मित्रांनो तुमच्या हातात देखील वडिलोपार्जित कला असेल आणि तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले कौशल्य असेल तर तुम्ही फक्त वस्तू घडवत नाही तर भारताची समृद्धी परंपरा तसेच संस्कृती देखील जपता पण अनेकदा या कलेला योग्य मान मिळत नाही आर्थिक पाठबळ तसेच आधुनिक बाजारपेठ देखील मिळत नाही आणि या कलेची ही सर्वात मोठी अडचण आहे आता तुमची अडचण ओळखून आणि तुमच्या कौशल्याला योग्य सन्मान देण्यासाठी केंद्र सरकारने PM Vishwakarma Yojana सुरू केली आहे.
ही योजना म्हणजे तुमच्यासारख्या पारंपारिक कारागीर तसेच हस्त कलाकारांसाठी एक नवा आशेचा किरण घेऊन आली आहे जो तुमच्या व्यवसायाला एक नवी ओळख देऊ शकतो आणि तुमच्या जीवनातील आर्थिक स्थैर्य देण्याचे वचन देखील देतो तर चला या लेखाच्या माध्यमातून अगदी सोपी भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो की हे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नक्की काय आहे आणि या योजनेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा आयुष्य कसं बदलू शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (Overview)
| घटक | माहिती |
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना |
| उद्देश | पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांना आर्थिक मदत, कौशल्य विकास आणि आधुनिक बाजारपेठेशी जोडणे. |
| लाभार्थी | १८ पारंपारिक व्यवसायांमधील कारागीर आणि हस्तकलाकार (उदा. सुतार, लोहार, कुंभार, सोनार, इत्यादी). |
| मुख्य लाभ | मोफत कौशल्य प्रशिक्षण , 15,000 रुपयांचे टूलकिट अनुदान, 3 लाख रुपयांपर्यंतचे कमी व्याजदराचे कर्ज, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन |
| अधिकृत वेबसाईट | pmvishwakarma.gov.in |
| विश्वकर्मा योजना FREE EBOOK | https://pmvishwakarma.gov.in/Home/EbookPdf |
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे?
तर मित्रांनो सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही आपल्या देशातील पारंपारिक कलाकारांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि जे कलाकार हाताने काम करतात अशा कारागिरांसाठी सरकारने ही योजना एक खास मदत म्हणून सुरू केली आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की ही योजना नेमकी कोणासाठी सुरू करण्यात आली आहे तर बघा ही योजना ही योजना सुतार, लोहार, कुंभार, सोनार, गवंडी, शिंपी, मोची, नाभिक (न्हावी) अशा एकूण १८ प्रकारची पारंपरिक कामं करणाऱ्या लोकांसाठी आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांच्या हातामध्ये वडिलोपार्जची कला आहे आणि जे लोक स्वतःच्या कौशल्याने नवनवीन वस्तू बनवतात किंवा इतरांना सेवा देतात त्या सर्वांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की ही योजना का सुरू करण्यात आली तर बघा अनेक पारंपारिक कारागीरांकडे उत्तम कौशल्य आहे पण त्यांना वस्तू नसल्यामुळे तसेच पैशांची अडचण असल्यामुळे अनेक अडचणी येतात जसे की काम करण्यासाठी नवीन आणि चांगली अवजारे घेण्यासाठी पैसे नसतात.
या सोबतच आपलं काम वाढवण्यासाठी किंवा नवीन दुकान टाकण्यासाठी कमी व्याजात कर्ज मिळत नाही आणि यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी मोठी बाजारपेठ मिळत नाही आता या सर्व अडचणी दूर करून आपल्या या विश्वकर्मा बांधवांच्या कलेला सन्मान मिळावा आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करता यावं तसेच त्यांचं कौशल्य आजच्या आधुनिक जगाशी जोडला जावं हा या योजनेमागचा प्रमुख तसेच मुख्य उद्देश आहे.
आणि म्हणूनच सरकारने ही योजना सुरू केली आहे आता या योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांना प्रशिक्षण देऊ इच्छिते तसेच नवीन अवजारांसाठी आर्थिक मदत देखील करते आणि ज्या बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशांसाठी कमी व्याजामध्ये कर्ज देखील उपलब्ध करून देते.
तुम्ही हे सुद्धा वाचू शकता: सुकन्या समृद्धी योजना तुमच्या लाडक्या लेकींच्या भविष्याची तयारी करा -सविस्तर माहिती
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची उद्दिष्ट्ये
- आपल्या देशांमधील पारंपारिक कारागीर आणि हस्त कलाकारांना विश्वकर्मा म्हणून एक अधिकृत ओळखपत्र तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कलेचा सन्मान करणे आणि कारागिरांना एक नवीन ओळख देणे.
- भारतातील कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञानाचे तसेच नवीन डिझाईनचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वाढवले जाते आणि यामध्ये पाच ते सात दिवसाचे मूलभूत आणि पंधरा दिवसाचे प्रगत प्रशिक्षण देखील समाविष्ट आहेत.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कारागिरांना आधुनिक टुलकीट खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये पर्यंतचे अनुदान मिळते जेणेकरून त्यांच्या कामाचा दर्जा सुधारित आणि त्यांची उत्पन्न देखील वाढेल.
- आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही हमीशिवाय कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख कर्ज आणि ते यशस्वीरित्या परत केल्यानंतर परत दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाखापर्यंतचे कर्ज आणि असे एकूण तीन लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.
- कारागिरांना डिजिटल व्यवहार करण्याकरिता प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी त्यांना आर्थिक लाभ देणे जेणेकरून ते आधुनिक अर्थव्यवस्थेशी जोडले जातील.
- कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आणि सेवांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा मदत मिळवून देण्याचे काम या योजनेअंतर्गत करण्यात येते यासाठी यांना मार्केटिंग तसेच ब्रँडिंग मध्ये सहकार्य केले जाते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे पात्रता निकष
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदार सरकारने ठरवून दिलेल्या या 18 पारंपरिक व्यवसायांपैकी किमान एक व्यवसाय करणारा कारागीर किंवा हस्तकलाकार असावा आता हे 18 व्यवसाय खालील प्रमाणे दिले आहेत: सुतार, लोहार, सोनार, कुंभार, शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम करणारे), चांभार (मोची) / पादत्राणे बनवणारे कारागीर, गवंडी, नाव बनवणारे, अस्त्रकार (शस्त्रे बनवणारे), कुलूप बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनवणारे, टोपली / चटई / झाडू बनवणारे, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, न्हावी (केशकर्तनकार), फुलांचे हार बनवणारे (माळी), धोबी (परीट), शिंपी, मासेमारीचे जाळे बनवणारे.
- या योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला दिला जातो आता कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले.
या योजनेत अपात्र कोण आहे
- जर अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही नोकरीवर असेल तर ते या योजनेसाठी अपात्र असतील.
- ज्या व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या समान क्रेडिट आधारित योजनेचा लाभ घेतला आहे जसे की PMEGP, पंतप्रधान स्वनिधी, मुद्रा योजना आणि या योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज त्यांनी अजूनही बँकेला परत केले नाही म्हणजेच अद्यापही त्यांनी फेडलेले नाही तर असे नागरिक या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येतील.
PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे सर्व आर्थिक आणि इतर लाभ
- या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यावर प्रत्येक नागरिकाला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र मिळते आणि या सोबतच एक नवीन ओळखपत्र देखील दिले जाते यामुळे त्यांना एक अधिकृत ओळख मिळते जी सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तसेच बँके मधून कर्ज मिळवण्यासाठी देखील उपयोगी ठरते.
- कारागिरांचे कौशल्य वाढवण्यासाठी या योजनेमार्फत दोन प्रशिक्षण देण्यात येतात पहिले म्हणजे मूलभूत प्रशिक्षण हे प्रशिक्षण 5 ते 7 दिवस सुमारे 40 तास असते आणि दुसरे प्रशिक्षण म्हणजे प्रगत प्रशिक्षण जे कारागीर इच्छुक आहेत त्यांना पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीचे प्रगत प्रशिक्षण दिले जाते.
- जर तुम्ही कौशल्य प्रशिक्षणामध्ये भाग घेतला तर तुम्हाला जर 500 रुपये प्रमाणे स्टायपेंड दिला जातो यामुळे प्रशिक्षणाच्या काळात तुमच्या दररोजच्या गरजा पूर्ण होऊ शकतात आणि आर्थिक मदत मिळाल्यामुळे तुमचे नुकसान देखील होणार नाही.
- मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती अर्जदार लाभार्थ्याला त्यांच्या कामाची अवजारे खरेदी करण्यासाठी पूर्ण 15000 रुपयांचे अनुदान दिले जाते ही रक्कम थेट वाउचर च्या स्वरूपात मिळत असते ज्याचा वापर करून तुम्ही प्रमाणित दुकानदारांकडून तुम्हाला लागणारे आवश्यक ती अवजारे खरेदी करू शकता.
- पहिल्या टप्प्यात अर्जदारने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी त्याला एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज फक्त पाच टक्के व्याजदरावर दिले जाते आणि हे कर्ज त्याला 18 महिन्यात परत करायची असते.
- आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये ज्यांनी पहिल्या टप्प्याचे कर्ज यशस्वीरित्या परत केले म्हणजे त्या कर्जाची परतफेड केली तर अशा लाभार्थ्यांना आपला व्यवसाय व्यवस्थित चालवण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी परत दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते आणि महत्त्वाचं म्हणजे यावरती 5% टक्के एवढेच व्याजदर असते आणि ही परतफेड मुदत 30 महिने असते
- अर्जदार लाभार्थ्याला डिजिटल पेमेंट करण्यासाठी उदाहरणार्थ यूपीआय इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाते प्रत्येक डिजिटल व्यवहारावर त्याला एक रुपयाचे इन्सेंटिव्ह दिले जाते.
- कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना भारतीय बाजारपेठांमध्ये चांगली मागणी मिळावी यासाठी सरकार मदत करत असते यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील मिळते यासोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांच्या वस्तू विक्री करण्यासाठी सरकारकडून मदत दिली जाते तसेच त्यांच्या उत्पादनाचे ब्रँडिंग आणि प्रमोशन करणे तसेच इत्यादींचा समावेश असतो.
तुम्ही हे सुद्धा वाचू शकता: बांधकाम कामगार योजना एका योजनेमध्ये तब्बल 30 फायदे
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (Aadhaar Card): हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे आधार कार्ड हे अर्जदाराचे ओळख पटवण्यासाठी तसेच e-KYC प्रक्रियेसाठी अनिवार्य आहे
- मोबाईल नंबर (Mobile Number) : महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराचा मोबाईल नंबर त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे कारण अर्जाच्या प्रक्रियेत येणारे वन टाइम पासवर्ड आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती येतात
- बँक खात्याचा तपशील: तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स असणे आवश्यक आहे यावरती अर्जदाराचे नाव खाते क्रमांक तसेच बँकेचा आयएफसी कोड हा स्पष्ट दिलेला असावा कारण तुमच्या खात्यामध्ये योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान तसेच कर्जाची रक्कम देखील जमा केली जाते.
- रेशन कार्ड (शिधापत्रिका) : रेशन कार्ड हे कुटुंबाची ओळख आणि योजनेच्या कौटुंबिक निकषांची म्हणजेच एका कुटुंबातून एकच लाभार्थी लाभ घेत आहे याची पडताळणी करण्यासाठी आवश्यक आहे जर रेशन कार्ड उपलब्ध नसेल तर अर्जदाराला त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड सादर करावे लागतील.
- जात प्रमाणपत्र: अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्गात असेल तर त्याला जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- पत्त्याचा पुरावा: तुमचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते जर आधार कार्ड वरील पत्ता सध्याच्या पत्यापेक्षा वेगळा असेल तर तुम्ही पाणीपट्टी पावती किंवा रहिवासी प्रमाणपत्र यांसारखे इतर पुरावे देखील देऊ शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया
मित्रांनो जरी पीएम विश्वकर्मा योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन असली तरी तुम्हाला तुमच्या जवळील CSC म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र यावरती जाऊनच या योजनेचा अर्ज करायचा आहे यामुळे तुम्हाला अर्ज भरण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण होईल
आपले सरकार आपले केंद्र यावरती जाण्यापूर्वी काय करावे
- तर वरच्या यादीमधील मी सांगितलेली सर्व कागदपत्रे तुमच्या जवळ असू द्या जसे की आधार कार्ड आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल नंबर बँक पासबुक आणि राशन कार्ड.
- त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्ड लिंक आहे का हे एकदा नक्की तपासा आणि तो मोबाईल नंबर म्हणजेच मोबाईल सोबत घेऊन जा कारण त्यावरती (OTP) वन टाइम पासवर्ड येतो.
- आता तुमच्या गावातील CSC केंद्र कुठे आहे ते शोधा आणि ही सर्व कागदपत्रे घेऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देते भेट द्या.
CSC केंद्रातील अर्ज प्रक्रिया
- तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या CSC सीएससी केंद्राला भेट द्या आणि हो तुमच्याकडे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असावी.
- तेथील ऑपरेटरला सांगा की मला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज भरायचा आहे.
- ऑपरेटर तुमच्याकडून आधार कार्ड क्रमांक आणि आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल नंबर मागेल.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वरती (OTP) वन टाइम पासवर्ड येईल तो तुम्हाला ऑपरेटरला सांगायचं आहे.
- त्यानंतर तुमची ओळख पटवण्यासाठी ऑपरेटर तुम्हाला एका मशीन वरती बोट ठेवायला सांगितले म्हणजेच त्या मशीन मध्ये तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन होतील.
- याला e-KYC असे म्हणतात या प्रक्रियेमुळे तुमच्या आधार कार्ड वरील सर्व माहिती जसे की तुमचे नाव पत्ता फोटो आपोआप अर्जामध्ये भरली जाते.
- तर बघा तुमची प्राथमिक माहिती तर आधार कार्ड वरूनच घेतली जाईल.
- यानंतर ऑपरेटर तुम्हाला काही अतिरिक्त माहिती विचारेल जसे की तुमचा पारंपारिक व्यवसाय कोणता आहे यासोबतच तुमच्या बँक खात्याच्या डिटेल आणि तुमच्या कुटुंबातील स्थितीबद्दल माहिती आता ही माहिती तुम्हाला ऑपरेटरला अगदी स्पष्ट आणि अचूकपणे सांगायची आहे.
नोंदणी पूर्ण करणे आणि प्रमाणपत्र मिळवणे
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आणि कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन केल्यानंतर ऑपरेटर तुमचा अर्ज या योजनेसाठी सबमिट करेल.
- आणि हा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होतात तुमचे प्रधानमंत्री विश्वकर्मा डिजिटल ओळखपत्र ज्याला आपण आयडी कार्ड असे म्हणतो ते तयार होईल आणि या सोबतच एक प्रमाणपत्र त्याच वेळी तयार होईल आता तुम्हाला ऑपरेटर कडून या दोन्ही कागदपत्रांची प्रिंट काढून घ्यायची आहे.
अर्ज क्रमांक (Application Number) मिळवणे
- संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक अर्ज संदर्भ क्रमांक (Application Reference Number) मिळेल.
- मित्रांनो हा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा असतो जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल तर हा क्रमांक खूप उपयोगी पडतो आणि हा क्रमांक आटोमॅटिक अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये एसएमएस द्वारे येत असतो.
तुम्ही हे सुद्धा वाचू शकता: तुमचं वीज बिल 90% कमी करा! स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेची संपूर्ण माहिती
अर्ज केल्यानंतर नक्की काय होतं?
- तर बघा मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज हा तीन स्तरावर तपासला जात असतो पहिलं म्हणजे ग्रामपंचायत किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था दुसरं म्हणजे जिल्हा आणि तिसरं म्हणजे राज्य पातळीवर.
- आता एकदा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला कौशल्य प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला टूलकिटसाठी आणि कर्जासाठी अर्ज करता येईल.
प्रशिक्षणाला जावे लागेल का? त्या दिवसांत माझ्या रोजच्या कामाचे आणि कमाईचे काय होईल?
हो मित्रांनो तुम्हाला पाच ते पंधरा दिवसाचे प्रशिक्षण द्यावे लागेल सरकार तुमची अडचण समजते म्हणूनच या प्रशिक्षणाच्या काळामध्ये तुमचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारतर्फे तुम्हाला दररोज पाचशे रुपयांचा स्टायपेंड देखील देण्यात येतो म्हणून तुम्ही काळजी न करता नवीन नवीन गोष्टी शिकू शकता.
टूलकिटचे 15,000 रुपये थेट माझ्या बँक खात्यात येतील का?
नाही हे पंधरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारतर्फे थेट जमा केले जात नाही तुम्हाला एक ई वाउचर मिळतो या व्यवसायाचा वापर करून तुम्ही सरकारमान्य दुकानांमधून तुमच्या कामासाठी लागणारी आधुनिक अवजारे किंवा मशीन खरेदी करू शकता याचा उद्देश असा आहे की तो पैसा फक्त अवजारे खरेदी करण्यासाठीच वापरला जावा.
माझ्या कुटुंबात दोन व्यक्ती कारागीर आहेत, तर आम्हा दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येईल का?
नाही सरकारी नियमानुसार कुटुंबातील पती-पत्नी आणि अविवाहित मुले म्हणजे फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो जर एका कुटुंबातील सदस्याने पहिले या योजनेचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
ड्रिल मशीन
योजनेचे लाभार्थी वर्ष आहे