Amrut Typing Scheme Maharashtra 2026: टायपिंग परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ₹6,500 मिळवण्याची मोठी संधी!

Amrut Typing Scheme Maharashtra: नमस्कार मित्रांनो दहावी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र सरकारने अमृत टायपिंग प्रोत्साहन योजना सुरू केली आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील तरुणांना स्वावलंबी बनवण्याकरिता आणि त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची आणि सध्या चर्चेमध्ये असलेली योजना म्हणजे अमृत टायपिंग प्रोत्साहन योजना.

मित्रांनो जर तुम्ही नुकतीच टायपिंग परीक्षा (GCC-TBC) उत्तीर्ण केली असेल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला दर महिन्याला 6500 रुपये मिळू शकतात आणि हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात तर आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय असणार आहे तसेच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Quick Information Table

माहितीचे वर्णनतपशील
योजनेचे नावअमृत टायपिंग प्रोत्साहन योजना २०२६ (Amrut Typing Scheme)
राज्य / सरकारमहाराष्ट्र सरकार (महा अमृत संस्था)
संबंधित विभागइतर बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीखुल्या प्रवर्गातील (EWS) टायपिंग/लघुलेखन उत्तीर्ण विद्यार्थी
प्रमुख फायदेटायपिंगसाठी ₹६,५०० आणि लघुलेखनासाठी ₹५,३०० रोख लाभ
अर्ज प्रक्रिया१००% ऑनलाईन (नो पोस्टल डॉक्युमेंट्स)
अधिकृत वेबसाइटmahaamrut.org.in
नवीन अपडेट २०२६आता कागदपत्रे पोस्टाने पाठवण्याची गरज नाही; थेट DBT लाभ

अमृत टायपिंग प्रोत्साहन योजना काय आहे

मग मित्रांनो सर्वप्रथम समजून घ्या की अमृत योजना म्हणजे नेमकी काय आहे तर बघा cademy of Maharashtra Research, Upliftment and Training मुख्य संस्था प्रामुख्याने महाराष्ट्रातील ओपन कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना मदत करत असते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही इतर आरक्षणाचा किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही.

या योजनेचा मुख्य उद्देश टायपिंग आणि लघुलेख शिकणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा परीक्षेचा खर्च भरून काढणे आणि त्यांना पुढील नोकरीसाठी प्रोत्साहित करणे असा आहे.

अमृत टायपिंग प्रोत्साहन योजनेचे उद्दिष्ट

  • या योजनेअंतर्गत राज्यातील तरुणांचे संगणकीय ज्ञान तसेच टायपिंग कौशल्य वाढवणे.
  • ग्रामीण भागातील तसेच गरीब विद्यार्थ्यांना टायपिंग कोर्सची फी परवडत नाही अशांना आर्थिक आधार देणे.
  • सरकारी आणि खाजगी नोकरीसाठी टायपिंग प्रमाणपत्र अनिवार्य असते त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे.

अमृत टायपिंग प्रोत्साहन योजनेची पात्रता निकष

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि खुल्या प्रवर्गातील असावा.
  • उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा.
  • अर्जदार उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे.
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) पुणे यांची GCC-TBC टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (३०/४०/५०/६० wpm)
  • अर्जदार उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी संस्थेकडून (उदा. सारथी, बार्टी, महाज्योती) टायपिंगसाठी लाभ घेतलेला नसावा.

अमृत टायपिंग प्रोत्साहन योजनेचे फायदे

  • जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला आणि हिंदी मराठी किंवा इंग्रजी भाषेतील कोणत्याही टायपिंग मध्ये 30 किंवा 40 wpm उत्तीर्ण झाले तर तुम्हाला दरमहा 6500 रुपये मिळतात.
  • तसेच शॉर्ट अँड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 5300 प्रोत्साहनात्मक भत्ता देखील दिला जातो.
  • हे रक्कम कोणत्याही मध्यस्तीशिवाय थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे).
  • १० वी चे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट.
  • टायपिंग/लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा निकालाची ऑनलाईन प्रत.
  • डोमिसाईल सर्टिफिकेट (महाराष्ट्राचा रहिवासी दाखला).
  • उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा, तहसीलदारांचा).
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा कॅन्सल चेक.
  • स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही.
  • स्वयंघोषणापत्र (Self Declaration Form): जे पोर्टलवर डाऊनलोड करायला मिळेल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी mahaamrut.org.in या अधिकृत पोर्टलवर जा.
  • Registration: ‘New Registration’ वर क्लिक करून तुमची मूलभूत माहिती (नाव, मोबाईल, ईमेल) भरा.
  • लॉगिन करा: मोबाईलवर आलेल्या युजरनेम आणि पासवर्डने लॉगिन करा.
  • योजना निवडा: ‘Schemes’ सेक्शनमध्ये जाऊन “GCC-TBC Typing/Shorthand Incentive Scheme” निवडा.
  • माहिती भरा: तुमची शैक्षणिक माहिती, टायपिंग परीक्षेचा निकाल आणि बँक डिटेल्स अचूक भरा.
  • कागदपत्रे अपलोड करा: वरील यादीनुसार सर्व कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करा.
  • Final Submit: अर्जाची पुनर्तपासणी करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.

Helpline Number

माहितीचे वर्णनतपशील
पत्ताअमृत संस्था, 5 वा मजला, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध, पुणे – 411 067
ईमेलamrutmah@gmail.com / amrutkalash@mkcl.org
वेबसाइटmahaamrut.org.in

महत्वाचे प्रश्न (FAQs)

ही योजना फक्त मराठा विद्यार्थ्यांसाठी आहे का?

नाही, ही योजना खुल्या प्रवर्गातील (General/Open) सर्व जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) विद्यार्थ्यांसाठी आहे.

मी 30 आणि 40 wpm अशा दोन्ही परीक्षा पास केल्या आहेत, मला दोनदा पैसे मिळतील का?

नाही, ही योजना एकरकमी प्रोत्साहन भत्ता आहे. तुम्हाला एकाच वेळी याचा लाभ घेता येतो.

अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?

सहसा टायपिंगचा निकाल लागल्यापासून 06 महिन्यांच्या आत अर्ज करणे अपेक्षित असते, तरीही अधिकृत पोर्टलवर तारीख चेक करत राहावी.

टायपिंग कोर्सेसची फी परत मिळते का?

हो, हे ₹6,500 म्हणजे तुम्ही भरलेल्या फीची प्रतिपूर्ती आणि प्रोत्साहन म्हणूनच दिले जातात.

Conclusion

Amrut Yojana Maharashtra Typing 2026 हे महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक वरदानच ठरली आहे जर तुम्ही कष्टाने टायपिंग परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर या योजनेसाठी आजच अर्ज करा अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्राची पूर्तता करणे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे तरच तुम्हाला तुमच्या हक्काचे 6,500 रुपये मिळतील आणि हा लेख तुमच्या दहावी उत्तीर्ण मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *