राज्यातील कामगारांसाठी मोठी बातमी! Essential Kit Appointment Kamgar Yojana 2026 सुरू

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे ते म्हणजे बांधकाम कामगारांना Essential Kit Kamgar Yojana 2026 अंतर्गत कामगारांना दैनंदिनी वापराच्या वस्तूचे संच आणि घरगुती भांडी संच मोफत मिळण्यास सुरुवात झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे 2026 च्या नवीन अपडेट नुसार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रक्रिया देखील अर्जदारांसाठी सोपी केली आहे आता कामगारांना त्यांच्या मोबाईलवरून घरबसल्या या किटसाठी अपॉइंटमेंट बुक करता येईल मित्रांनो जर तुम्ही अजूनही या योजनेच्या लातापासून वंचित असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Overview Table

माहितीतपशील
योजनेचे नावEssential Kit / Household Items Kit Distribution 2026
राज्यमहाराष्ट्र
विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MahaBOCW)
लाभार्थीनोंदणीकृत (Active) बांधकाम कामगार
मुख्य लाभअत्यावश्यक वस्तूंचा संच (भांडी, चटई, बेडशीट, इ.)
अर्ज पद्धतऑनलाइन (Online Appointment)
अधिकृत वेबसाईटmahabocw.in
नवीन अपडेट 2026नवीन जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू; वॉटर प्युरिफायरसह १० नवीन वस्तूंचा समावेश

नवीन अपडेट

तसेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने 2026 मध्ये या योजनेत महत्त्वाची अपडेट केले आहे जे आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या पॅरेग्राफ मध्ये सविस्तरपणे समजून सांगितली आहे.

  • मित्रांनो आता किटमध्ये फक्त भांडीच नाही तर तुम्हाला वॉटर प्युरिफायर तसेच स्टीलची मोठी कोठी आणि या सोबतच सोलर टॉर्च सारख्या आधुनिक वस्तू मिळणार आहेत.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन कोठा देखील प्राप्त झाला आहे आता ज्या लाभार्थ्यांची अर्ज प्रलंबित होते त्यांना आता प्राधान्य दिले जाणार आहे.
  • नवीन IWBMS पोर्टलद्वारे आता अपॉइंटमेंट स्लिप काढणे अनिवार्य झाले आहे, त्याशिवाय केंद्रावर किट मिळणार नाही.

योजना काय आहे?

महाराष्ट्र मधील बऱ्याच लोकांना अजून समजलेलं नाही की बांधकाम कामगार योजना ही नक्की काय आहे तर बघा महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी बांधकाम कामगार Essential Kit Yojana सुरू केली आहे आता कामाच्या ठिकाणी किंवा घरी राहताना कामगारांना लागणाऱ्या मूलभूत वस्तू विकत घेणे बऱ्याचदा परवडत नाही अशावेळी सरकारमार्फत त्यांना तीन ते पाच हजार रुपये किमतीचा वस्तूंचा संच मोफत दिला जातो आणि हीच योजना ग्रामीण भागामध्ये कामगार पेटी योजना किंवा भांडी संचय योजना नावाने ओळखली जाते.

पात्रता निकष

मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यापूर्वी या योजनेसाठी लागणारे पात्रता व निकष पूर्ण करणे हे अत्यंत गरजेचे आहे जे की मी तुम्हाला खालील प्रमाणे व्यवस्थित समजून सांगितले आहेत.

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्जदार कामगार MahaBOCW मंडळाकडे नोंदणीकृत असावा.
  • अर्जदार कामगाराचे रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ते रिन्यूअल केलेले असावे.
  • अर्जदार कामगाराने मागील बारा महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे आणि त्याच्याकडे हे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मिळणारे फायदे

मित्रांनो तुम्ही देखील बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला साधारणपणे खालील दहा ते तेरा वस्तू दिल्या जातात.

  • स्टीलची मोठी कोठी (धान्य साठवण्यासाठी)
  • वॉटर प्युरिफायर (पाणी गाळणी)
  • प्लास्टिक चटई (Mat)
  • बेडशीट आणि चादर (Blanket)
  • स्टीलचे डबे आणि जेवणाचे ताट
  • सोलर टॉर्च किंवा इमर्जन्सी लाईट
  • सुरक्षा संच (Safety Kit – हेल्मेट, जॅकेट, बूट)

आवश्यक कागदपत्रे

  • BOCW नोंदणी कार्ड (Labour Card)
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • चालू मोबाईल नंबर (OTP साठी)
  • ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • ऑनलाइन अपॉइंटमेंट स्लिप (Appointment Receipt)

अर्ज कसा करावा

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की या योजनेचा लाभ घेण्याकरिता थेट केंद्रावर जाऊन काहीच उपयोग नाही कारण तुम्हाला सर्वात आधी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करावी लागते ज्याची प्रक्रिया मी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स मध्ये समजून सांगितली आहे.

  • तर ही अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या योजनेच्या https://kitdist-v2.mahabocw.in/अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आहे.
  • आता तुमचा BOCW नोंदणी क्रमांक पोर्टल वरती प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो तुम्हाला इथे व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
  • आता तुमच्या समोर जिल्ह्याची यादी येईल त्या यादीमध्ये तुम्हाला जवळचे डिस्ट्रीब्यूशन सेंटर निवडायचे आहे.
  • आणि सोबतच उपलब्ध असलेली तारीख आणि वेळ नक्की निवडा.
  • आता संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर माहिती सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा आणि अपॉइंटमेंट रिसिप्ट ची प्रिंट नक्की काढून घ्या.

अर्ज स्टेटस आणि लाभार्थी यादी कशी तपासावी?

  • Status Check: तुम्ही महाबीओसीडब्ल्यू (MahaBOCW) च्या पोर्टलवर जाऊन ‘Worker Login’ मधून तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
  • Beneficiary List: जिल्हा कामगार कार्यालयाच्या (ALC Office) नोटीस बोर्डवर किंवा अधिकृत वेबसाईटवर ‘Essential Kit Distributed’ या टॅबमध्ये तुमच्या तालुक्याची यादी पाहता येते.

Helpline Number / Contact Details

संपर्क प्रकारतपशील
टोल-फ्री नंबर1800-8892-816
ईमेलsupport@mahabocw.in
पत्तामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई

Important FAQs

भांडी संच किंवा किट मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

नाही, ही योजना पूर्णपणे मोफत आहे. कोणालाही पैसे देऊ नका.

माझ्या जिल्ह्यात ‘Quota Full’ दाखवत आहे, काय करावे?

याचा अर्थ सध्या त्या जिल्ह्याचे वाटप पूर्ण झाले आहे. नवीन स्टॉक येताच वेबसाइट पुन्हा सुरू होईल, तोपर्यंत वाट पहा.

एका कुटुंबात दोन कामगार असतील तर दोघांना किट मिळेल का?

हो, जर दोघांची स्वतंत्र नोंदणी (Active Registration) असेल तर दोघांनाही लाभ मिळू शकतो.

Conclusion

Essential Kit Appointment Kamgar Yojana 2026 ही राज्यातील गरीब बांधकाम कामगारांसाठी एक मोठा आधार आहे. जर तुमचे रजिस्ट्रेशन चालू असेल, तर आजच ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करा आणि या मोफत किटचा लाभ घ्या. ही माहिती आपल्या इतर कामगार बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.

ही पोस्ट नक्की वाचा: Divyang Sahayak Portal 2026: आता सरकारी योजनांचे फायदे मिळणार थेट घरी बसून!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *