Ladki Bahin Yojana 2026: लाडक्या बहिणींनो 1500 रु. जमा झाले नसतील तर आताच ही 05 कामे करा! राज्य सरकारची मोठी सूचना

Ladki Bahin Yojana 2026: लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनही जमा झाला नाही का जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करून आता पैसे जमा झाले नसतील किंवा अर्जाचे स्टेटस चेक केल्यावर तिथे Approved तरीही तुमच्या बँक खात्यामध्ये जानेवारी 2026 चा हप्ता अद्याप जमा झाला नाही? आता या प्रश्नांवर जर तुमचे उत्तर हो असेल तर लाडक्या बहिणींनो तुम्ही एकट्या नाही आहात.

कारण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या हजारो महिलांना ‘Ladki Bahin Yojana payment pending’ या समस्येला सामोरे जावे लागत आहे आणि अनेक वहिनींना असं वाटते की केवळ बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले म्हणजे आपले काम झाले पण लाडक्या बहिणींनो वास्तव काही वेगळच आहे कधीकधी सर्व बरोबर असून सुद्धा एका लहानशा तांत्रिक चुकीमुळे तुमचे हक्काचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत.

म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ई-केवायसी असून देखील पैसे न येण्या मागची पाच मोठी कारणे काय आहेत आणि ती घरबसल्या तुम्ही कशी दुरुस्त करू शकता जेणेकरून अडकलेले पैसे त्वरित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

Ladki Bahin Yojana 2026 Top 5 Reasons for Payment Failure

महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेची हप्ते जमा केले पण ते जर तुमच्या खात्यापर्यंत पोहोचले नसतील तर याची पाच तांत्रिक कारणे असू शकतात जे मी तुम्हाला खाली समजून सांगितले आहेत:

बँक खात्याला आधार ‘फक्त लिंक’ असणे (Aadhaar Linked but NOT Seeded)

महाराष्ट्र राज्यामधील बऱ्याच लाडक्या बहिणींनी एक कॉमन चूक केली आहे अनेक महिलांना असं वाटते की त्यांचे आधार कार्ड बँकेला जोडले म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील पण लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेचे पैसे Direct Benefit Transfer द्वारे येत असतात आणि यासाठी तुमचे बँक खाते केवळ आधार कार्ड सोबत लिंक असून चालत नाही तर ते NPCI Server वर मॅप असणे आवश्यक असते जर तुमचे बँक खाते NPCI ला SEED नसेल तर लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही.

डीबीटी स्टेटस इनॅक्टिव्ह असणे (DBT Inactive Status)

लाडक्या बहिणींना बघा बऱ्याचदा आधार सीडिंग सुरू असते पण बँकेच्या सिस्टीम मध्ये DBT Benefit चा ऑप्शन ऑफ असतो किंवा इन ऍक्टिव्ह असतो आता तुम्ही जर Ladki Bahin Yojana status check online 2026 पोर्टल वरती जाऊन बघितलं तर तेथे Aadhaar Seeding Status च्या समोर जर नो किंवा पेंडिंग असं दिसत असेल तर हे महत्त्वाचे आणि मुख्य कारण आहे तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात न जमा होण्याचे.

 नावात तफावत असणे (Name Mismatch)

पुढच्या बहिणींनो तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि तुमच्या बँक खात्यातील बँक पासबुक वरील नाव यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा लग्नानंतरचे नाव आणि माहेरचे नाव जर वेगळे असेल तर सिस्टीम तुमचे पेमेंट रिजेक्ट करते म्हणूनच अर्जातील नाव आणि बँक खात्यावरील नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.

जुन्या किंवा बंद खात्यात पैसे जाणे (Money Credit in Old Account)

बघा लाडक्या बहिणींनो कधी कधी आधार नंबर दोन ते तीन बँक खात्यामध्ये लिंक असतो अशावेळी NPCI त्या नियमानुसार जे बँक खाते शेवटी आधार कार्ड सोबत सीड झालेले असते त्याच बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात आणि बऱ्याचदा पैसे एका जुन्या बँक खात्यामध्ये जमा होतात जे तुम्ही आता वापरत नाही आहात आणि तुम्ही सध्याच्या चालू पासबुक मध्ये एन्ट्री चेक करत असता त्यामुळे तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर एकदा तुमचे जुने बँक खाते नक्की तपासा.

बँक खाते ‘डॉर्मंट’ किंवा ‘फ्रीज’ असणे (Account Dormant/Frozen)

जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून मागील सहा महिन्यात कोणताही व्यवहार केला नसेल म्हणजेच एकही ट्रांजेक्शन मागील सहा महिन्यात किंवा एका वर्षात नसेल तर बँके कडून तुमचे बँक खाते हे तात्पुरते बंद केले जाते अशावेळी बंद खात्यात सरकारी योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाही यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक छोटा व्यवहार म्हणजेच पैसे डिपॉझिट किंवा विड्रॉल करून बँक खाते पुन्हा ॲक्टिव्ह करून घ्यावे लागते.

तुमचे पैसे मिळवण्यासाठी आताच करा या ४ गोष्टी (Step-by-Step Solution)

लाडक्या बहिणींनो जर तुमचे पैसे अडकले असतील तर आता काळजी करू नका खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे शंभर टक्के मिळवू शकता.

आधार सीडिंग (Aadhaar Seeding) स्टेटस ऑनलाईन तपासा

बँकेमध्ये जाण्यापूर्वी घरी बसून खात्री करा की तुमचे आधार NPCI ला लिंक आहे की नाही आता हे बघण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वात आधी Google वर “UIDAI My Aadhaar” सर्च करा किंवा थेट myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • ‘Login’ बटनावर क्लिक करा. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा (Captcha) टाकून ‘Send OTP’ म्हणा.
  • मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉग-इन करा.
  • होमपेजवर ‘Bank Seeding Status’ या ऑप्शनवर क्लिक करा.
  • जर तिथे ‘Active’ आणि तुमच्या बँकेचे नाव दिसत असेल, तर तुमचे काम झाले आहे. जर ‘Inactive’ किंवा ‘No Bank Found’ दिसत असेल, तर तुम्हाला बँकेत जावे लागेल.

हे नक्की वाचा: PM Vishwakarma Yojana 2026: ऑनलाईन अर्ज, पात्रता आणि सिलाई मशीन अपडेट्स | 3 लाख कर्ज व फ्री ट्रेनिंग

DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का ते तपासा (Scheme Portal)

  • ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • ‘अर्जदार लॉग-इन’ (Applicant Login) वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
  • ‘पूर्वी केलेले अर्ज’ (Applications Made Earlier) या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमच्या अर्जाच्या पुढे ‘Aadhaar Seeding Status’ नावाचा रकाना बघा.
  • जर तिथे ‘Yes’ असेल, तर काळजीचे कारण नाही.
  • जर तिथे ‘No’ किंवा ‘Pending’ असेल, तर याचा अर्थ तुमची DBT लिंक तुटलेली आहे.

बँकेत जाऊन काय करावे? (Offline Process)

लाडक्या बहिणींनो जर Step 1 किंवा Step 2 मध्ये स्टेटस ‘Inactive/No’ आले असेल, तर बँकेत गेल्यावर फक्त “आधार लिंक करा” असे म्हणू नका.

  • बँक मॅनेजरला स्पष्ट सांगा: “मला माझ्या खात्याला NPCI मॅपिंग (DBT Enable) करायचे आहे, फक्त आधार लिंक नको.”
  • बँकेतून ‘Aadhaar Seeding Form’ किंवा ‘DBT Mandate Form’ मागा.
  • फॉर्म भरताना “Change DBT Mapping to this account” किंवा “Use my Aadhaar for DBT benefits” या ऑप्शनवर टिक करा.
  • हा फॉर्म दिल्यावर २४ ते ४८ तासांत तुमचे स्टेटस ऑनलाईन अपडेट होईल.

तक्रार कुठे करावी? (Helpline & Grievance)

लाडक्या बहिणींनो आता सर्व काही बरोबर असून देखील तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तेथे तक्रार नोंदवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे देखील संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.

  • हेल्पलाईन नंबर: शासनाचा अधिकृत महिला हेल्पलाईन नंबर 181 वर कॉल करा. तिथे तुमची तक्रार सविस्तर नोंदवून घ्या.
  • अंगणवाडी सेविका: तुमच्या गावातील किंवा वॉर्डातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. त्यांच्याकडे ‘नारी शक्ती दूत’ ॲपद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय आहे.
  • तहसील कार्यालय: तुमच्या अर्जात ‘उत्पन्न’ किंवा ‘जमीन’ यासंबंधी काही त्रुटी असल्यास तहसील कार्यालयातील ‘लाडकी बहीण योजना कक्षा’शी संपर्क साधा.

जानेवारी २०२६: नियमात झालेले महत्त्वाचे बदल (Key Rule Changes)

लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारने जानेवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया हे अधिक कडक केली आहे आणि या प्रक्रियेमध्ये आणखी नवीन नियम ऍड केले आहेत.

  • तर बघा आता ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असून सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी खोटी माहिती भरून अर्ज केला होता अशा महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे म्हणजे यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • पूर्वी केवळ आधार लिंक असल्यावर चालत होते, पण आता ‘NPCI मॅपिंग’ नसेल तर पैसे थेट थांबवले जात आहेत. कोणतीही सवलत दिली जात नाही.
  • कुटुंबातील जमिनीची अट काही ठिकाणी शिथिल करण्यात आली होती, पण आता पुन्हा ७/१२ वाऱ्याची सखोल तपासणी सुरू आहे.

Pending आणि Rejected अर्जांसाठी नवीन संधी

ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज काही कारणास्तव रिजेक्ट झाले होते त्या लाडक्या बहिणींना सरकारने आता पुन्हा अपील करण्याची सुविधा दिली आहे आता पोर्टलवर काही कालावधीसाठी एडिट एप्लीकेशन चा पर्याय दिला जातो. जर तुमचा अर्ज फोटोमध्ये अस्पष्ट असल्यामुळे किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही आता अंगणवाडी सेविकेच्या मदतीने तो पुन्हा दुरुस्त करू शकता आणि अर्ज पुन्हा सबमिट करू शकता.

जर तुम्हाला वाटते की तुमचा अर्ज चुकीच्या कारणास्तव रिजेक्ट झाला आहे तर तुम्ही तुमच्या गावातील तहसील कार्यालयात भेट देऊन लाडकी बहीण योजना समितीकडे लेखी तक्रार करू शकता जिथे तुमच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी होईल आणि तुमचा अर्ज Approve करण्यात येईल.

अडकलेले पैसे (Arrears) पुन्हा मिळतील का?

जर तुमचे पैसे केवळ आधार लिंकिंग नसल्यामुळे किंवा केवायसी नसल्यामुळे अडकले असतील तर हो तुमचे पैसे पुढील हप्त्यामध्ये नक्की जमा होतील. पण सरकारी नियमानुसार एकदा तुम्ही त्रुटी दूर केली आणि तुमचे स्टेटस ऍक्टिव्ह झाले की त्या पुढील हप्त्यांसोबतच तुमचे मागील थकलेले हप्ते एकाच वेळी बँकेमध्ये जमा केले जातात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो समजा तुमचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चे पैसे आले नाहीत तर तुम्ही 20 जानेवारीला बँक लिंक केली तर फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला चार महिन्याचे म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

माझा अर्ज मंजूर (Approved) आहे, तरीही खात्यात पैसे का आले नाहीत?

अर्ज मंजूर असणे म्हणजे फक्त अर्जाची तपासणी पूर्ण झाली आहे. पण पैसे मिळण्यासाठी तुमचे बँक खाते आधारशी सीड (NPCI Mapped) असणे अनिवार्य आहे. जर तुमचे DBT स्टेटस ‘Inactive’ असेल, तर पैसे येणार नाहीत.

मी माझे बँक खाते बदलू शकते का?

हो. तुम्ही नवीन बँक खात्याला आधार लिंक केले आणि DBT फॉर्म भरून दिला, की ऑटोमॅटिकली तुमचे पुढील हप्ते या नवीन खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. यासाठी पोर्टलवर जाऊन बदल करण्याची गरज नाही, हे NPCI लेव्हलला आपोआप होते.

Conclusion

थोडक्यात सांगायचे तर…लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील, फक्त गरज आहे थोड्या संयमाची आणि सतर्कतेची! जर तुमचे पैसे अडकले असतील, तर घाबरून जाऊ नका. बहुतांश वेळा ही बँकेच्या बाजूने असलेली तांत्रिक अडचण असते. वर दिलेल्या माहितीनुसार एकदा तुमचे आधार सीडिंग स्टेटस तपासा आणि बँकेत जाऊन DBT फॉर्म भरून द्या.

लक्षात ठेवा, तुमचे पैसे सुरक्षित आहेत. एकदा तुमची तांत्रिक चूक सुधारली की, सरकार तुम्हाला मागील सर्व महिन्यांचे थकलेले हप्ते (Arrears) एकाच वेळी जमा करेल. त्यामुळे आत्ताच कामाला लागा आणि आपले स्टेटस अपडेट करा!

ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली का? जर हो, तर हा लेख तुमच्या मैत्रिणींना, बहिणींना आणि नातेवाईकांना WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचेही अडकलेले पैसे मिळण्यास मदत होईल.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *