डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, महाराष्ट्र 2025-26, अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर माहिती

Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana : मित्रांनो शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे एक मोठे शस्त्र आहे. जर एकदा का विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेतले तर त्याचे भविष्य उज्वल होते, पण हे शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती विकट आहे.

अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना घरापासून दूर राहावे लागते आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहाची सोय राहणीमानाचा खर्च तसेच त्यांना त्यांच्या दैनंदिनी गरजा भागवणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मकच असते तर हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने अशा विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना सुरू केली आहे. आणि ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार देखील बनली आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जी मुले अनाथ आहेत तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती विकट आहे म्हणजेच ते मुले आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मानले जातात. अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून वस्तीगृह निर्वाह भत्ता राहणीमानाचा खर्च दिला जातो. जेणेकरून ते अगदी सहजपणे त्यांच्या शिक्षण पूर्ण करू शकतील आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. या योजनेमुळे केवळ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार नाही तर त्यांचे भविष्य देखील उज्वल होईल.

Dr. Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana (Overview)

योजनेचे नावडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
संबंधित विभागउच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन
लाभार्थीशेतकऱ्यांची मुले, अनाथ विद्यार्थी तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी
मुख्य लाभवसतिगृहात राहण्यासाठी किंवा राहणीमानासाठी शासनाकडून मासिक/वार्षिक निर्वाह भत्ता (आर्थिक मदत) मिळते
अर्ज पद्धतऑनलाइन
Punjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे

तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही नेमकी काय आहे? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आली आहे महत्त्वाचे म्हणजे ही एक शैक्षणिक योजना आहे जसे की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थी जे शिक्षण घेण्यापासून आर्थिक अडचणींमुळे वंचित राहतात विशेष म्हणजे त्यांना अनेकदा बाहेरगावी शिकत असताना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश देखील मिळत नाही आणि यामुळे त्यांना भला मोठा आर्थिक खर्च करून खाजगी वस्तीगृह किंवा भाड्याची रूम करून राहावे लागते अशावेळी ही योजना खूप महत्त्वाची मानली जाते.

कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून वस्तीगृहाचा खर्च भागवण्यासाठी एक ठराविक रक्कम दिली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांना राहणीमानाचा खर्च भागवणे अगदी सोपे होते, आणि विद्यार्थी घरापासून दूर राहून देखील निर्धास्तपणे त्यांचे शिक्षण घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर ही योजना विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये आर्थिक स्थैर्य देऊन त्यांच्या आत्मविश्वास वाढवते आणि त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यास मदत करते.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेची उद्दिष्ट्ये

  • ही योजना शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचा राहणीमानाचा खर्च भागवण्यास मदत करते.
  • अनेक वेळा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घरापासून दूर राहण्याची गरज भासते तर बाहेरगावी लागणारा आर्थिक खर्च या या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना दिला जातो.
  • अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
  • विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक वातावरण मिळते आणि विद्यार्थी निर्धास्तपणे त्यांच्या शिक्षण पूर्ण करू शकतात.
  • शिक्षणातील असमानता कमी करण्यासाठी तसेच सामाजिक न्याय आणि समान संधी निर्माण करण्याकरिता ही योजना मदत करते.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे पात्रता निकष

  • अर्जदार विद्यार्थी या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा विद्यालय किंवा तंत्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • अर्जदार विद्यार्थी हा Diploma, Diploma, Post-Graduation, Engineering, Medical, Agriculture, Law, Pharmacy मध्ये शिकणारा असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • शेतकऱ्यांची मुले तसेच अनाथ विद्यार्थी किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जदार विद्यार्थी हा शिक्षण घेत असताना त्याची विद्यालयांमध्ये नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्याने आधी कोणत्याही समान प्रकारच्या निवास/निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक लाभ

अर्जदार प्रकार / उत्पन्न श्रेणीठिकाणभत्ता (₹, 10 महिने)
व्यावसायिक–अल्पभूधरक / मजूर पाल्यमुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद₹30,000
व्यावसायिक–अल्पभूधरक / मजूर पाल्यइतर जिल्हे₹20,000
व्यावसायिक–उत्पन्न ≤ ₹1 लाखमोठी शहरे₹10,000
व्यावसायिक–उत्पन्न ≤ ₹1 लाखइतर भाग₹8,000
व्यावसायिक–उत्पन्न ₹1 लाख–₹8 लाखमोठी शहरे₹10,000
व्यावसायिक–उत्पन्न ₹1 लाख–₹8 लाखइतर भाग₹8,000
नॉन-प्रोफेशनल–उत्पन्न ≤ ₹1 लाख(सर्वत्र लागू)₹2,000
Financial Benefits

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचे आवश्यक कागदपत्रे

वैयक्तिक कागदपत्रे

  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • विद्यार्थ्याचा फोटो आणि सही

शैक्षणिक कागदपत्रे

  • १०वी आणि १२वी गुणपत्रिका
  • मागील वर्षाची गुणपत्रिका
  • शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला
  • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे (CAP) वाटप पत्र
  • कॉलेज प्रवेशाची पावती
  • बोनाफाईड प्रमाणपत्र

उत्पन्नाचा पुरावा (यापैकी कोणताही एक दिला तर चालेल)

  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
  • नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र

निवासाचा पुरावा (यापैकी कोणताही एक दिला तर चालेल)

  • वसतिगृह प्रवेशाची पावती
  • नोंदणीकृत भाडेकरार

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया

New Applicant Registration

  • विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईल मधील ब्राउझर मध्ये महाडीबीटी या अधिकृत वेबसाईटला उघडायचे आहे https://mahadbtmahait.gov.in
  • आता वेबसाईटच्या होमपेज वरती तुम्हाला New Applicant Registration हा पर्याय दिसेल येथे क्लिक करा
  • त्यानंतर येथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाका आणि One-Time Password या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आधार कार्ड क्रमांकाची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती जो ओटीपी येईल तो येथे प्रविष्ट करा
  • यामुळे तुमचं काम अगदी सोपं होईल म्हणजे तुमचं नाव पत्ता फोटो ही माहिती आपोआप भरली जाईल
  • आता तुमच्या आवडीचा एक Username तयार करा त्यासोबतच एक मजबूत Password तयार करा हा Username आणि Password भविष्यात लॉगिन करण्यासाठी आवश्यक असेल त्यामुळे हा पासवर्ड एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा

Profile Creation

  • आता तुम्ही तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड Applicant Login एप्लीकेशन लॉगिन या ऑप्शन वरती प्रविष्ट करून लॉगिन करा.
  • आता लॉगिन केल्यावर तुम्हाला तुमची एक नवीन प्रोफाइल तयार करायची आहे लक्षात असू द्या हे खूप महत्त्वाची पायरी आहे कारण ही प्रोफाइल 100% पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला योजना दिसणार नाही म्हणूनच प्रोफाईल मध्ये खाली दिलेली माहिती व्यवस्थितरित्या भरा.
  • जसे की Personal Information, Address Information, Other Information, Past Qualification, Current Course, Hostel Details.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर प्रोफाइल भरताना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करावे लागतील हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करा त्यानंतर अपलोड करा.

योजना निवडा आणि अर्ज करा

  • मित्रांनो हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजेच तुमचे प्रोफाईल 100% पूर्ण झाल्यावर डाव्या बाजूला वरच्या मेन्यूमधून तुम्हाला All Schemes या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • आता Department या फिल्टरमध्ये Directorate of Higher Education हा पर्याय निवडा
  • आता तुम्हाला उच्च शिक्षण विभागाच्या सर्व योजनांची यादी दिसेल यामधून तुम्हाला डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही योजना निवडायची आहे
  • आणि योजनेच्या नावापुढे असलेल्या Apply या निळ्या कलरच्या बटणावर क्लिक करायचे आहे

अर्ज भरा आणि फायनल सबमिट करा

  • मित्रांनो अर्जावर क्लिक केल्यावर बहुतेकदा तुमची माहिती प्रोफाइल मधून आपोआप भरलेली दिसते ती एकदा काळजीपूर्वक नक्की तपासा.
  • आता तुम्हाला काय घोषणापत्रे (उदाहरणार्थ: मी दुसऱ्या कोणत्याही निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत नाहीये) असे दिसतील ते व्यवस्थित वाचून समोरील बॉक्समध्ये टिक करा.
  • त्यानंतर तुम्ही सर्व माहिती योग्य भरली आहे की नाही याची खात्री करा आणि अर्ज Submitबटणावर क्लिक करून Submit करा.

अर्जाची स्थिती तपासा

  • मित्रांनो एकदा अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक म्हणजेच Application ID मिळेल तो लक्षात ठेवा किंवा एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा.
  • कारण या Application ID द्वारे तुम्ही हा अर्ज कॉलेजने तपासला का तसेच मंजूर झाला का हे अगदी सहजरीत्या कधीही लॉगिन करून पाहू शकता अर्जाची स्थिती बघण्यासाठी तुम्हाला लॉगिन करावे लागेल आणि My Applied Schemes या टॅब वर जाऊन तपासावे लागेल.

विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी घरबसल्या तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर करून या योजनेसाठी अर्ज करू शकता जर अर्ज करताना तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या महाविद्यालयांमधील संबंधित विभागाशी थेट संपर्क करू शकता तेथे तुमच्या समस्यांचे समाधान नक्की होईल.

महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन

अधिकृत वेबसाइट / पोर्टलAaple Sarkar DBT Portal
मुख्य हेल्पलाइन क्रमांक 022–49150800
CM हेल्पलाइन (24×7 Toll Free)800–120–8040
ई-मेल (सामान्य चौकशीसाठी)[email protected]
पत्ता (शासन कार्यालय)उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई
तांत्रिक अडचणींसाठीमहाडीबीटी पोर्टलवरील Help/Support विभागातून थेट तक्रार नोंदवता येते
Contacts and Helpline

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’ (EBC) योजनेचा लाभ घेत आहे. तरीही मी या निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज करू शकतो का?

हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेता येतो राजश्री शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजनाही कॉलेजच्या शिक्षण शुल्कासाठी असते तर डॉक्टर पंजाबराव देशमुख योजनाही तुमच्या राहण्याच्या तसेच जेवणाच्या खर्चासाठी असते म्हणूनच या योजनांचे उद्देश वेगवेगळे असल्यामुळे तुम्ही एकाच वेळी या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.

माझ्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा थोडे जास्त आहे, तरीही मी अर्ज करू शकतो का?

असं असल्यास तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही कारण या योजनेसाठी तुमच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त असता कामा नये अर्ज करताना तुम्हाला तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला सबमिट करावा लागतो जर तुमचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो.

या योजनेचा लाभ मिळाल्यास पैसे कधी आणि कसे मिळतात?

बघा विद्यार्थी मित्रांनो योजनेसाठी तुमचा अर्ज मंजूर झाल्यास निर्वाह भत्त्याची रक्कम साधारणपणे दोन समान हफ्त्यांमध्ये तुम्हाला दिली जाते आणि हे रक्कम थेट तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते असं समजा की अर्ज मंजूर झाल्यापासून काही महिन्यानंतर आपला पहिला हप्ता आणि त्यानंतर दुसरा हप्ता जमा होतो

सारांश

विद्यार्थी मित्रांनो पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना हे केवळ राज्य सरकारने आर्थिक मदत देण्यासाठीच तयार केली नाही तर ती ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच आर्थिक दृष्ट्या धुरपत घटकातील लाखो गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची एक संधी आहे काही विद्यार्थी गुणवंत असून देखील केवळ शहरात राहण्याच्या खर्चाच्या ओजाखालीच दबून राहतात हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने होतकरू तरुणांसाठी ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची संधी देते.

म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो या योजनेसाठी जे विद्यार्थी पात्रता आणि निकषांमध्ये बसतात त्यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे म्हणून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा तसेच हा महत्त्वाचा लेख तुमच्या मित्रपरिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून हे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतील आणि त्यांचे पुढील शिक्षण कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकतील.

Swaraj
Swaraj

मी स्वराज देशमुख. गेल्या सहा वर्षांपासून मी ब्लॉगिंग आणि लेखन क्षेत्रात काम करत आहे. सरकारी योजना, शासकीय कर्ज योजना आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरणारी माहिती लोकांपर्यंत अगदी सोप्या भाषेत पोहोचवणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

Articles: 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *