विद्यार्थी मित्रांनो, ओबीसी कॅटेगिरी मधील आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय शिक्षण नंतर पोस्ट मॅट्रिक म्हणजेच उच्च शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे कठीण होते. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सन्मान मिळावा तसेच, ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी Post-Matric Scholarship to OBC Students योजना सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यालयीन शिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम या सोबतच डिप्लोमा आणि इतर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.
Post-Matric Scholarship to OBC Students ही स्कॉलरशिप महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपचा लाभ मिळवलेला आहे. आता सुरू असलेल्या 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी या स्कॉलरशिपची अर्ज प्रक्रिया MahaDBT या पोर्टल मार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेबद्दलची पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे, तसेच अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजना
योजना | Post-Matric Scholarship to OBC Students, Maharashtra 2025-26 |
उद्देश | OBC विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे |
मदत | ट्युशन फी, परीक्षा फी, होस्टेल/मेस फी, देखभाल भत्ता |
लाभ | ₹90 ते ₹425 प्रति महिना (Day Scholar/Hosteller प्रमाणे) + फी माफी |
सुरुवात | महाराष्ट्र शासन (MahaDBT पोर्टलमार्फत अर्ज) |
अर्ज प्रक्रिया | mahadbt.maharashtra.gov.in |
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजना काय आहे
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातील गुणवंत आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी Post-Matric Scholarship to OBC Students ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील जे विद्यार्थी दहावीनंतर Post-Matric चे शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हा महाराष्ट्र सरकारमार्फत देण्यात येतो.
महत्त्वाची बाब म्हणजे जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी म्हणजेच B.Ed., D.Ed., Diploma, Professional Courses शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क माफी मिळते. तसेच दिवसाने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 90 ते 190 रुपये प्रति महिना तर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 150 ते 425 रुपये प्रति महिन्यापर्यंत आर्थिक मदत मिळते.
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजनेची पात्रता
- अर्जदार विद्यार्थी हा कायमचा महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- अर्जदार विद्यार्थी इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील असावा.
- अर्जदार विद्यार्थ्याने दहावीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
- शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयीन, व्यावसायि तसेच डिप्लोमा किंवा तांत्रिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1,50,000 पेक्षा कमी असावे.
- अर्जदार विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के हजेरी असणे आवश्यक आहे.
- महत्त्वाचे म्हणजे या शिष्यवृत्तीचा लाभ एकाच वेळी दुसऱ्या शिष्यवृत्ती किंवा स्टायपेंडसोबत घेता येणार नाही.
- विद्यार्थी नियमित शिक्षणक्रमात शिकणारा असावा (Part-time किंवा correspondence course चालणार नाही).
- जर एखादा अर्जदार विद्यार्थी एखाद्या वर्षात नापास झाला असेल तर त्या वर्षाचा लाभ त्याला मिळेल पण पुढील वर्षी पुन्हा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याला समोरील वर्गात प्रवेश मिळणे आवश्यक आहे.
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजनेतून मिळणारे लाभ
अभ्यासक्रम प्रकार | मासिक शिष्यवृत्ती | इतर लाभ |
---|---|---|
होस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी | ₹425 ते ₹820 | मेस फी, राहण्याचा खर्च |
घरी राहणारे विद्यार्थी | ₹190 ते ₹330 | शैक्षणिक साहित्य खर्च |
विशेष अभ्यासक्रम | वेगवेगळ्या दराने | पुस्तके, ट्युशन फी |
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate) – OBC प्रवर्ग असल्याचा पुरावा
- जात वैधता प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- निवासाचा पुरावा
- शैक्षणिक दाखले मागील परीक्षेचे गुणपत्रक
- प्रवेश प्रमाणपत्र
- ओळखपत्र – आधार कार्ड / पॅन कार्ड
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- हजेरी प्रमाणपत्र
- गॅप सर्टिफिकेट (Gap Certificate) – जर अभ्यासात खंड पडला असेल तर
OBC पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया
- ओबीसी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या अधिकृत mahadbt.maharashtra.gov.in वेबसाईटला भेट द्यायची आहे.
- यानंतर वेबसाईट मध्ये दिलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
- तेथे तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल जसे की आधार कार्ड क्रमांक ई-मेल आयडी मोबाईल नंबर
- हे सर्व टाकून ओटीपी द्वारे तुमचे अकाउंट सक्रिय करा यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
- तो युजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉगिन करू शकता लॉगिन करण्यासाठी Applicant Login या पर्यायावर क्लिक करा.
- आता सर्वात महत्त्वाची गोष्ट वेबसाईट मध्ये दिलेल्या योजनांपैकी Post Matric Scholarship ही योजना निवडा.
- आता येथे तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती शैक्षणिक माहिती तसेच बँक खात्याची माहिती भरावी लागेल.
- तसेच अर्जामध्ये विचारलेले आवश्यक ती कागदपत्रे येथे अपलोड करावी लागते.
- अर्ज भरून झाल्यावर तो सविस्तरपणे पुन्हा तपासा त्यानंतर अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची हार्ट कॉपी तयार करा आणि ते संबंधित . शाळेकडून किंवा कॉलेजच्या मुख्याध्यापकाकडून प्रमाणित करून घ्या.
अर्ज करताना ही काळजी घ्या
- विद्यार्थी मित्रांनो सर्व कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून PDF/JPEG मध्ये अपलोड करा.
- महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का ते आधी तपासा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर एप्लीकेशन स्टेटस नियमित तपासा.
- आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अर्ज हा अंतिम तारखेच्या आधी पूर्ण करा आणि कॉलेजमार्फत त्याची पडताळणी करून घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
या शिष्यवृत्तीचा अर्ज कधी सुरू होतो?
मित्रांनो सर्वसाधारणपणे जुलै ते ऑक्टोंबर या काळात या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू होतात नेमकी तारीख तुम्ही सरकारच्या mahadbt.maharashtra.gov.in (NSP) अधिकृत शिष्यवृत्ती पोर्टल वरती जाहीर केली जाते.
या शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
बघा जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगिरी मध्ये येतात म्हणजे दहावीनंतर त्यांनी अकरावी, बारावी, डिप्लोमा, पदवी पदवीधर, व्यवसायिक अभ्यासक्रम हे शिक्षण घेतलेले असेल असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
उत्पन्न मर्यादा किती आहे?
जर विद्यार्थ्याला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे ₹1,50,000 लाखापेक्षा जास्त नसावे.
निष्कर्ष
विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ओबीसी पोस्ट मॅट्रिक ही योजना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने मिळून सुरू केली या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व समानता प्रस्थापित करण्यात येते तसेच हे एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बन घटकातील ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते तसेच त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक मोठा आर्थिक हातभार देखील लागतो त्यामुळे शिक्षण हेच खरे प्रगतीचे साधन आहे आणि अशा योजनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारते तसेच त्यांच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात
म्हणूनच अशा गरजू गरीब विद्यार्थ्यांना हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून ते ओबीसी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेचा लाभ घेऊन त्यांचे शिक्षण अगदी सहजरीत्या पूर्ण करू शकतील आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.