बांधकाम कामगारांना सरकारकडून ‘फ्री’ भांडी! तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का? लगेच चेक करा! Bandhkam Kamgar Yojana

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार आपल्या श्रमामधून मोठ्या-मोठ्या इमारती,पूल,घरे उभारतात अशा बांधकाम कामगार बंधू भगिनींच्या कष्टाला महाराष्ट्र सलाम करतो आणि नुकतीच अशा गरजू गरीब बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा तर्फे एक खास आणि बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे ही योजना म्हणजे बांधकाम कामगारांच्या कष्टांची पोचपावतीच म्हटले जाईल कारण तुमच्या भविष्यासाठी Maharashtra Bandhkam Kamgar Yojana एक महत्त्वाचा आधार बनणार आहे.

कामगारांनो सर्वप्रथम समजून घ्या की Bandhkam Kamgar Yojana कोणासाठी आहे तर बघा जी व्यक्ती बांधकाम साइटवर कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करते असा प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे यामध्ये खालील कामगारांचा समावेश होतो जसे की गवंडी काम करणारे आणि मजूर सेंट्रींग आणि फिटिंग कामगार तसेच इलेक्ट्रिशियन कामगार आणि प्लंबर व पेंटर यासोबतच सुतार काम करणारे फरशी टाइल्स बसवणारे आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ते आणि पूल बांधकामावर काम करणारे थोडक्यात सांगायचं झालं तर बांधकामाच्या ठिकाणी घाम गाळणारा प्रत्येक मजूर या योजनेसाठी पात्र आहे.

तर आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागणार आहेत या योजनेची उद्दिष्टे काय आहेत अशा सर्व प्रक्रियेची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana (Overview)

योजनेचे नावमहाराष्ट्र बांधकाम कामगार योजना
कोणामार्फत राबवली जातेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (BOCW)
लाभार्थी18 ते 60 वयोगटातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार
अधिकृत वेबसाइटmahabocw.in
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना (Overview)

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana काय आहे?

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून ते बांधकाम क्षेत्रात दिवस रात्र घाम गाळणाऱ्या मेहनत करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाते या योजनेचा मूळ उद्देश बांधकाम कामगारांना जे अनेकदा निश्चित उत्पन्न नोकरीची हमी तसेच इतर लाभापासून वंचित राहतात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या मदतीने एक सन्मान जनक आणि सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क देणे हा आहे.

महाराष्ट्र बांधकाम कामगार ही योजना कामगारांच्या जीवनात अमुलाग्रह बदल घडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेमार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण यासाठी आर्थिक मदत मिळते ज्यामुळे कामगारांची पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात अगदी सहजपणे टिकून राहते ज्यामुळे गरजू गरीब लोकांना आर्थिक आधार मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यासाठी मिळणाऱ्या लाभांमुळे कामगारांच्या आजारपणात उपचाराचा खर्च अगदी सहज शक्य होतो आणि उपचार घेण्यासाठी कुटुंबाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यावे लागत नाही किंवा ते कर्जबाजारी होत नाहीत तसेच घर बांधणी, मुला मुलींचे लग्न यांसारख्या मोठ्या खर्चाच्या प्रसंगी मिळणारी आर्थिक मदत ही बांधकाम कामगारांना एक मोठा आधार देऊन जाते.

म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना कामगारांना केवळ आर्थिक मदत देत नाही तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याला एक नवी दिशा देते.

Maharashtra Bandhkam Kamgar योजनेची उद्दिष्ट्ये

  • या योजनेचे प्राथमिक आणि महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बांधकाम कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे असे आहे या नोंदणीमुळे बांधकाम कामगारांना त्यांची एक अधिकृत ओळख मिळते ज्यामुळे ते कोणत्याही सरकारी लाभासाठी पात्र ठरू शकतात.
  • अनेक बांधकाम कामगार असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात जिथे त्यांना नोकरीची तसेच पगाराची शाश्वती नसते पण बांधकाम कामगाराने या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आरोग्य विमा अपघाती विमा तसेच सेवानिवृत्तीनंतर आर्थिक मदत देऊन एक प्रकारचे सामाजिक सुरक्षा कवच पुरवले जाते हे या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
  • बांधकाम कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे त्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करणे हे या योजनेचे एक प्रमुख ध्येय आहे याकरिता मुलांना शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसायिक शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते जेणेकरून कामगारांची पुढची पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकेल आणि ते गरिबीच्या चक्रातून बाहेर पडू शकतील.
  • बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजारपणामध्ये आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून पैशांच्या अभावी त्यांचा कोणताही उपचार थांबणार नाही आणि कामगारांचे आरोग्य अगदी चांगले राहील आणि ते त्यांचे काम व्यवस्थित करू शकतील.
  • बांधकाम कामगारांच्या कौशल्यामध्ये वाढ व्हावी म्हणून त्यांना आधुनिक बांधकाम यंत्रे दिली जातात हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे आणि यासाठी कामगारांना विविध कार्यक्रमातून कुशल बनवले जाते ज्यामुळे ते त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवू शकतात.
  • बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी सरकारमार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते तसेच त्यांच्या मुलांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत दिली जाते तसेच इतर आवश्यक सुविधा देखील पुरवल्या जातात जेणेकरून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधरेल आणि ते एक सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतील.

Maharashtra Bandhkam Kamgar योजनेसाठी पात्रता निकष

वयोमर्यादा

  • अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे तरच तो या योजनेसाठी पात्र ठरू शकतो.
  • जर अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि साठ वर्षापेक्षा जास्त असेल तर असे कामगार या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत म्हणजेच ते अर्ज करू शकणार नाहीत.

कामाचा अनुभव

  • या योजनेमधील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कामगार अर्जदाराने मागील बारा महिन्यात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • आणि बांधकाम कामगाराने 90 दिवस काम केलेले आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी मालक ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घ्यावे.

कामाचा प्रकार

  • बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या क्षेत्रातील कामगार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत जसे की इमारत, रस्ते, पूल, बोगदे आणि धरणे यांचे बांधकाम. गवंडी, सेंट्रिंग, फिटिंग, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल काम. सुतारकाम, पेंटिंग, आणि फरशी किंवा टाईल्स बसवणे. उत्खनन, दगडकाम आणि मातीकाम. नाले, पाइपलाइन आणि टेलिफोन टॉवर्स उभारणीशी संबंधित कामे.

जर तुम्ही यापैकी कोणतेही कामगार म्हणून करत असाल तसेच तुमच्याकडे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र असेल तर सहज पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

नोंदणीची अट

  • अर्जदार कामगाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • आणि एकदा नोंदणी केल्यावर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरण्याकरिता नोंदणीचे वेळोवेळी Renewal करणे अत्यंत गरजेचे आहे.

Maharashtra Bandhkam Kamgar योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

वयाचा पुरावा (कोणताही एक)

  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्म दाखला
  • मतदान ओळखपत्र

रहिवासी पुरावा (कोणताही एक)

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मागील ३ महिन्यांचे लाईट बिल किंवा टेलिफोन बिल
  • ग्रामपंचायत किंवा नगरपालिका दिलेला रहिवासी दाखला

इतर आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदारांनी मागील बारा महिन्यांमध्ये किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा दाखला.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे हा दाखला ग्रामसेवक महानगरपालिका किंवा नगरपालिका अधिकारी किंवा नोंदणीकृत ठेकेदार मालक यांच्याकडून सही शिक्का घेतलेला असावा म्हणजेच प्रमाणित केलेला असावा.
  • अर्जदाराचे 3 पासपोर्ट साईज फोटो.
  • अर्जदाराच्या स्वतःच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत.
  • बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Linked) असणे आवश्यक आहे.
  • नोंदणी अर्जासोबत भरलेले स्वयंघोषणापत्र ज्यामध्ये अर्जदाराने भरलेली सर्व माहिती सत्य असल्याचे प्रमाणित करणे.

एकदा नक्की वाचा: तुमचं वीज बिल 90% कमी करा! स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेची संपूर्ण माहिती

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Application Process)

तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि जलद गतीने बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकता

  • तुम्हाला देखील बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर https://mahabocw.in/ ओपन करा आणि महत्त्वाचं म्हणजे ही वेबसाईट बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाईट आहे.
  • आता वेबसाईटच्या होमपेज वरती तुम्हाला कामगार (Worker) नावाचा विभाग दिसेल तेथे क्लिक करा.
  • त्याच्याखाली कामगार नोंदणी (Worker Registration) किंवा नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तेथे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही याच्यासाठी काही प्रश्न विचारले जातील जसे की तुमचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान आहे? का तुम्ही 90 दिवसापेक्षा जास्त काम केलेले आहे का? ? तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हो किंवा नाही असे द्यायची आहेत.
  • जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी पुढे पाठवला जाईल.
  • आता नवीन पेजवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल आता या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत पण लक्षात असू द्या हे कागदपत्रे अगदी स्पष्ट दिसायला हवी यामध्ये आधार कार्ड रहिवासी पुरावा 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तसेच बँक पासबुक आणि तुमच्या पासपोर्ट साईज फोटोचा समावेश देखील असतो.
  • आता ही सर्व कागदपत्रे एकामागून एक अपलोड करा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमचा फॉर्म तपासा आणि माहिती बरोबर असल्यास सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक आणि पोचपावती मिळेल ही पोस्ट पावती तुम्हाला डाऊनलोड करायची आहे किंवा तिचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे कारण या पोस्ट पावतीच्या आधारे एप्लीकेशन नंबर वरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजरीत्या तपासू शकता.

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana: ऑफलाइन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process)

मित्रांनो तुम्हाला जर ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अवघड वाटत असेल तर तुम्ही जवळच्या जिल्हा कामगार कार्यालयात किंवा महा-ई-सेवा केंद्र येथे भेट देऊन हा अर्ज भरू शकता:

  • बांधकाम कामगार योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा कामगार कार्यालयात किंवा तुमच्या परिसरातील जवळच्या सेतूमध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये भेट द्या.
  • तेथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करिता आवश्यक असलेला (Form-V) मागावा लागेल
  • हा अर्ज मिळाल्यानंतर अर्ज व्यवस्थित रित्या वाचून घ्या त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा जसे की तुमचे नाव पत्ता वय कामाचा तपशील बँक खात्याची माहिती तसेच इतर माहिती अचूक रित्या भरा.
  • अर्जामध्ये दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकवा.
  • आता अर्ज भरून झाल्यानंतर अर्जामध्ये विचारलेले आवश्यक कागदपत्रे झेरॉक्स प्रत म्हणून जोडा यामध्ये वयाचा पुरावा रहिवासी पुरावा ओळखपत्र पासबुक तसेच सर्वात महत्त्वाचा म्हणजे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पण जोडा.
  • सर्व झेरॉक्स वर तुमची सही करा.
  • अर्ज सविस्तर रित्या भरून झाल्यानंतर आणि कागदपत्रे जोडल्यानंतर त्या अर्जाला जिल्हा कामगार कार्यालयात किंवा सेतू मधील तिथल्या अधिकाऱ्याकडे जमा करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर, अधिकाऱ्याकडून अर्जावर शिक्का मारून पोचपावती (Acknowledgement Slip) घ्या.
  • या पोचपावतीवर तुमचा अर्ज क्रमांक असतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती भविष्यात तपासू शकता.

Maharashtra Bandhkam Kamgar योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्व फॉर्म (PDF)

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भा साठी)PDF FORM
बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म (संदर्भा साठी)PDF FORM
ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी)

नोंदणी व नुतणीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नविन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.
PDF FORM
बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी)PDF FORM
ऑनलाइन नोंदणीसाठी: आधार संमती फॉर्म (संदर्भा साठी)PDF FORM
ऑनलाइन नोंदणीसाठी: स्वयंघोषणापत्र (संदर्भा साठी)PDF FORM
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आणखी इतर अर्ज PDFअधिकृत वेबसाईट

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

संपर्क माध्यमतपशील
हेल्पलाइन क्रमांक022-26572665
अधिकृत वेबसाइटhttps://mahabocw.in/
ईमेल आयडीinfo@mahabocw.in
मुख्य कार्यालयाचा पत्तामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, 4था मजला, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400051
महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नोंदणी केल्यानंतर लगेच लाभ मिळतो का?

मित्रांनो नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लगेच लाभ मिळत नाही कारण मंडळाकडे तुमची नोंदणी झाल्यानंतर ती सक्रिय असणे आवश्यक आहे नोंदणी सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी रिन्यूअल करावे लागेल म्हणूनच जर नोंदणी सक्रिय असेल तरच तुम्ही विविध योजनांच्या लाभांसाठी अर्ज करू शकता

मी घरमालक आहे आणि माझ्या घरी काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी करू शकतो का?

होय नक्कीच तुम्ही घरमालक म्हणून तुमच्याकडे नव्वद दिवसापेक्षा जास्त काळ काम केलेल्या कामगाराला काम केल्याचे प्रमाणपत्र देऊ शकता आणि या प्रमाणपत्राच्या आधारे तो कामगार स्वतःची नोंदणी देखील करू शकतो

नोंदणीसाठी काही शुल्क (फी) आहे का?

होय नोंदणी करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते नोंदणी करताना शुल्कपोटी 25 रुपये आणि पाच वर्षांसाठी वर्गणी म्हणून 60 रुपये असे एकूण 85 रुपये शुल्क तुमच्याकडून आकारले जाते त्यानंतर दरवर्षी केवळ तुम्हाला 12 रुपये भरून नोंदणीचे रिन्यूअल करता येते

मुलांच्या शिक्षणासाठी नेमकी कोणती मदत मिळते?

या योजनेअंतर्गत तुमच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाते. इयत्ता पहिलीपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्य सरकार मार्फत देण्यात येते तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य देखील दिले जाते त्यामुळे तुमच्या मुलांचे शिक्षण पैशांच्या अभावी थांबत नाही

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *