Ahilyadevi Holkar Shetkari Karj Mafi Yojana 2026: ऑनलाईन अर्ज कसा करायचा? पहा स्टेप-बाय-स्टेप

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2016 हे अत्यंत महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही योजना जुन्या कर्जमाफी योजनेपेक्षा फार वेगळी आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना असे सांगितले की या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकलेले आहे त्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे आणि आनंदाची बाब म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन पर रक्कम देखील मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ही योजना 2026-27 या वर्षात सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय आहे?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना हे महाराष्ट्र राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांशी योजना आहे ज्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँका किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेतले होते परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणामुळे ते कर्ज घडू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज महाराष्ट्र सरकार स्वतः भरणार आहे म्हणजेच हे केवळ कर्जमाफी नसून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरवण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 (Overview Table)

मुख्य मुद्देतपशील
योजनेचे नावपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
लाभार्थीराज्यातील थकीत आणि नियमित कर्जदार शेतकरी
मुख्य लाभ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी / ₹50,000 प्रोत्साहन अनुदान
कर्ज मर्यादा30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज
अर्ज पद्धतऑनलाइन (CSC / Aaple Sarkar) / आधार प्रमाणीकरण
अधिकृत वेबसाईटmjpsky.maharashtra.gov.in (अपेक्षित)

योजनेचे मुख्य उद्देश

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करणे.
  • ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज फेडले होते अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत ची प्रोत्साहन रक्कम देणे.
  • थकीत कर्जामुळे नवीन कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना पुन्हा बँकिंग प्रवाहामध्ये आणणे.
  • आणि महत्वाचे म्हणजे 2026 च्या उद्दिष्टांनुसार महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स नेण्यासाठी कृषी क्षेत्राला आणखी बळकट करणे.

पात्रता निकष

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • केवळ पीक कर्ज आणि पुनर्गठीत कर्ज या योजनेसाठी पात्र असेल.
  • तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे तेच या योजनेसाठी पात्र आहेत.
  • सरकारी नोकरीत असणारे (वर्ग-४ वगळून), ५० हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारे आणि माजी मंत्री/आमदार/खासदार या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे तरच कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा होईल.

आर्थिक फायदे

  • ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाख रुपये पर्यंतचे थकीत पीक कर्ज आहे त्यांचे संपूर्ण कर्ज महाराष्ट्र सरकार माफ करेल.
  • हे शेतकरी कर्जाचे हप्ते वेळेवर भरतात अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत 50000 पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही मध्यस्थी शिवाय हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण यादी

  • आधार कार्ड (Aadhar Card) – सर्वात महत्त्वाचे.
  • बँक पासबुक (Bank Passbook) – ज्या खात्यावर कर्ज आहे.
  • ७/१२ आणि ८-अ उतारा (7/12 & 8A Extract).
  • विशिष्ट ओळख क्रमांक (Unique ID) – जो बँक किंवा सीएससी केंद्राकडून मिळेल.
  • पॅन कार्ड (असल्यास).
  • मोबाईल नंबर – जो आधारशी लिंक आहे.

अर्ज कसा करावा? स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

शेतकरी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Aadhar Authentication ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे आता ही प्रक्रिया कशी पूर्ण करावी याची सविस्तर माहिती मी तुम्हाला खाली दिली आहे.

  • सर्वात आधी आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्या किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जा.
  • त्यानंतर तेथे तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि कर्ज खाते क्रमांक ऑपरेटरला द्या.
  • आता सरकारी पोर्टल वर तुमची माहिती दिसल्यावर बँक खात्यातील कर्जाची रक्कम अगदी व्यवस्थित पद्धतीने तपासून घ्या.
  • सर्व माहिती बरोबर असल्यास तेथे असलेल्या बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून आधार प्रमाणीकरण पूर्ण करा.
  • प्रमाणिकरण यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक पोच पावती मिळेल ती अगदी जपून ठेवा.
  • पडताळणी नंतर तुमची कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

Common Mistakes to Avoid

  • जर शेतकऱ्याचा आधार नंबर बँक खात्याशी जोडलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर चालू ठेवा कारण त्या मोबाईल नंबर वरती ओटीपी आणि मेसेज येतील.
  • प्रमाणिकरण करण्यापूर्वी पोर्टलवर दिसणारी कर्जाची रक्कम तुमच्या बँक पासबुकशी जुळते आहे का हे नक्की तपासा आणि काही चुका किंवा तफावत असल्यास लगेच तक्रार नोंदवा.
  • बँकेत जाऊन तुमची KYC पूर्ण आहे की नाही हे नक्की तपासा कारण केवायसी पूर्ण नसल्यास मिळणारी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही.

स्टेटस कसे तपासावे?

  • सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • पोर्टल वरती दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर किंवा एप्लीकेशन आयडी टाका.
  • आता स्टेटस चेक करण्यासाठी Check Status या बटणावर क्लिक करा.
  • तेथे तुम्हाला तुमची कर्जमाफी झाली आहे की नाही तसेच ती कोणत्या टप्प्यावर आहे हे समजेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर काय होईल?

सध्याच्या नियमानुसार, २ लाखांपर्यंतचीच रक्कम माफ होईल. त्यावरील रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागू शकते (यावर अधिकृत शासन निर्णय लवकरच येईल).

३० सप्टेंबर २०२५ नंतर कर्ज घेतले असल्यास लाभ मिळेल का?

नाही, ही योजना फक्त ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकीत कर्जासाठी आहे.

प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळेल?

ज्यांनी २०१७ ते २०२५ या काळात आपले कर्ज वेळेवर फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना ₹५०,००० मिळतील.

Conclusion

शेतकरी मित्रांनो अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 ही महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी अगदी खरी संजीवनीच ठरली आहे विशेष म्हणजे 2024 च्या अर्थसंकल्पातील या घोषणेमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा देखील मिळाला आहे जर तुम्ही पात्र असाल तर जराही वेळ न वाया घालवता आदर प्रमाणे करण पूर्ण करून या सुवर्ण संधीचा लाभ नक्की घ्या.

अधिकृत वेबसाईट आणि लिंक

अधिकृत पोर्टलmjpsky.maharashtra.gov.in
पर्यायी शेतकरी पोर्टल (MahaDBT)mahadbt.maharashtra.gov.in

ही पोस्ट नक्की वाचा: राज्यातील कामगारांसाठी मोठी बातमी! Essential Kit Appointment Kamgar Yojana 2026 सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *