MSRTC मध्ये कायमस्वरूपी भरती; 17,742 जागा – इतकी मोठी संधी पुन्हा नाही, आताच पात्रता तपासा

msrtc bharti apply online maharashtra: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल यासोबतच नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता आपल्या महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने (MSRTC) तब्बल 17,742 पदांसाठी मेगा भरतीची घोषणा ही केली आहे. आणि याची माहिती स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच विधान परिषदेमध्ये दिली.

विद्यार्थी मित्रांनो आता जर तुम्ही देखील शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत सुवर्णसंधी आहे. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विधान परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी असे सांगितले की एसटी महामंडळाच्या टाक्यांमध्ये नवीन 5000 बसेस दाखल होणार आहे आणि या बसेस चालवण्याकरिता व इतर व्यवस्थापनाकरिता मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर आणि कंडक्टर ची गरज पडेल.

MSRTC Bharti 2026

माहितीचे वर्णनतपशील
योजनेचे/भरतीचे नावMSRTC मेगा भरती 2026
सरकारमहाराष्ट्र शासन
संबंधित विभागमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ)
एकूण पदे17,742 पदे
प्रमुख पदेDriver, Conductor, लिपिक, सहाय्यक, तांत्रिक पदे
अर्ज पद्धतऑनलाईन (लवकरच सुरू होईल)
अधिकृत वेबसाईटmsrtc.maharashtra.gov.in

MSRTC Bharti Kay Ahe

मित्रांनो या भरती करिता अर्ज करण्यासाठी सर्वात आधी MSRTC Bharti काय आहे हे तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. तर बघा एसटी महामंडळ सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरिता आणि या सोबतच आपली सेवा अधिक विस्तारित आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे आणि यामध्येच बसेसचा तुटवडा देखील बघायला मिळतो म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावर चालक आणि वाहक भरतीचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो सुरुवातीला हे भरती Contractual स्वरूपात असू शकते परंतु भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीचे आश्वासन देखील राज्य सरकारने दिले आहे.

MSRTC Bharti Eligibility Criteria

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या भरती करिता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील:

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • तसेच चालक पदासाठी उंची आणि दृष्टीचे निकष हे काटेकोरपणे पाडले जातील.
  • अर्जदाराचे वयोमर्यादा 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावी सोबतच राखीव प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत देखील मिळणार आहे.
  • अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे सोबतच अर्जदाराकडे अवजड वाहन चालक परवाना असणे सुद्धा अनिवार्य आहे.

MSRTC Bharti Benefits

  • या भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
  • ही भरती कंत्राटी तत्त्वावर असून देखील तुम्हाला महिन्याला तीस हजार रुपयापर्यंत पगार मिळतो.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या परिवहन संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव मिळतो.

MSRTC Bharti Required Documents

  • आधार कार्ड
  • १० वी/१२ वी/पदवी गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला (LC)
  • डोमिसाईल सर्टिफिकेट (महाराष्ट्राचा रहिवासी दाखला)
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • चालक परवाना (Driver’s License – फक्त चालकांसाठी)
  • पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी

MSRTC Bharti ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • Step 1: मित्रांनो सर्वात आधी msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • Step 2: त्या नंतर ‘Recruitment’ किंवा ‘भरती’ या ऑप्शन वर क्लिक करा.
  • Step 3: ‘MSRTC Mega Bharti 2026’ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
  • Step 4: आता अर्जात विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • Step 5: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • Step 6: परीक्षा शुल्क (असल्यास) ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • Step 7: फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा कारण भविष्यामध्ये कामात येऊ शकतो.

हेल्पलाइन आणि संपर्क तपशील

माहितीतपशील
टोल फ्री नंबर१८०० २२ १२४९
अधिकृत ईमेलmsrtc_support@maharashtra.gov.in
पत्तामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, मुंबई

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

एसटी महामंडळात किती जागांसाठी भरती होणार आहे?

मित्रांनो एसटी महामंडळ अंतर्गत 17,642 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

भरती कधी सुरू होणार आहे?

वित्त विभागाची मंजुरी मिळताच येत्या १-२ महिन्यात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल.

चालक पदासाठी काय पात्रता हवी?

१० वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना (Heavy License) असणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

मित्रांनो MSRTC Bharti 2026 महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे जर तुम्ही देखील तयारी करत असाल तर आतापासूनच तुमची कागदपत्रे आणि शारीरिक तयारी सुरू करा विशेष म्हणजे चालक आणि वाहक पदांसाठी खूप जास्त जागा असल्यामुळे यामध्ये स्पर्धा देखील मोठी असेल. आता ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या बेरोजगार मित्रांना हा लेख नक्की शेअर करा.

ही पोस्ट नक्की वाचा: RRB ALP Recruitment 2026 (CEN 01/2026) Notification Out – 11,127 पदांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *