सावित्रीबाई फुले आधार योजना 2026 ही महाराष्ट्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे तसेच ही योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवली जाते आणि या योजनेअंतर्गत, OBC, VJNT, SBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना Government Hostels प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याच्या आणि जेवणाच्या खर्चासाठी थेट रोख रक्कम दिली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे वर्ष 2016 च्या नवीन अपडेट नुसार महाराष्ट्र सरकारने महागाई लक्षात घेता या योजनेच्या निधी वाटपामध्ये आणि अर्ज प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना वेळेवरती या योजनेचा लाभ मिळेल.
What is Savitribai Phule Adhar Yojana In Marathi
विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही एक Financial Assistance Scheme for Students आहे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय व्हावी हाच या योजनेमागे मुख्य उद्देश आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात जातात पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना जेवण्याचा आणि राहण्याचा खर्च झेपत नाही अशा विद्यार्थ्यांचा खर्च महाराष्ट्र सरकारमार्फत उचलण्यात येतो आणि महत्त्वाचे म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना ही प्रामुख्याने ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी आले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना सरकारी हॉस्टेलमध्ये जागा मिळालेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
Savitribai Phule Adhar Yojana Overview Table
| Features | Details |
|---|---|
| Scheme Name | Dnyanjyoti Savitribai Phule Adhar Yojana |
| Department | Other Backward Bahujan Welfare Department, Maharashtra |
| Beneficiaries | OBC, VJNT, SBC Students |
| Benefit Amount | ₹38,000 to ₹60,000 (Based on City) |
| Academic Year | 2025–2026 |
| Application Mode | Online / Offline (Depends on District) |
| Official Website | mahadbt.maharashtra.gov.in |
Savitribai Phule Adhar Yojana Main Objectives
- कोणत्याही ओबीसी विद्यार्थ्यांचे शिक्षण त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे थांबू नये.
- शहरांमधील महागड्या PG किंवा प्रायव्हेट हॉस्टेलचा खर्च पेलण्यासाठी मदत करणे.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी करून त्याला आर्थिक आधार देणे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
Savitribai Phule Adhar Yojana Eligibility Criteria
- विद्यार्थी OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थ्याने सरकारी वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा, पण तिथे प्रवेश मिळालेला नसावा (Hostel Rejection Certificate आवश्यक).
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी शहरात उच्च शिक्षण (Professional/Non-Professional Courses) घेत असावा.
Savitribai Phule Adhar Yojana Financial Benefits
विद्यार्थी मित्रांनो 2026 च्या नवीन नियमानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाते.
| Features | Details |
|---|---|
| Tier-1 Cities (उदा. मुंबई, पुणे) | वार्षिक साधारण ₹60,000 पर्यंत मदत |
| Tier-2 Cities (उदा. नागपूर, औरंगाबाद) | वार्षिक साधारण ₹51,000 पर्यंत मदत |
| Other Districts | वार्षिक साधारण ₹38,000 पर्यंत मदत |
| खर्चाचा उद्देश | निवास (Room Rent), भोजन (Mess/Canteen) व इतर शैक्षणिक खर्चासाठी |
Savitribai Phule Adhar Yojana Required Documents
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे सर्वात आधी तुम्हाला स्कॅन करून ठेवावे लागतील जे की आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे दिली आहेत.
- Aadhar Card
- Caste Certificate
- Income Certificate
- Hostel Non-Admission Certificate
- College Admission Receipt
- Domicile Certificate
- Bank Passbook
Savitribai Phule Adhar Yojana How to Apply Online?
- सर्वात आधी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत MahaDBT Portal वर जा किंवा जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.
- जर तुम्ही नवीन असाल तर ‘New Registration’ वर क्लिक करून प्रोफाइल तयार करा.
- लॉग इन केल्यानंतर ‘Apply for Schemes’ मध्ये ‘Other Backward Bahujan Welfare Department’ निवडा.
- तिथे Dnyanjyoti Savitribai Phule Adhar Yojana निवडा.
- तुमची शैक्षणिक माहिती, होस्टेल रिजेक्शन डिटेल्स आणि बँक डिटेल्स भरा.
- विचारलेली सर्व कागदपत्रे (Documents) स्पष्ट स्वरूपात अपलोड करा.
- फॉर्म एकदा तपासा आणि ‘Submit’ बटण दाबा. अर्जाची प्रिंट काढून कॉलेजमध्ये जमा करा.
Caution! Common Mistakes to Avoid
- विद्यार्थी मित्रांनो अर्ज केल्यानंतर बँकेचे खाते आधार कार्ड सोबत लिंक नसल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
- जर उत्पन्नाचा दाखला जुना असेल तर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
- जर तुम्ही महाज्योती किंवा इतर कोणत्याही वस्तीगृह भत्त्याचा लाभ घेत असाल तर या योजनेसाठी अर्ज करू नका.
- विद्यार्थी मित्रांनो तुमच्या नावामध्ये किंवा जातीच्या माहितीमध्ये अर्ज भरताना चूक झाली तर तुमचा अर्ज थेट रिजेक्ट केला जाऊ शकतो.
हे नक्की वाचा: लेकीला मिळणार ₹18 लाख! केंद्र सरकारची ही योजना देतीय बँक FD पेक्षा जास्त व्याज (Sukanya Samriddhi Yojana)
How to Check Application Status?
- महाडीबीटी पोर्टलवर ‘My Applied Schemes’ टॅबवर जा.
- तिथे तुम्हाला ‘Check Status’ चा पर्याय मिळेल.
- जर तुमचा अर्ज ‘Under Scrutiny’ असेल तर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे असे समजावे.
- जर काही त्रुटी (Redeploy) आली असेल तर ती त्वरित दुरुस्त करा.
contacts and important link
| संपर्काचा प्रकार | माहिती |
| अधिकृत वेबसाइट | महाडीबीटी पोर्टल |
| Scholarship FORM PDF & GR | PDF DOWNLOAD LINK |
| Savitribai Phule Scholarship | Apply link |
| हेल्पलाइन नंबर | 022-49150800 |
| ईमेल आयडी | info.mahait@mahait.org |
| मुख्यमंत्री हेल्पलाइन | 1800 120 8040 (टोल फ्री) |
Frequently Asked Questions (FAQ)
ही योजना फक्त मुलींसाठी आहे का?
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ ओबीसी प्रवर्गातील मुला मुलींना म्हणजेच दोघांनाही घेता येतो
पैसे हप्त्याने मिळतात की एकदाच?
सामान्यतः ही रक्कम दोन ते तीन हप्त्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
2026 साठी अर्ज कधी सुरू होतील?
विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर साधारण ते ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान या योजनेच्या अर्ज प्रक्रिया सुरू होतात.
Conclusion
Dnyanjyoti Savitribai Phule Adhar Yojana 2026 ही त्या विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे ज्यांना शहरात राहणे परवडत नाही. जर तुम्ही पात्र असाल तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच कागदपत्रांची जुळवाजुळव करा आणि अर्ज भरा. योग्य वेळेत अर्ज केल्यास तुमची उच्च शिक्षणाची वाट सोपी होईल.