नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी E-KYC बाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने आता पुन्हा एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे म्हणजेच ज्या महिलांकडून E-KYC प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक कारणामुळे माहिती भरण्यास चुका झाल्या होत्या अशा महिलांना आपल्या अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी पुन्हा राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली आहे.
आता तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नेमकी चूक काय होती तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेची EKYC प्रक्रिया पूर्ण केली होती मात्र कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतनाबाबतचा पर्याय अनेक महिलांनी चुकीचा निवडला होता आणि अशा महिला पात्र असून सुद्धा त्यांचे अपात्र यादीमध्ये नाव आले होते.
तसेच जिल्हा अधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू असली तरी ही प्रक्रिया अगदी वेगाने पूर्ण व्हावी यासाठी ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींसाठी पहिली आणि शेवटची संधी
लाडक्या बहिणींना आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या महिलांच्या अर्जामध्ये कुटुंबातील सदस्य “सरकारी कर्मचारी असणे किंवा निवृत्ती वेतन घेणे” या पर्यायांमध्ये चूक झाली होती अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती जाऊन अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने असे स्पष्ट निर्देश दिले आहे की हे सुधारणा करण्याचे अंतिम संधी आता महिलांना देण्यात आली आहे यानंतर कोणतेही मुदतवाढ दिली जाणार नाही पोर्टलवर यासाठी आवश्यक तांत्रिक बदल देखील करण्यात आले आहे त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी करण्यामध्ये चुका केल्या होत्या त्यांना ही पहिली आणि शेवटची संधी देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडून देखील केवायसी करण्यामध्ये चूक झाली असेल तुमचे हप्ते बंद झाले असतील तर लवकरात लवकर राज्य सरकारच्या या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज दुरुस्त करून घ्या.
| लाडकी बहिण योजना अधिकृत जीआर | येथे क्लिक करा |
| लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट | EKYC पूर्ण करा |
हे नक्की वाचा: Maharashtra Gharkul Yojana List 2026: जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर, तुमचे नाव ऑनलाइन पाहा