Mgnrega Yojana Maharashtra: ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची संधी मिळावी तसेच त्यांच्या हाताला गावातच काम मिळून त्यांची उपजीविकेची चिंता दूर व्हावी आणि महत्त्वाचे म्हणजे गावाच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे विशेष म्हणजे ही योजना ग्रामीण भागातील गरजू करी बेरोजगार व अल्प उत्पन्न कुटुंबासाठी एक मोठा आधार बनली आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे काय योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरातील कुटुंबाला वर्षभरात किमान शंभर दिवसाचे मजुरीचे काम हे हमखास दिले जाते यामुळे शेतमजूर भूमिहीन कुटुंब तसेच इतर गरजू लोकांनाही रोजगाराची सुवर्णसंधी मिळते त्यासोबतच गावातील रस्ते पाण्याची सोय शेतीसाठी उपयुक्त कामे यांसारख्या विकासात्मक कामांनाही गती मिळते.
तसेच या योजनेमुळे केवळ रोजगार निर्मितीच होत नाही तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था देखील बळकट होते तसेच लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि एक मजबूत गाव तर एक मजबूत देश या संकल्पनेला प्रत्यक्षात आकार दिला जातो त्यामुळे मनरेगा योजनाही ग्रामीण भागातील विकास व सामाजिक सुरक्षा याची संगम मानली जाते.
Mgnrega Yojana in Marathi (Overview)
मुद्दा | माहिती |
---|---|
योजनेचे पूर्ण नाव | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) |
कोणी सुरू केली | भारत सरकार, ग्रामीण विकास मंत्रालय |
कधी सुरू झाली | २ फेब्रुवारी २००६ |
मुख्य उद्देश | ग्रामीण कुटुंबांना वर्षातून किमान १०० दिवस मजुरीचे काम हमखास उपलब्ध करून देणे व ग्रामीण विकासाला चालना देणे |
लाभार्थी | ग्रामीण भागातील गरीब, बेरोजगार व अल्पउत्पन्न कुटुंबे |
अधिकृत वेबसाइट | nrega.dord.gov.in |
हेल्पलाइन क्रमांक | १८००-११-१५५५ (राष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक) |
महात्मा गांधी रोजगार हमी योजना काय आहे
ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच जी मनरेगा योजना या नावाने प्रसिद्ध आहे ही नेमकी काय आहे तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही एक ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षातून किमान शंभर दिवसाचे मजुरीवर काम देणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे.
या योजनेअंतर्गत कोणत्याही ग्रामीण घरातील प्रौढ सदस्याने जर कामाची मागणी केली तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मार्फत त्याला काम उपलब्ध करून दिले जाते यासाठी प्रत्येक कुटुंबाला सरकारकडून एक जॉब कार्ड दिले जाते या जॉब कार्ड मध्ये कुटुंबातील काम करणाऱ्या इच्छुक सदस्यांची माहिती नोंदवलेली असते आणि महत्त्वाचे म्हणजे हे ओळखपत्र काम मिळवण्यासाठी वापरण्यात येते.
ज्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत काम मिळवायचे आहे तर अशा लाभार्थी व्यक्तीला आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो किंवा जॉब कार्ड दाखवून कामाची नोंद करावी लागते आणि नोंदणी झाल्यावर पंधरा दिवसाच्या आत मध्ये ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीला काम उपलब्ध करून देणे हे बंधनकारक असते अन्यथा अर्जदारास बेरोजगारी भत्ता मिळतो यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाला केवळ रोजगाराची हमी मिळत नाही तर त्यांना त्यांची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यास मदत मिळते.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची उद्दिष्ट्ये
- ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातून किमान शंभर दिवस मजुरीवर आधारित रोजगाराची हमी देणे.
- ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे आणि गरजू गरीब कुटुंबांना तात्पुरती आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागातील मजुरांना स्थिर व न्याय मिळवून देणे.
- तसेच गावातील रस्ते पाण्याची सोय शेतीची सुधारणा वृक्ष लागवड अशा स्थायी व उपयुक्त मालमत्ता निर्माण करणे.
- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि ग्रामीण भागातील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत करणे.
- महत्वाचे म्हणजे महिलांना दलित आदिवासी समाजाला आणि वंचित घटकांना समान संधी उपलब्ध करून देणे.
- ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावांमध्येच रोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून त्यांना शहराकडे जाण्याची गरज भासणार नाही.
- ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमार्फत कामाची अंमलबजावणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करणे.
- ग्रामीण भागातील समाजाला सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना पात्रता निकष
कुटुंबासाठी पात्रता
- अर्जदाराचे कुटुंब हे ग्रामीण भागात राहणारे असावे.
- महत्त्वाचे म्हणजे अर्जदाराचे कुटुंब ग्रामीण पंचायतीच्या हद्दीत नोंदणीकृत असावे.
- कुटुंबातील किमान एक प्रौढ सदस्य मजुरीचे काम करण्यास इच्छुक असावा.
व्यक्तीसाठी पात्रता
- ग्रामीण भागातील अर्जदाराचे वय हे 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार हा ग्रामीण भागातील तसेच भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या मजुरीचे काम करण्यासाठी सक्षम असावा.
- अर्जदाराने ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करून जॉब कार्ड मिळवलेले असावे.
- अर्जदाराने कामाची मागणी हे ग्रामपंचायतीमार्फत अधिकृत पद्धतीने करणे आवश्यक आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत मिळणारे आर्थिक लाभ
लाभाचा प्रकार | तपशील |
---|---|
रोजंदारी दर (महाराष्ट्र) | सुमारे ₹297 प्रति दिवस |
वेतन जमा पद्धत | सीधे DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात |
पेमेंटची वेळ | कार्यानंतर 15 दिवसांत; विलंब झाल्यास दैनिक 0.05% पॅनेल्टी |
बेरोजगारी भत्ता | 15 दिवसांत काम न मिळाल्यास – पहिल्या 30 दिवसांपर्यंत 25%, नंतर 50% मजुरी दराचा भत्ता |
प्राथमिकता | रोजगाराची हमी + आर्थिक सुरक्षा |
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची आवश्यक कागदपत्रे
कुटुंबासाठी आवश्यक कागदपत्रे
- रहिवासी दाखला (ग्रामपंचायत/तालुका कार्यालयाकडून) – अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचा पुरावा.
- राशन कार्ड / कुटुंबाचा ओळखपत्र – घरातील सदस्यांची नोंद.
व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र – आधार कार्ड, मतदार ओळखपत्र (Voter ID), पॅन कार्ड (PAN Card), ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी कोणतेही)
- जन्मतारीख/वयाचा पुरावा (१८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक)
- जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्डवरील नोंद.
- बँक खाते क्रमांक व पासबुकची प्रत
- आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक असणे आवश्यक.
- पासपोर्ट साईज फोटो (सामान्यतः २ ते ३ फोटो).
- ग्रामपंचायतीत अर्ज भरताना मागवलेले फॉर्म (जॉब कार्ड अर्ज).
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया
जॉब कार्डसाठी अर्ज – स्टेप-बाय-स्टेप
- अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराचे वय अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र रहिवासी पुरावा बँक पासबुक पासपोर्ट फोटो हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून जॉब कार्ड नोंदणी अर्ज हा अर्जदाराला घ्यावा लागेल अनेक ठिकाणी हा अर्ज Form-1/Registration Application म्हणून देखील ओळखला जातो.
- आता अर्जामध्ये विचारली जाणारी घरातील सर्व प्रौढ सदस्यांची माहिती भरा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे तसेच फोटो लावून अर्ज हा ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्रामसेवकाकडे जमा करा (लक्षात असू द्या या अर्जाला कोणतीही फी आकारली जात नाही).
- एकदा अर्ज ग्रामपंचायत तिकडे सबमिट केल्यास ग्रामपंचायत मधील सदस्य तुमच्या घरी भेट देतात तसेच कागदपत्रांची देखील परताळणी करतात पडताळणी नंतर नोंदणी अर्ज हा मंजूर केला जातो.
- नोंदणी अर्ज स्वीकारल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत मध्ये सरकारकडून तुम्हाला जॉब कार्ड दिले जाते या जॉब कार्डवर घरातील प्राऊड सदस्यांची नावे आणि फोटो असतात आणि या जॉब कार्ड साठी कोणते शुल्क भरावे लागत नाही.
जॉब कार्ड मिळाल्यानंतर – कामाची मागणी कशी करावी
- एकदा जॉब कार्ड काढल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीकडे कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल बरेच राज्यांमध्ये याला Form-6 असेही म्हणतात अर्ज दिल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीकडून पावती घ्यावी लागेल.
- पावतीच्या तारखेवरून ग्रामपंचायतीला काम देण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत मिळते जर मागणीपासून पंधरा दिवसाच्या आत काम न दिल्यास कायद्यानुसार अर्जदाराला बेरोजगारी भत्ता देणे हे बंधनकारक असते.
मनरेगा – महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन
विभाग / संपर्क | तपशील |
---|---|
राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक | 1800-11-1555 (टोल-फ्री) |
ग्रामीण विकास मंत्रालय (भारत सरकार) | nrega.dord.gov.in |
महाराष्ट्र राज्य मनरेगा वेबसाइट | rdd.maharashtra.gov.in |
ई-मेल (राष्ट्रीय स्तर) | [email protected] |
ग्रामपंचायत स्तर संपर्क | संबंधित ग्रामसेवक / रोजगार सहाय्यक |
जिल्हा स्तर संपर्क | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) कार्यालय |
राज्य स्तर नियंत्रण कक्ष (महाराष्ट्र) | ग्रामीण विकास विभाग, मुंबई – दूरध्वनी: 022-2202 6004 |
मनरेगा योजना – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
जॉब कार्ड किती वर्षांसाठी वैध असते?
मित्रांनो एकदा तुम्हाला जॉब कार्ड मिळाल्यानंतर ते पर्मनंट असते म्हणजेच दरवर्षी त्याची वैधता संपात नाही मात्र घरातील नवीन प्रौढ सदस्यांचा समावेश करायचा असल्यास तुम्हाला त्यांची नावे ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घ्यावी लागतात
कामाची मागणी कुठे व कशी करावी?
अर्जदाराला कामाची मागणी करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागतो ज्याला (Form-6) असे म्हणतात हा अर्ज करताना अर्जदाराला जॉब कार्ड दाखवणे व पावती घेणे हे आवश्यक आहे पावती मिळाल्यानंतर अर्जदाराला पंधरा दिवसाच्या आत रोजगार मिळणे बंधनकारक असते
कामाचे वेतन कसे दिले जाते?
मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत कामाचे वेतन हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते महत्त्वाचे म्हणजे मजुराला पंधरा दिवसाच्या आत मजुरी मिळाली पाहिजे जर विलंब झाल्यास त्याला व्याजासह रक्कम द्यावी लागते
सारांश
मित्रांनो महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही केवळ रोजगार देणारेच नाही तर ग्रामीण भागातील भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी एक महत्त्वाची योजना मानली जाते या योजनेमुळे गरजू गरीब व बेरोजगार कुटुंबांना आर्थिक सुरक्षा मिळते तसेच त्यांचे उपजीविकेचे साधन देखील मजबूत होते आणि गावाच्या स्थानिक पायाभूत सुविधा देखील उभारल्या जातात जसे की रस्ते पाणी साठवणी वृक्ष लागवड यांसारख्या महत्त्वाच्या कामांना देखील गावात चालला मिळते.
गावातील बेरोजगार आणि गरजू गरीब तरुणांसाठी जे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत अशांसाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते म्हणूनच तुमच्या गावातील गरजू गरीब व्यक्तींना हा लेख सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की शेअर करा.