Dr. Babasaheb Ambedkar Foreign Scholarship Maharashtra 2025 | पात्रता, लाभ आणि अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र सरकार मार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात जेणेकरून अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि विमुक्त जाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थी त्यांचे शिक्षण कोणत्याही आर्थिक अडथळ्याशिवाय घेऊ शकतील तर नुकतीच महाराष्ट्र सरकारने या विद्यार्थ्यांसाठी Dr. Babasaheb Ambedkar Foreign Scholarship योजना सुरू केली आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर ती दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे असा आहे तसेच परदेशांमधील जे नामांकित विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांमध्ये Post Graduation,Ph.D सारखे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारमार्फत या योजनेमधून शिक्षण शुल्क तसेच राहणीमानाचा खर्च आणि प्रवास खर्च दिला जातो.

जेणेकरून या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे करिअर घडवण्याची संधी देखील मिळेल.

Dr. Babasaheb Ambedkar Foreign Scholarship Scheme In Marathi

योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती
उद्देशSC, नवबौद्ध व VJNT विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत
सुरुवातमहाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय विभाग
लाभशिक्षण शुल्क, राहणीमान खर्च, प्रवास खर्च, शैक्षणिक साहित्य
अर्ज प्रक्रियालेखामध्ये सविस्तर माहिती आहे
हेल्पलाइन+91-8421331181 / 022-68597419 / 022-68597493

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना काय आहे

अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि विमुक्त जाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याकरिता आर्थिक सहाय्य देणे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे विशेष म्हणजे ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

तसेच या योजनेमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क राहण्याचा यासोबतच प्रवास खर्च आणि इतर शैक्षणिक कर्ज भागवण्याकरिता मदत मिळते आणि यामुळे समाजामधील वंचित घटकातील पात्र विद्यार्थ्यांना Post Graduation, Ph.D. सारखे उच्च शिक्षण घेण्याची संधी परदेशामध्ये मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजनेची उद्दिष्ट्ये

  • या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि व्यावसायिक दर्जा उंचावणे हा आहे.
  • विद्यार्थी परदेशात मिळवलेल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग करून समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देऊ शकतील.
  • जे विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे परदेशी शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करणे.
  • गुणवंत विद्यार्थ्यांना जगातील दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याकरिता सक्षम बनवणे.
  • अनुसूचित जाती, नवबौद्ध व विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध करून देणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना पात्रता निकष

  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • SC,Neo-Buddhist,VJNT प्रवर्गातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतो.
  • विद्यार्थ्याला परदेशातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेला असावा.
  • Post Graduation किंवा Ph.D. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.
  • Post Graduation किंवा Ph.D. शिक्षणामध्ये 60% किंवा शासनाने दिलेल्या निकषानुसार गुण मिळालेले असावेत.
  • अर्जदाराचे वय हे शासनाने दिलेल्या निश्चित निकष व अटीमध्ये बसणे आवश्यक आहे.
  • आणि महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना मिळणारे आर्थिक लाभ

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अनेक लाभ दिले जातात. जसे की परदेशामध्ये जाण्यासाठी विमानाचा प्रवास खर्च तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी पूर्ण किंवा अत्यांश फी भरपाई आणि महत्त्वाचे म्हणजे परदेशातील राहणीमान तसेच दैनंदिनी खर्च भागवण्याकरिता मासिक भत्ता व शैक्षणिक खर्चासाठी लागणारी पुस्तके अभ्यास साहित्य प्रयोगशाळा शुल्क लायब्ररी फी हे पण सरकारमार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्फत निर्णय देते आणि जर विद्यापीठाने अपेक्षित केल्यास आरोग्य विमा तसेच इतर शुल्क देखील विद्यार्थ्यांना मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती चा अर्ज करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे (Maharashtra Government Foreign Scholarship Portal) fs.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट गुगल वर सर्च करा
  • त्यानंतर Foreign-Scholarship विभागामध्ये जाऊन SC कॅटेगिरी ची संबंधित श्रेणी निवडा म्हणजेच SC/Neo-Buddhist/VJNT प्रवर्गासाठी असलेली योजनेची लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा
  • आता तुम्ही जर नवीन अर्जदार असाल तर पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करून यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा
  • नोंदणी केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा
  • लॉगिन केल्यानंतर Apply for Scholarship या पर्यायावर क्लिक करा
  • आणि फॉर्ममध्ये विचारली जाणारी वैयक्तिक माहिती तसेच शैक्षणिक माहिती व्यवस्थितरित्या आणि अगदी नीट भरा
  • आणि महत्त्वाचे म्हणजे अर्जासाठी लागणारी कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करा जसे की जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, प्रवेशपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र वगैरे अपलोड करा
  • सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा तपासून सबमिट पर्यायावर क्लिक करा
  • फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा
  • एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर पोर्टलवर लॉगिन अर्जाचे एप्लीकेशन स्टेटस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता – जसे कीजसे “Processing”, “Shortlisted”, “Approved” इत्यादी.

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

अधिकृत पोर्टलhttps://fs.maharashtra.gov.in/
फोन हेल्पलाइन+91-8421331181, 022-68597419, 022-68597493
ईमेल संपर्कforeignscholarship.helpdesk@gmail.com
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

या शिष्यवृत्ती अंतर्गत कोणत्या कोर्ससाठी अर्ज करता येतो?

जे विद्यार्थी परदेशातील मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये Post Graduation (Master’s), Ph.D. किंवा उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येतो

ही शिष्यवृत्ती कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे?

ही योजना फक्त SC, Neo-Buddhis, VJNT प्रवर्गामधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि याच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो

शिष्यवृत्ती अंतर्गत कोणते आर्थिक सहाय्य मिळते?

या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक शुल्क राहणीमानाचा खर्च प्रवास खर्च आणि शिक्षणासाठी लागणारे इत्यादी साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत केली जाते

निष्कर्ष

विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेश शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि विमुक्त जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याची एक सुवर्णसंधी मिळते तसेच त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च यासोबतच प्रवास खर्च आणि राहणीमानाचा खर्च महाराष्ट्र सरकारमार्फत उचलण्यात येतो यामुळे गुणवंत विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

आता महत्त्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी योग्य कागदपत्रांसह वेळेत अर्ज केला तर त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेता येईल म्हणूनच हा महत्त्वाचा लेख हा अशा गुणवंत विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *