LIC Bima Sakhi Yojana 2026 Marathi: महिलांना दरमहा ₹7,000 स्टायपेंड देणारी LIC ची नवीन योजना, अर्जाची पद्धत पहा

LIC Bima Sakhi Yojana 2026 Marathi: महिलांनो जर तुम्ही देखील दहावी पास असाल आणि घरबसल्या किंवा तुमच्या गावांमध्ये राहून अगदी सन्मानाने पैसे कमावण्याची तुमची देखील इच्छा असेल तर आता भारत सरकारने तुमच्यासाठी LIC विमा सखी योजना योजना सुरू केली आहे. महिलांना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमी करण्यासाठी राबविण्यात येत आहे.

आणि महत्त्वाचं म्हणजे 2026 च्या नवीन वर्षामध्ये या योजनेत काही महत्त्वाचे बदल आणि अपडेट देखील करण्यात आले आहे आता हेच अपडेट आणि महत्त्वाचे बदल आपण या लेखांमधून जाणून घेणार आहोत यासोबतच विमा सखी योजना म्हणजे काय या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

LIC Bima Sakhi Yojana 2026 Marathi

माहितीवर्णन
योजनेचे नावLIC विमा सखी योजना (Bima Sakhi Yojana)
कोणाद्वारे सुरूभारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) व ग्रामीण विकास मंत्रालय
लाभार्थी18 ते 70 वयोगटातील भारतीय महिला
प्रमुख फायदा3 वर्षे स्टायपेंड (मानधन) + कमिशन + मोफत ट्रेनिंग
शैक्षणिक पात्रताकिमान 10 वी उत्तीर्ण
अर्ज प्रक्रियाऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (Offline)
अधिकृत वेबसाइटhttps://licindia.in/hi/lic-s-bima-sakhi

LIC Vima Sakhi Yojana Kay Ahe

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की LIC विमा सखी योजना ही प्रामुख्याने महिलांना INSURANCE AGENT म्हणून प्रशिक्षित करण्याकरिता सुरू केलेली Stipendiary योजना आहे आता तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर LIC मार्फत तुम्हाला काम शिकवण्यासाठी पहिल्या तीन वर्षापर्यंत दर महिन्याला ठराविक पगार देईल आणि या सोबतच तुम्ही केलेल्या कामावर तुम्हाला कमिशन सुद्धा मिळेल.

महिलांनो या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे असा आहे आणि गावागावात विम्याचा प्रसार करणे हा आहे.

Eligibility Criteria

या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे तर खाली दिलेल्या मुद्द्यानुसार तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता.

  • या योजनेसाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अर्जदार महिलेचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • महिला उमेदवार किमान दहावी पास असणे अनिवार्य आहे जर महिला उमेदवार उच्चशिक्षित असेल तर तिला अधिक प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना किंवा स्वयंसहाय्यता गटातील महिलांना अधिक प्राधान्य दिले जाईल.
  • जर तुमच्या कुटुंबातील कोणीही म्हणजेच पती, मुले, आई-वडील, सासू-सासरे आधीच LIC मध्ये कर्मचारी किंवा एजंट असतील तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

विमा सखी योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाते आणि यासोबतच जर तुम्ही पाच वर्ष यशस्वीरित्या काम केले तर पदवीधर महिलांना एलआयसी मध्ये Development Officer पदाच्या परीक्षेमध्ये आरक्षण किंवा विशेष संधी देखील मिळू शकते.

आणि महत्त्वाचं म्हणजे विमा सखी योजनेमध्ये तुम्हाला तीन वर्षापर्यंत खालील प्रमाणे पैसे देखील दिले जातात

वर्षदरमहा मानधन
पहिले वर्ष₹7,000 हजार
दुसरे वर्ष₹6,000 हजार
तिसरे वर्ष₹5,000 हजार

NOTE: महिलांनो हे मानधन मिळवण्याकरिता तुम्हाला एलआयसीमार्फत मिळणारे छोटे छोटे टार्गेट पूर्ण करावे लागतात याशिवाय तुम्ही जो विमा काढल त्यावर तुम्हाला भरघोस वेगवेगळे कमिशन मिळते.

Required Documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक / कॅन्सल चेक
  • २ पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर (आधारशी लिंक असलेला)

LIC विमा सखी योजनेचा अर्ज कसा करावा?

महिलांनो LIC विमा साठी योजनेचा अर्ज तुम्ही दोन पद्धतीने करू शकता पहिली म्हणजे ऑनलाइन पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धत आणि या दोन्हीही पद्धती मी खाली दिलेल्या स्टेप्स मध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित रित्या समजून सांगितल्या आहेत.

ही पोस्ट नक्की वाचा: लेकीला मिळणार ₹18 लाख! केंद्र सरकारची ही योजना देतीय बँक FD पेक्षा जास्त व्याज

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • Step 1: LIC च्या अधिकृत वेबसाइटवर (licindia.in) जा.
  • Step 2: होमपेजवर खाली स्क्रोल करा आणि ‘Click for Bima Sakhi’ किंवा ‘Agency Career’ पर्यायावर क्लिक करा.
  • Step 3: तेथे ‘Registration for Bima Sakhi’ हा फॉर्म उघडेल.
  • Step 4: तुमचे नाव, पत्ता, शिक्षण आणि मोबाईल नंबर भरा.
  • Step 5: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • Step 6: फॉर्म सबमिट करा. त्यानंतर LIC चे अधिकारी (Development Officer) तुम्हाला संपर्क करतील.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • तुमच्या जवळच्या LIC शाखेत (Branch Office) जा.
  • तेथील ‘विकास अधिकारी’ (Development Officer) किंवा ‘शाखा व्यवस्थापक’ (Branch Manager) यांची भेट घ्या.
  • त्यांना ‘विमा सखी’ योजनेत सहभागी व्हायचे असल्याचे सांगा.
  • ते तुम्हाला एक फॉर्म देतील, तो भरून कागदपत्रांसह जमा करा.

Helpline & Contact Details

माहितीतपशील
Toll-Free Number1800 22 4040
Official Websitewww.licindia.in
ईमेलco_agency@licindia.com

Conclusion

महिलांनो LIC विमा सखी योजना 2026 ही केवळ आर्थिक योजना नसून ती महिलांना सन्मानाने जगण्यासाठी मिळालेली एक संधी आहे महिलांनो जर तुम्ही शिकलेल्या असाल आणि तुम्हाला लोकांशी संवाद साधायला आवडत असेल तर या योजनेसाठी नक्कीच अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *