पात्र बांधकाम कामगारांना मोफत भांडी वाटप सुरू! तुमचं नाव आहे का? Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana

Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana: ज्या लोकांच्या कष्टाच्या घामातून मोठ्या मोठ्या इमारती उभा राहतात आणि मोठी मोठी शहरे निर्माण होतात त्या बांधकाम कामगारांचे आयुष्य मात्र एकदा मूलभूत गरजांसाठी झगडण्यातच जाते बांधकाम कामगार दिवसभर दगडाची मातीशी झुंजल्यानंतर स्वतःच्या घराच्या स्वयंपाक घरात त्यांच्या कुटुंबासाठी दोन वेळेचे अन्न शिजवतात पण बऱ्याचदा चांगल्या आणि पुरेशा भांड्यांची कमतरता त्यांना नेहमीच जाणवत असते.

पण आता बांधकाम कामगारांच्या कष्टाची दखल घेण्याकरिता आणि बांधकाम कामगारांच्या संसाराला एक छोटासा हातभार लावण्याकरिता महाराष्ट्र सरकारने Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana सुरू केली आहे आता ही योजना केवळ काही भांडी वाटप करण्यापूर्वी मर्यादित नाही तर तुमच्या श्रमांचा सन्मान देखील आहे आणि तुमच्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन थोडे अधिक चांगले व्हावे हे करण्याचा एक प्रयत्न आहे.

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जी भांडी वाटप योजना सुरू झाली आहे या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे अशा प्रकारची बरीच माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा आणि हो लेखाच्या शेवटी मी तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या लिंक देखील दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही भांडीवाटप योजनेसाठी अगदी सहज पद्धतीने अर्ज करू शकाल.

Bandhkam Kamgar Bhande Vatap Yojana Overview

मुद्दामाहिती
योजनेचे नावबांधकाम कामगार भांडे वाटप योजना
राज्यमहाराष्ट्र
संबंधित विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
लाभार्थीमंडळाकडे नोंदणीकृत असलेले सक्रिय बांधकाम कामगार
मुख्य लाभकुटुंबासाठी आवश्यक असलेल्या घरगुती भांड्यांच्या संचाचे वाटप
अर्ज पद्धतऑनलाइन (कामगार मंडळाच्या अधिकृत पोर्टलद्वारे)

बांधकाम कामगार भांडे वाटप योजना काय आहे

तर मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया की बांधकाम कामगार भांडे वाटप योजना हे काय आहे तर बघा ही एक महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे या योजनेचा मुख्य हेतू अगदी सरळ आणि सोपा आहे. दिवस-रात्र मेहनत करून महाराष्ट्र राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या संसारासाठी आवश्यक असलेली घरगुती भांड्यांचा एक संच मोफत पुरवणे कारण अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा सततच्या स्थलांतरामुळे कामगारांना स्वतःच्या कुटुंबासाठी चांगल्या प्रतीची भांडी घेणे शक्य होत नाही.

आता हीच अडचण ओळखून महाराष्ट्र शासनाने कामगारांच्या श्रमाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचे दैनंदिनी जीवन अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे तर मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना थेट वस्तू स्वरूपात लाभ दिला जातो जेणेकरून त्यांच्या मूलभूत गरजांसाठी ते पूर्तता करू शकतील.

बांधकाम कामगार भांडे वाटप योजनेची उद्दिष्ट्ये

  • महाराष्ट्रामधील कामगारांच्या कष्टाचे दखल घेऊन त्यांना शासकीय योजनेद्वारे सामाजिक आधार व सन्मान देणे.
  • कामगारांना त्यांच्या दैनंदिन संसारासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू उदाहरणार्थ घरगुती भांडी मोफत स्वरूपात पुरवणे.
  • महाराष्ट्र राज्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे व त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.
  • घरगुती वस्तू खरेदीवर होणारा कामगारांचा आर्थिक खर्चाचा फार कमी करणे जेणेकरून त्यांची आर्थिक बचत होऊ शकेल.

बांधकाम कामगार भांडे वाटप योजना पात्रता निकष

  • तुम्हाला जर बांधकाम कामगार भांडे वाटप योजना चा लाभ घ्यायचा असेल तर याची सर्वात मोठी आणि मुख्य अट म्हणजे तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृतपणे अर्जदार कामगार असते आवश्यक आहे.
  • अनेकदा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी किमान एक वर्ष जुनी असणे तसेच ती active असणे आवश्यक असते पण मित्रांनो नवीन नियमानुसार काही योजनांसाठी फक्त ती सक्रिय नोंदणी पुरेशी मानली जाते परंतु जुनी नोंदणी नेहमी फायदेशीर असते.
  • अर्ज करणाऱ्या बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे
  • अर्जदार बांधकाम कामगार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी किंवा नोंदणी सक्रिय ठेवण्यासाठी कामगाराने मागील बारा महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे आणि त्यांना याचा पुरावा देखील सादर करावा लागतो जे की 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असते हाच निकष या योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरला जात असतो.

सर्वात महत्त्वाचे: मित्रांनो जर तुमची नोंदणी झाली असेल पण तुम्ही ती वेळेवर रिन्यूअल केली नसेल तर तुमची नोंदणी inactive होते आणि तुम्हाला या योजनेचा लाभ देखील मिळत नाही त्यामुळे तुमची नोंदणी active असल्याची खात्री करणे हा या लाभाचा मुख्य निकष आहे.

बांधकाम कामगार भांडे वाटप योजनेअंतर्गतत मिळणारे लाभ

मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत थेट वस्तू स्वरूपात लाभ दिला जातो कामगारांच्या बँक खात्यामध्ये पैसे दिले जात नाही तर मुख्य लाभ म्हणजे कामगारांच्या कुटुंबाला दैनंदिन स्वयंपाक करिता आवश्यक असणारा घरगुती भांड्यांचा संपूर्ण संच मोफत दिला जातो.

आता या घरगुती भाज्यांच्या संचामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू असाव्यात हे बऱ्याचदा मंडळांनी काढलेल्या अधिकृत Tender वर अवलंबून असते त्यामुळे त्या वेळोवेळी किंवा जिल्हा न्याय किंचित बदलू शकतात मात्र साधारणपणे या संचामध्ये खालील दिलेल्या मुख्य वस्तूंचा समावेश असतो

  • प्रेशर कुकर (३ ते ५ लिटर)
  • पातेले (वेगवेगळ्या आकाराचे)
  • एक कढई (स्वयंपाकासाठी)
  • ताट / थाळ्या (जेवणासाठी)
  • वाट्या (आमटी किंवा भाजीसाठी)
  • पाण्याचे ग्लास
  • चमचे
  • काही संचांमध्ये तवा, पाण्याचा जग किंवा स्टीलचे डबे यांचाही समावेश असू शकतो.

मित्रांनो या संपूर्ण भांड्यांचा संचामध्ये अंदाजे तीन हजार ते पाच हजार रुपये पर्यंत ची भांडी असू शकतात हा संच मिळाल्यामुळे बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला नवीन भांडी विकत घेण्याची गरज पडत नाही आणि त्यांचा खर्च देखील वाचतो आणि त्यांच्या संसाराला एक मोलाचा आधार देखील मिळतो.

बांधकाम कामगार भांडे वाटप योजना आवश्यक कागदपत्रे

  • कामगार नोंदणी कार्ड 
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रहिवासी पुरावा
  • ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

बांधकाम कामगार भांडे वाटप योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईल ब्राउझर मध्ये mahabocw.in ही महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला Construction Worker: Login Here असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन आयडी वापरून तसेच पासपोर्ट टाकून लॉगिन करा.
  • नवीन केल्यानंतर लगेच तुमच्यासमोर Worker Dashboard उघडेल.
  • इथे तुम्हाला Worker Dashboard शिवा कल्याणकारी योजना नावाचे Section दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला मंडळाच्या सर्व योजनांची यादी दिसेल या योजना आर्थिक लाभ शैक्षणिक लाभ आरोग्य लाभ आणि वस्तू स्वरूपातील लाभ अशा वर्गवारीत विभागलेल्या असू शकतात.
  • भांडे वाटप योजना ही वस्तू स्वरूपातील लाभ या प्रकारात येण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे यादी मधून घरगुती भांडी संच योजना किंवा भांडे वाटप योजना हा पर्याय शोधा आणि त्या समोरील अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
  • तुमची बहुतांशी माहिती जसे की तुमचे नाव पत्ता नोंदणी हे तुमच्या प्रोफाईल मधूनच ऑटोमॅटिक भरली जात असते.
  • त्यामुळे तुम्हाला फक्त अटी व शर्ती मान्य करून अर्जस सबमिट करायचा आहे.
  • तुम्हाला यासाठी कोणत्याही नवीन कागदपत्रांची गरज भासत नाही कारण तुमची सर्व कागदपत्रे आधीच नोंदणीच्या वेळी दिलेली असतात फक्त तुम्हाला तुमची नोंदणी सक्रिय करणे महत्त्वाचे आहे.
  • आता अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही त्याच पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासू शकता.

हे नक्की वाचा: तुम्ही बांधकाम कामगार आहात का? ‘या’ एका योजनेत मिळवा 30+ फायदे: बिनव्याजी कर्ज, आरोग्य विमा आणि बरंच काही!

Contact & Helpline

Details Information
अधिकृत वेबसाइटhttps://mahabocw.in/
हेल्पलाइन नंबर१८००-८९०२-८०० (Toll-Free)
ई-मेल (Email)mahabocw@gmail.com
जिल्हा कार्यालय (उदाहरण)जिल्हा कामगार आयुक्त कार्यालय, (तुमच्या जिल्ह्याचे नाव)

या योजनेत पैसे मिळतात की वस्तू?

बांधकाम कामगार भांडी वाटप योजनेमध्ये तुम्हाला पैसे मिळत नाही पण वस्तू स्वरूपात लाभ मिळतो यामध्ये तुम्हाला थेट घरगुती भांड्यांचा संच दिला जातो.

भांडी मिळाल्यानंतर मी पुन्हा अर्ज करू शकतो का?

नाही एक साधारणपणे या योजनेचा लाभ कामगारांना त्यांच्या नोंदणीच्या कालावधीमध्ये एकदाच दिला जातो.

नवीन नोंदणी केल्यानंतर लगेच भांड्यांसाठी अर्ज करता येतो का?

नाही अनेक योजनांसाठी जसं की भांडे वाटप योजना धरून तुमची नोंदणी किमान एक वर्ष जुनी असणे आवश्यक आहे आणि ती सक्रिय असणे देखील आवश्यक आहे तर आता याची पात्रता तुम्ही लॉगिन मध्ये तपासू शकता.

Conclusion

तर मित्रांनो बांधकाम कामगार भांडे वाटप योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून ती बांधकाम कामगारांच्या कष्टांची आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजांची जाणीव ठेवून सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे ज्या कामगारांचे संपूर्ण आयुष्य इतरांची घरे बांधण्यात जाते तसेच मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करण्यात जाते अशा बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या घरातील संसाराला हातभार लावण्याचे काम या योजनेमार्फत करण्यात येते.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *