SSC HSC Board Exam Final Time Table Out: महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक गेल्या अनेक महिन्यापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा अधिकृतपणे घोषित केले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता हे वेळापत्रक म्हणजे काही तारकांची यादी नसून तुमच्या पुढील काही महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या नियोजनाचा एक भरभक्कम आधार आहे तर बघा बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या मनातील अनिश्चिततेचे ढग दूर झाले असतीलच आता तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करू शकता आणि वेळापत्रकानुसार अभ्यासक्रमाचे नियोजन करू शकता आणि पालकांसाठी देखील आपल्या मुलांचा अभ्यासक्रम वेळेवर आणि नियोजन पूर्ण कसा घ्यायचा तसेच त्यांना मानसिक आधार देण्याकरिता ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.
MSBSHSE 2026 परीक्षा वेळापत्रक (Overview)
| तपशील | माहिती |
| घोषणा | परीक्षा वेळापत्रक (फेब्रुवारी-मार्च २०२६) |
| संबंधित बोर्ड | महाराष्ट्र राज्य मंडळ (MSBSHSE) |
| कोणत्या इयत्तांसाठी | इयत्ता 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | सप्टेंबर/ऑक्टोबर 2025 पासून (पूर्ण) |
| अंतिम मुदत (विलंब शुल्कासह) | 10 वी: 17 नोव्हेंबर 2025 12 वी: 03 नोव्हेंबर 2025 |
| अधिकृत वेबसाइट | mahahsscboard.in |
घोषणा काय आहे?
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावी बारावी मध्ये शिकत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आता महाराष्ट्र राज्य मंडळाचे होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरलेले नाहीत त्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची शेवटची संधी आहे.
तर महाराष्ट्र राज्य मंडळांनी इयत्ता बारावी साठी कोणती घोषणा केली आहे आणि इयत्ता दहावी साठी कोणती घोषणा केली आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला खाली व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितली आहे
इयत्ता 12 वी (HSC) साठी घोषणा
तर बघा विद्यार्थी मित्रांनो बारावीचे अर्ज भरण्याची नियमित मुदत 20 ऑक्टोबर 2025 होती पण ती आता संपली आहे आताच्या विद्यार्थ्यांनी नियमित मुदतीत अर्ज भरला नाही किंवा त्यांना भरता आला नाही त्यांना विलंब शुल्कासह 03 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज भरायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे अर्ज नियमितपणे विद्यार्थ्यांच्या ज्युनिअर कॉलेज मार्फत कॉलेज लॉगिन च्या माध्यमातून भरले जातात. आणि आणि जे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ठेवण्यात आली आहे.
इयत्ता 10 वी (SSC) साठी घोषणा
जे विद्यार्थी सध्या इयत्ता दहावी मध्ये आहे आणि त्यांना दहावीची परीक्षा द्यायची आहे अशा दहावीच्या विद्यार्थ्यांची नियमित मुदत 27 ऑक्टोबर 2025 होती जी की आता संपली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना नियमित मुदतीमध्ये अर्ज भरता आला नाही त्यांना विलंब शुल्कासह दहा नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज भरावा लागेल यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.
