PNB Bank Apprentice Recruitment 2026: Apply Online for 5,138 Vacancies | पंजाब नॅशनल बँक भरती

PNB Bank Apprentice Recruitment : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील कोणत्याही शाखेमध्ये पदवी घेतली असेलआणि तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करायचं असेल तर आता तुमच्यासाठी पंजाब नॅशनल बँक ने एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे म्हणजेच पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2026 च्या आर्थिक वर्षासाठी देशभरामध्ये 5138 शिकाऊ उमेदवारांच्या जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे यासाठी पात्र उमेदवार 08 फेब्रुवारी 2026 पासून ते 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर पंजाब नॅशनल बँक ने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 232 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.

PNB Bank Apprentice Recruitment 2026 Highlights

तपशीलमाहिती
बँकेचे नावपंजाब नॅशनल बँक (PNB)
पदाचे नावअप्रेंटिस (Apprentice)
एकूण जागा5138 (महाराष्ट्रात 232)
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी (Graduate)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
अर्जाची शेवटची तारीख२४ फेब्रुवारी २०२६
अधिकृत वेबसाईटpnbindia.in
PNB Bank Apprentice Recruitment 2026 Overview Table in Marathi

PNB Bank Apprentice Recruitment 2026 Eligibility Criteria

विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही विषयांमध्ये Graduation पूर्ण केलं असेल आणि त्यांच्या पदवीचा रिझल्ट 31 डिसेंबर 2025 पूर्वी लागला असेल असे सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

PNB Bank Apprentice Recruitment 2026 Age Limit

भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय एक जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षाच्या दरम्यान असावे.

तपशीलमाहिती
SC / ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट
PwBD10 वर्षे सूट

NOTE: विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही राज्यांमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला त्या राज्याची स्थानिक भाषा येणे अनिवार्य आहे जसे की तुम्ही जर महाराष्ट्र मध्ये राहून महाराष्ट्रातील बँकेमध्ये अर्ज करत असाल तेथे तुम्हाला नोकरीमध्ये स्थायिक व्हायचं असेल तर तुम्हाला मराठी लिहिता वाचता येणे आणि बोलता येणे अनिवार्य आहे.

PNB Bank Apprentice Recruitment 2026 Stipend Details

विद्यार्थी मित्रांनो तुमचे तर भारती मध्ये सिलेक्शन झाले तर नियुक्तीच्या ठिकाणानुसार दर महिन्याला तुम्हाला ₹12,300 ते ₹15,000 प्रति महिना टायपिंग दिला जातो.

तपशीलमाहिती
ग्रामीण / शहरी शाखा₹12,300 प्रति महिना
मेट्रो शहरे₹15,000 प्रति महिना

PNB Bank Apprentice Recruitment 2026 Application Fees

वर्गअर्ज शुल्क
General / OBC / EWS (पुरुष)₹944
General / OBC / EWS (महिला)₹708
SC / ST / PwBD / Transgender₹236

PNB Apprentice Recruitment 2026: ऑनलाईन अर्ज कसा करावा?

विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून तुम्ही या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. पण अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा तसेच स्वाक्षरी आणि कागदपत्रे क्लियर आणि व्यवस्थितरित्या अपलोड करा जेणेकरून तुमचा अर्ज लवकर Approve होईल. आणि तुमचे भरतीमध्ये सिलेक्शन होण्याची चान्सेस देखील वाढतील

  • सर्वप्रथम तुम्हाला पंजाब नॅशनल बँक च्या https://pnb.bank.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे किंवा BFSI SSC पोर्टलवर जा.
  • त्यानंतर Careers बघा मध्ये जाऊन Engagement of Apprentices 2026 या लिंक वर टच करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन अर्ज उघडेल तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • विश्लेषण केल्यावर तुम्हाला ईमेल द्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  • त्यानंतर लॉगिन आयडी पासवर्ड वापरून व्यवस्थित रित्या लॉगिन करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन अर्ज ओपन होईल तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती अचूक रित्या भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो, स्वाक्षरी, आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • आता तुमच्या प्रवर्गानुसार तुम्हाला अर्ज शुल्क भरायचे आहे.
  • आता सबमिट अर्ज यावरती क्लिक करा. आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची एक प्रिंट काढून ठेवा.

PNB Bank Apprentice Recruitment 2026 (IMPORTANT LINKS)

Link NameDirect Link
अधिकृत अधिसूचना (English PDF)येथे क्लिक करा (Download)
अधिकृत अधिसूचना (Hindi PDF)येथे क्लिक करा (Download)
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा (Registration)
अधिकृत वेबसाईट (Official Site)pnbindia.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

PNB अप्रेंटिस भरती २०२६ साठी शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२६ आहे.

या भरतीसाठी परीक्षा कधी होणार आहे?

तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, लेखी परीक्षा मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात किती जागा आहेत?

महाराष्ट्रातील विविध शाखांसाठी एकूण २३२ जागा राखीव आहेत.

प्रशिक्षणाचा कालावधी किती असेल?

ही शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) १ वर्षासाठी (१२ महिने) असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *