Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, हा राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. २०२४-२५ मध्ये सुरू झालेली ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरली आहे.
मात्र, ही योजना राबवताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने महिलांसाठी एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर आणली आहे. ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहेत किंवा ज्यांचे हप्ते येणे बंद झाले आहे, अशा महिलांसाठी ही माहिती अत्यंत मोलाची ठरणार आहे.
अशा महिलांसाठी राज्य सरकारने आता e-KYC करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे, महिलांना ही e-KYC प्रक्रिया 30 एप्रिल 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या मुदतीपर्यंत जर तुम्ही e-KYC पूर्ण केले नाही किंवा तुमची माहिती अपडेट केली नाही, तर तुम्हाला योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत.
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेबद्दलची सविस्तर माहिती, नवीन नियम आणि e-KYC करण्याची अगदी सोपी पद्धत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
माझी लाडकी बहीण योजना 2026 काय आहे?
लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करणे हा आहे.
विशेष म्हणजे, राज्य सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ सुमारे 2.47 कोटी महिला घेत होत्या. परंतु, अनेक महिलांनी e-KYC न केल्यामुळे किंवा काही महिला अपात्र ठरल्यामुळे, सध्या हा लाभ 1.7 कोटी महिलांनाच मिळत आहे. म्हणूनच, राज्य सरकारने आता केवळ पात्र आणि सक्रिय लाभार्थ्यांनाच निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या तारखा 2026
| तपशील | महत्त्वाची तारीख |
| eKYC दुरुस्तीची शेवटची मुदत | 30 एप्रिल 2026 |
| नवीन नोंदणी | सुरू आहे |
| पुढील हप्ता वितरण | मे 2026 च्या पहिल्या आठवड्यात |
NOTE: लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी असे स्पष्ट केले आहे की 30 एप्रिल 2026 नंतर EKYC दुरुस्तीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
माझी लाडकी बहीण योजना पात्रता
- अर्जदार महिला आहे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी नोकरी भरती असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेत मिळणारे फायदे
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारमार्फत दिले जातात.
- पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एका वर्षात एकूण 18 हजार रुपये जमा केले जातात.
- महिलेचे बँक खाते आधार लिंक असल्यास हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात ज्यामुळे भ्रष्टाचार होत नाही आणि थेट महिलांना लाभ मिळतो.
लाडकी बहीण योजना eKYC कसे करावे
बऱ्याच महिलांनी ekyc पूर्ण न केल्यामुळे राज्य सरकारने त्यांचे हप्ते थांबवले म्हणूनच जर तुम्ही ekyc पूर्ण केली नसेल तर 30 एप्रिल 2026 पूर्वी खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
- सर्वात आधी अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in वर जा.
- तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून Login करा.
- ‘Application Status’ वर क्लिक करा. जर तिथे eKYC अपूर्ण दिसत असेल, तर ‘Update eKYC’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
- तुमची बँक माहिती (IFSC Code, Account Number) पुन्हा तपासा आणि आधार सीडिंग (Aadhaar Seeding) सक्रिय असल्याची खात्री करा.
- माहिती सबमिट करा.
लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा
- Nari Shakti Doot App डाऊनलोड करा किंवा अधिकृत पोर्टलवर जा.
- नवीन रजिस्ट्रेशनसाठी ‘Sign Up’ करा.
- सर्व वैयक्तिक माहिती भरा (नाव, पत्ता, जन्मतारीख).
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक (Application ID) मिळेल, तो जतन करून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे
- Aadhar Card
- Domicile Certificate
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- लाभार्थी महिलेचा फोटो
- हमीपत्र
लाडकी बहीण योजना FAQ
मला अद्याप एकही हप्ता मिळाला नाही, मी काय करू?
लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अद्याप एकही हप्ता मिळाला नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या अर्जाची स्थिती (Status) तपासा. जर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर 30 एप्रिल 2026 पूर्वी ती पूर्ण करून घ्या. तसेच, तुमचे बँक खाते आधार कार्डासोबत लिंक आहे की नाही, याची खात्री नक्की करा
अविवाहित मुली या योजनेसाठी पात्र आहेत का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमच्या कुटुंबातील केवळ एकच अविवाहित महिला घेऊ शकते.
बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे कसे ओळखावे?
तुमच्या बँकेत जाऊन ‘NPCI Mapping’ किंवा ‘Aadhaar Seeding’ तपासण्यास सांगा. बँक खाते सक्रिय असणे अनिवार्य आहे.
अधिकृत लिंक आणि हेल्पलाइन
| घटक | तपशील |
|---|---|
| अधिकृत वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 181 (महिला हेल्पलाइन) |
| जिल्हा कार्यालय | महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद |
निष्कर्ष
लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. जर तुम्ही अद्याप देखील EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर उशीर करू नका 30 एप्रिल 2026 पूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि महत्त्वाचे म्हणजे ही माहिती तुमच्या घरातील आणि परिसरातील इतर महिलांना देखील शेअर करा जेणेकरून त्याचे पंधराशे रुपये बंद होणार नाहीत.