Divyang Sahayak Portal 2026: आता सरकारी योजनांचे फायदे मिळणार थेट घरी बसून!

Divyang sahayak portal maharashtra: नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकारने राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी एक मोठे आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. तर बघा फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते Divyang Sahayak Portal उद्घाटन करण्यात आले होते आता हे पोर्टल केवळ एक वेबसाईट नसून दिव्यांग बांधवांसाठी सर्व सरकारी योजनांचे वन स्टॉप डेस्टिनेशनच आहे म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता कागदपत्रांसाठी आणि सरकारी ऑफिसच्या चकरा मारण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही.

कारण या पोर्टलच्या मदतीने तुम्ही सर्व योजनांचे अर्ज घरी बसून भरू शकता म्हणूनच मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या नवीन पोर्टलवर नोंदणी कशी करायची तसेच या पोर्टलचे 2026 मधील नवीन नियम काय असणार आहेत आणि तुम्हाला या पोर्टलच्या माध्यमातून कोणते कोणते लाभ मिळणार आहेत.

Divyang Sahayak Portal : Quick Overview Table

माहितीतपशील
योजनेचे नावदिव्यांग सहाय्यक पोर्टल (Divyang Sahayak Portal)
राज्यमहाराष्ट्र
विभागदिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाचे नागरिक
मुख्य लाभ२१ प्रकारच्या योजनांचे ऑनलाइन अर्ज, DBT लाभ, पेन्शन
अर्ज पद्धतऑनलाइन (Online Registration)
अधिकृत वेबसाईटdivyangsahayakportal.maharashtra.gov.in
नवीन अपडेट २०२६AI आधारित तक्रार निवारण आणि स्वयंचलित (Auto-forward) मंजुरी प्रणाली
टोल-फ्री क्रमांक१८००-१२०-८०४० (Helpdesk)
ईमेलsupport-divyangsahayak@maharashtra.gov.in
पत्ताआयुक्त, दिव्यांग कल्याण विभाग, ३ चर्च रोड, पुणे

Divyang Sahayak Portal Update 2026

  • नवीन अपडेट नुसार आता पोर्टल वरती अर्जात काही त्रुटी असल्यास AI सिस्टीम द्वारे त्वरित तुम्हाला सुचित करण्यात येईल.
  • जर तुमच्या अर्जावर संबंधित अधिकाऱ्याने ठराविक दिवसांमध्ये निर्णय घेतला नाही तर तो अर्ज ऑटो फॉरवर्ड सिस्टीम द्वारे आपोआप वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मंजूर करण्यासाठी पाठवला जाईल.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व योजनांसाठी UDID CARD लिंक करणे बंधनकारक झाले आहे.

Divyang Sahayak Portal काय आहे?

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दिव्यांग सहाय्य पोर्टल हे महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेले एक महत्त्वाचे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या पोर्टल वरती राज्यातील 29 लाख हून अधिक दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ अगदी सहज पद्धतीने घेता येतो हाच या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे आणि हे पोर्टल Rights of Persons with Disabilities Act, 2016 अंतर्गत तयार करण्यात आले आहे.

Divyang Sahayak Portal चे उद्दिष्ट

  • हे पोर्टल सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालून थेट लाभ दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवणे.
  • दिव्यांग बांधव या पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ज्यामुळे त्यांना शारीरिक त्रास देखील कमी होईल.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षण नोकरी पेन्शन आणि उपकरणांसाठी तुम्हाला वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज नाही.

Divyang Sahayak Portal पात्रता निकष

  • महाराष्ट्रातील रहिवासीच या पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करू शकतात.
  • अर्जदाराकडे किमान 40 टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय योजनेनुसार 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे.

Divyang Sahayak Portal मिळणारे फायदे

  • शिक्षण शिष्यवृत्ती: इयत्ता 01 ली ते उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक मदत.
  • स्वयंरोजगार कर्ज: 15,000 रुपयांपर्यंतचे साहित्य किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्य.
  • पेन्शन योजना: संजय गांधी निराधार आणि इतर पेन्शन योजनांचे थेट बँक खात्यात (DBT) वितरण.
  • साधनसामग्री: व्हीलचेअर, श्रवणयंत्र, जयपूर फूट इत्यादी मोफत वाटप.
  • विवाह अनुदान: दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी शासन निर्णयानुसार आर्थिक मदत.

Divyang Sahayak Portal आवश्यक कागदपत्रे

  • UDID कार्ड (युनिक डिस्ॲबिलिटी आयडी)
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट)
  • बँक पासबुक (आधार लिंक असलेले)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला (काही योजनांसाठी)

Divyang Sahayak Portal Step-by-Step Application Process

मित्रांनो या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता तसेच योजनांसाठी अर्ज देखील करू शकता पण या योजनांचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करावे लागेल आता हे रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला खाली दिली आहे.

  • पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलच्या divyangsahayakportal.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या बटणावरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुमचा मोबाईल नंबर आणि यासोबतच UDID नंबर टाकून प्रोफाईल तयार करून घ्या.
  • आता पोर्टल वरती लोगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती हे व्यवस्थित रित्या भरायचे आहे जसे की नाव, पत्ता, दिव्यांकाचा प्रकार
  • आता सर्च स्कीम मध्ये जाऊन तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला योजना निवडायची आहे.
  • योजना निवडल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

Offline Application

मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी येत असतील किंवा ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता.

अर्ज करताना ह्या चुका करू नका

  • चुकीचा UDID नंबर: नेहमी वैध आणि अपडेटेड UDID कार्ड वापरा.
  • अस्पष्ट कागदपत्रे: फोटो किंवा कागदपत्रे अपलोड करताना ती स्पष्ट वाचता येतील अशी असावीत.
  • बँक खाते: बँक खाते आधारशी लिंक नसेल तर DBT पैसे जमा होणार नाहीत.

Important FAQs

दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करणे मोफत आहे का?

होय मित्रांनो दिव्यांग बांधव या पोर्टलच्या माध्यमातून अगदी मोफत नोंदणी करू शकतात.

जुने अपंग प्रमाणपत्र चालेल का?

पोर्टलवर नोंदणीसाठी डिजिटल UDID कार्ड असणे आवश्यक आहे. जुन्या प्रमाणपत्राचे UDID मध्ये रूपांतर करून घ्यावे.

पेन्शनचे पैसे कधी मिळतात?

अर्जाची पडताळणी झाल्यानंतर दर महिन्याला DBT द्वारे थेट खात्यात पैसे जमा होतात.

Conclusion

दिव्यांग बांधवांसाठी सुरू केलेले महाराष्ट्र सरकारने Divyang Sahayak Portal हे डिजिटल युगातील एक मोठी वरदानच ठरले आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी दिव्यांग बांधव असेल तर आजच या पोर्टल वरती नोंदणी करा यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळेल आणि सर्व प्रोसेस अगदी पारदर्शक आणि सोपी पद्धतीने पूर्ण होईल.

ही पोस्ट नक्की वाचा: राज्यातील कामगारांसाठी मोठी बातमी! Essential Kit Appointment Kamgar Yojana 2026 सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *