्लीकेशन आयडी SAVE करून ठेवा.
Conclusion
महाराष्ट्र सरकारने परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्चं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि येणाऱ्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही पण या स्कॉलरशिप मुळे त्यांना एक मोठा आधार मिळतो.
योग्य पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणाची फी राहण्याचा खर्च आणि प्रवास खर्चासाठी संपूर्ण मदत मिळू शकते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ नक्की घ्यायला हवा आणि हा महत्त्वाचा लेख तुमच्या मित्र परिवारातील परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा.
या शिष्यवृत्तीसाठी कोण अर्ज करू शकतो?
जे विद्यार्थी कायमचे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात तसेच ज्यांनी पदवी/पदव्युत्तर शिक्षणात किमान 60 टक्के गुण मिळवलेले आहेत यासोबतच ते आरक्षित प्रवर्गातील आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे
शिष्यवृत्तीत कोणते खर्च कव्हर केले जातात?
शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी राहण्याचा खर्च तसेच प्रवास खर्च आणि इतर शैक्षणिक खर्च उदाहरणार्थ पुस्तके प्रयोग शाळेची फी समाविष्ट आहे
शिष्यवृत्ती किती रक्कम मिळते
शिष्यवृत्तीची मिळणारी रक्कम देश विद्यापीठ आणि अभ्यासक्रमानुसार बदलत असते साधारणपणे शिक्षण की आणि राहणीमानाचा व प्रवास खर्च अंदाजे 15 लाखापर्यंत राज्य सरकारकडून देण्यात येतो