पर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नियमित शाळेचे विद्यार्थी असाल नियमित शाळेमध्ये जात असाल तर तुमचे अर्ज शाळेमार्फत ऑनलाइन पद्धतीने भरले जातात पण जर तुम्ही पुनर्परीक्षा देत आहात म्हणजेच तुम्ही ग्रेट इम्प्रोवमेंट करू इच्छिता किंवा खाजगीरीत्या अर्ज करत आहात तर तुम्हाला 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही अडचणी येत असतील किंवा समजत नसेल तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर येथे भेट देऊन तेथील ऑपरेटर कडून अर्ज भरून घेऊ शकता फक्त तुम्हाला यासाठी काही नाम मात्र शुल्क त्या ऑपरेटरला द्यावे लागेल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट
विद्यार्थी मित्रांनो मंडळाने असे स्पष्ट केले आहे की या वाढवलेल्या मुदतीनंतर अर्ज भरण्यासाठी कोणतेही मुदत वाढ विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप देखील अर्ज भरला नसेल त्यांनी त्यांच्या शाळा किंवा कॉलेजची संपर्क साधून विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे
2026 च्या परीक्षेच्या तारखा (वेळापत्रक)
- बारावी (HSC): १० फेब्रुवारी २०२६ ते ११ मार्च २०२६
- दहावी (SSC): २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६
महाराष्ट्र बोर्ड SSC (इयत्ता १० वी) परीक्षा २०२६ अर्ज वेळापत्रक
| अर्ज प्रकार | विद्यार्थ्यांचा प्रकार | मुदत (अंतिम तारीख) | शुल्क स्थिती |
| नियमित शुल्कासह | सर्व (शाळेमार्फत) | समाप्त (ऑक्टोबर २०२५ मध्ये समाप्त झाली) | नियमित शुल्क |
| विलंब शुल्कासह | नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधारक | १७ नोव्हेंबर २०२५ | विलंब शुल्कासह |
| अतिविलंब शुल्कासह | नियमित अर्ज | मंडळाकडून कोणतीही घोषणा नाही (नोव्हेंबर १७ ही अंतिम मुदत मानली जाईल) | – |
| खाजगी विद्यार्थी | फॉर्म क्र. १७ (SSC) | ३१ डिसेंबर २०२५ | प्रतिदिन ₹२० विलंब शुल्कासह |
हे नक्की वाचा: ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणार महाराष्ट्र सरकारमार्फत स्कॉलरशिप
महाराष्ट्र बोर्ड HSC (इयत्ता 12 वी) परीक्षा 2026 अर्ज वेळापत्रक
| अर्ज प्रकार | विद्यार्थ्यांचा प्रकार | मुदत (अंतिम तारीख) | शुल्क स्थिती |
| नियमित शुल्कासह | सर्व (कॉलेजमार्फत) | समाप्त (ऑक्टोबर २०२५ मध्ये समाप्त झाली) | नियमित शुल्क |
| विलंब शुल्कासह | नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधारक | ०३ नोव्हेंबर २०२५ | विलंब शुल्कासह |
| अतिविलंब शुल्कासह | नियमित अर्ज | मंडळाकडून कोणतीही घोषणा नाही (नोव्हेंबर ०३ ही अंतिम मुदत मानली जाईल) | – |
| खाजगी विद्यार्थी | फॉर्म क्र. १७ (HSC) | ३१ डिसेंबर २०२५ | प्रतिदिन ₹२० विलंब शुल्कासह |
MSBSHSE बोर्ड परीक्षा अर्ज भरण्याची सविस्तर प्रक्रिया (शाळेमार्फत)
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असते आणि ती तुमच्या शाळा किंवा कॉलेजच्या लॉगिन मधूनच केली जाते.
अर्ज भरण्यापूर्वी शाळा/कॉलेज खालील कामे करतात:
- बोर्डाच्या वेबसाइटवर (mahahsscboard.in) त्यांच्या ‘स्कूल/कॉलेज प्रोफाइल’मध्ये विषय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती तपासून ती Update) करतात.
- विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, आईचे नाव इत्यादी माहिती शाळेच्या General Register नुसार योग्य आहे की नाही, हे तपासतात.
विद्यार्थ्यांची माहिती भरणे
- शाळेचे मुख्याध्यापक किंवा कॉलेजचे प्राचार्य त्यांच्या अधिकृत लॉगिन आयडी आणि पासवर्डने बोर्डाच्या वेबसाइटवर लॉगिन करतात.
- दहावीच्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी UIDISE+ प्रणालीतील PEN-ID वापरला जातो.
- विद्यार्थ्याचे सर्व आवश्यक तपशील (जसे की नाव, आधार क्रमांक, पत्ता, विषय गट, माध्यम) काळजीपूर्वक ऑनलाइन फॉर्ममध्ये भरले जातात.
- खासकरून विषयांची निवड (उदा. द्वितीय/तृतीय भाषा, पर्यायी विषय) विद्यार्थ्यांकडून अंतिम करून घेतली जाते.
- विद्यार्थ्यांचा नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाइन अपलोड केली जाते.
प्री-लिस्ट तयार करणे
- भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जांची एक Pre-List तयार केली जाते.
- ही प्री-लिस्ट शाळेकडून विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना तपासण्यासाठी दिली जाते. यामध्ये विद्यार्थ्याने आपले नाव, जन्मदिनांक, विषय आणि इतर सर्व माहिती अचूक भरली आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे.
- या यादीत काही चूक असल्यास, ती तातडीने ऑनलाइन प्रणालीमध्ये दुरुस्त केली जाते.
- सर्व माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यावर, शाळा/कॉलेज हे अर्ज बोर्डाकडे ऑनलाइन Submit करतात.
अर्ज सबमिट झाल्यानंतर शुल्क भरले जाते
- बोर्डाने निर्धारित केलेले परीक्षा शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू होते.
- शुल्क भरण्यासाठी शाळा/कॉलेज RTGS (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) किंवा NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) या पद्धतीचा वापर करतात. रोख रक्कम (Cash) स्वीकारली जात नाही.
- फी भरल्याची पावती (RTGS/NEFT Receipt) आणि अर्जांची अंतिम यादी (Pre-List) घेऊन शाळा/कॉलेज हे सर्व कागदपत्रे त्यांच्या संबंधित विभागीय मंडळाकडे (Divisional Board) जमा करतात.
इतर विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया (Repeaters / Private Candidates)
हे विद्यार्थी शाळेमार्फत अर्ज न भरता, बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (mahahsscboard.in) थेट स्वतःच्या लॉगिन मधून ऑनलाइन अर्ज भरतात. त्यांना आवश्यक कागदपत्रे (उदा. शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, फोटो) ऑनलाइन अपलोड करावी लागतात आणि शुल्कही ऑनलाइन भरावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याला परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते आणि परीक्षेपूर्वी ‘हॉल तिकीट’ (Hall Ticket) दिले जाते
MSBSHSE बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आईचे पूर्ण नाव
- जन्मदिनांक आणि जन्म ठिकाण
- सध्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक
खाजगी विद्यार्थ्यांसाठी (Form No. 17)
जे विद्यार्थी थेट शाळा/कॉलेजमध्ये नसतात आणि ‘फॉर्म नंबर १७’ भरून अर्ज करतात, त्यांना खालील कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात:
- मूळ शाळा सोडल्याचा दाखला (L.C.) किंवा त्याची सत्यप्रत.
- आधार कार्ड
- हमीपत्र (Affidavit), जर लागू असेल तर.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी.
MSBSHSE (महाराष्ट्र राज्य मंडळ) महत्त्वाचे संपर्क आणि Links
- परीक्षा अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींसाठी शाळा/कॉलेजने त्यांच्या विभागीय मंडळाशी त्वरित संपर्क साधावा.
- सर्व नवीन घोषणा आणि सूचना सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर (mahahsscboard.in) ‘Latest Notifications’ विभागात प्रकाशित होतात.
दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्याची प्रक्रिया काय आहे?
दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळेमार्फतच ऑनलाइन भरले जातात. शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या लॉगिन आयडीचा वापर करून UDISE+ आणि PEN-ID द्वारे विद्यार्थ्यांची माहिती भरतात आणि फी भरण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपले नाव वेळेत नोंदवले आहे, याची खात्री करावी.
अर्ज भरताना परीक्षा शुल्क रोख (Cash) स्वरूपात भरता येईल का?
नाही. महाराष्ट्र बोर्डाने स्पष्ट केले आहे की, परीक्षा शुल्क फक्त RTGS (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट) किंवा NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) या ऑनलाइन पद्धतींद्वारेच ICICI बँकेच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये भरावे लागते. रोख रक्कम (Cash) स्वीकारली जात नाही.